Maharashtra Exit Poll : कोकण, उत्तर महाराष्ट्रानं महायुतीला दिली साथ, पण सत्ता कुणाकडे? विभागानुसार कुणाला किती जागा?

Maharashtra Exit Poll Result : मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर एक्झिट पोल समोर आलेत. पण २३ तारखेलाच राज्यात कुणाचं सरकार येणार, हे स्पष्ट होणार आहे.
Maharashtra Exit Poll
Maharashtra Vidhan Sabha Electionsaam tv
Published On

Maharashtra Vidhansabha Exit Poll Result : मोठ्या उत्साहात आज विधानसभेच्या २८८ जागांसाठी मतदान पार पडलं. दिग्गजांचं नशीब ईव्हीएम मशीनमध्ये कैद झाल्यानंतर आता निकालाची प्रतीक्षा लागली आहे. पण त्याआधीच एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. SAS ग्रुप हैदराबादच्या सर्वेक्षणानुसार राज्यात मविआचे सरकार येण्याची शक्यता आहे. (SAS Group forecasts a sweeping victory for MVA in Maharashtra)

उत्तर महाराष्ट्र आणि कोकण वगळता इतर विभागात महायुतीला जोरदार धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. SAS ग्रुप हैदराबादच्या सर्वेक्षणानुसार राज्यात महायुतीच्या 125 ते 135 जागा येण्याचा अंदाज आहे. तर, महाविकास आघाडीला 147 ते 155 जागांवर विजय मिळू शकतो.

विदर्भात कोण आघाडीवर ?

विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर विदर्भावर काँग्रेस आणि भाजपने विशेष लक्ष दिले होते. विदर्भातील ६२ जागांपैकी ३३ ते ३५ जागांवर मविआला यश मिळेल, असा अंदाज आहे. तर महायुतीला २६ ते २७ जागा मिळतील. इतर २ - ३ जागा येतील.

पश्चिम महाराष्ट्रात काय ?

२८८ पैकी सर्वाधिक ७० जागा पश्चिम महाराष्ट्रात आहे. साखर पट्ट्यात ज्याला सर्वाधिक जागा मिळतील, त्याचं सरकार येतं, असं समिकरण आहे. पश्चिम महाराष्ट्रात मविआने आघाडी घेतली आहे. पश्चिम महाराष्ट्रात मविआला ४० ते ४२ जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर महायुतीला २७ ते २८ जागा मिळतील, असा अंदाज आहे. इतरमध्ये दोन उमेदवार येतील, असा अंदाज आहे.

मराठवाड्यात कोण सरस?

मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे मराठवाड्यात मराठा फॅक्टर महत्त्वाचा ठरणार, असे म्हटलं जात होतं. मराठवाड्यातील ४६ जागांपैकी महायुतीच्या पारड्यात फक्त १७ ते १८ जागा पडण्याची शक्यता आहे. तर मविआला २७ ते २८ जागांवर यश मिळेल, असं एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलेय.

मुंबईत कुणाचं राज्य?

महाराष्ट्राची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये अटीतटीची लढत दिसत आहे. ३६ जागांपैकी महायुतीला १७ ते १८ जागा मिळतील, असा अंदाज आहे. तर मविआला १८ ते १९ जादा मिळण्याची शक्यता आहे. एक किंवा दोन जागांवर इतर निवडून येतील,असेही सांगण्यात आलेय.

उत्तर महाराष्ट्रात काय ?

लोकसभेला उत्तर महाराष्ट्रात महायुतीला जोरदार धक्का बसला होता. विधानसभेला मात्र चांगलं यश मिळेल, असा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रात महायुतीला १८ ते २१ जागा मिळतील, असे चित्र आहे. मविआची उत्तर महाराष्ट्रात पिछेहाट झाल्याचे चित्र आहे. मविआला १५ ते १६ जागा मिळण्याची शक्यता आहे. दोन जागांवर अपक्ष अथवा इतर निवडून येण्याची शक्यता आहे.

कोकणातही महायुतीची सरसरी -

उत्तर महाराष्ट्रानंतर कोकणानेही महायुतीला साथ दिल्याचं दिसतेय. कोकणातील ३९ जागांपैकी महायुतीच्या पारड्यात २२ ते २३ जागा पडण्याची शक्यता आहे. तर मविआला १४ ते १५ जागांवर समाधान मानावे लागणार आहे.

नोट - वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून केलेल्या सर्व्हेतून एक्झिट पोलचे अंदाज वर्तवण्यात आलेले आहेत. ही फक्त प्राथमिक आकडेवारी आहे. २३ तारखेला राज्यात कुणाचं सरकार स्थापन होणार, याचं चित्र स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com