Anil Deshmukh Health Update : नागपूरमध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कारवर सोमवारी सायंकाळी अज्ञात व्यक्तीने दगडफेक केली. या हल्ल्यामध्ये अनिल देशमुख गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोक्याला जबर जखम झाली आहे. अनिल देशमुख यांच्यावर सध्या मॅक्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अनिल देशमुख हे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मॅक्स रुग्णालयात त्यांचा सिटीस्कन, ईसीजी आणि इतर वैदकीय तपासण्या करण्यात आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अनिल देशमुख यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
सोमवार प्रचाराचा शेवटचा दिवस होता. सभा आटोपून अनिल देशमुख काटोलकडे निघाले होते. त्यावेळी काही अज्ञात व्यक्तींनी बेलफाट्याजवल अनिल देशमुख यांच्या कारवर दगडफेक केली. यात अनिल देशमुख यांच्या वाहनाची समोरची काच फुटली. त्याचे वेगाने तुकडे आतल्या बाजूला उडाले. त्यामध्ये अनिल देशमुख जखमी झाल्याचे समोर आलेय. याप्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झालाय. हा हल्ला भाजपच्या लोकांनीच केल्याचा आरोप अनिल देशमुख समर्थकांनी केला. तर भाजपकडून याला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलेय. अनिल देशमुख यांनी स्वत:वर हल्ला करुन घेतलाय, ही स्टंबाजी असल्याचा प्रत्युत्तर भाजपाकडून देण्यात आलेय.
अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाल्यानंतर रुग्णालयाबाहेर एकच गर्दी जमली होती. काही कार्यकर्त्यांनी अनिल देशमुख यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. त्यांच्या डोक्याला जबर मार बसल्याचं कार्यकर्त्यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील स्थानिक नेत्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे अनिल देशमुख यांचा सिटीस्कॅन व इतर वैद्यकीय चाचण्या सामान्य आल्या आहेत.
जिल्हाधिकारी काय म्हणाले ?
नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी अनिल देशमुख यांच्या हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, अनिल देशमुख यांच्या गाडीवर काही अज्ञातानी हल्ला केल्याची माहिती आहे आणि त्यामध्ये त्यांना दुखापत झाल्याच कळतेय. त्यांना काटोल ग्रामीण रुग्णालयातून नागपूर येथे हलवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे या सगळ्या प्रकरणात मी स्वतः व पोलीस चौकशी करत आहोत.. या सगळ्या घटनेतील तथ्य समोर आणण्यात येईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.