Maharashtra Exit Polls: बार्शीत ठाकरे विरुद्ध शिंदे! कोण बाजी मारणार? पाहा एक्झिट पोल
बार्शी मतदार संघात शिवसेना ठाकरे गटाच्या आमदाराचं पारडं जड दिसतंय. या मतदारसंघात ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट अशी लढत पाहायला मिळाली. मात्र बार्शीकरांचा कौल ठाकरे गटाच्या बाजूने असल्याचं चित्र स्पष्ट होतंय. ठाकरे गटाकडून दिलीप सोपल हे निवकणुकीच्या रिंगणात होते. तर शिंदे गटाकडून राजेंद्र राऊत त्यांना टफ देण्यासाठी मैदानात होते.
सामच्या एक्झिट पोलनूसार, बार्शीकरांच्या मनातील आमदार ठाकरे गटाचे आमदार दिलीप सोपल असल्याचे दिसून येत आहेत. त्यांनी शिंदे गटाचे उमेदवार राजेंद्र राऊत यांना मागे सोडल्याचं चित्र आहे. या एक्झिट पोलनुसार, दिलीप सोपल हे बार्शीचे संभाव्य आमदार बनू शकतात.
गेल्या ५ वर्षात राजेंद्र राऊत यांनी बार्शीमध्ये निधी आणला, याचा त्यांना फायदा होऊ शकतो. मात्र मनोज जरांगे पाटील फॅक्टरचा तोटा त्यांना होऊ शकतो. दिलीप पाटील यांना या मतदारसंघातील संभाव्य आमदार म्हटलं जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.