loan waiver : मोठी बातमी! शेतकऱ्यांना थेट कर्जमाफी नाहीच, पण सरकार घेणार मोठा निर्णय

No direct loan waiver but relief package likely for flood-hit farmers : अतिवृष्टीमुळे ७० लाख एकर शेतीचं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीला सरकारनं नकार दिला असून निकष बदलून नुकसान भरपाई देण्याची तयारी सुरू आहे.

Maharashtra government rules out direct farm loan waiver after floods : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रूंचा पूर आला आहे. त्यामुळे राज्यभरात कर्जमाफीच्या मागणीने जोर धरला आहे. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, थेट कर्जमाफीची शक्यता धूसर आहे. शेतकऱ्यांना निकष बदलून मदत देण्यात येणार असल्याचे समोर आले आहे.

नुकसान भरपाईचे निकष बदलून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्याबाबत सरकार विचार करत असल्याचे समोर आले आहे. पण थेट कर्जमाफी देण्यात येणार नाही, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावासमुळे राज्यात ७० लाख एकर शेतीचे नुकसान झाले आहे. उभी पिके शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत बुडाली आहेत. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर कारावा, त्याशिवाय सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. असे असले तरी, सरकारकडून शेतकऱ्यांना थेट कर्जमाफी देण्याचावत कसलीही हालवाल मंत्रालय पातळीवर दिसत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com