Maharashtra Election: लोकसभेच्या प्रचारादरम्यान सोलापुरात तापला घरकुलांचा मुद्दा

Solapur Gharkul : बिडी कामगारांना सरकारने दिलेल्या 30 हजार घरकुलांच्या मुद्द्यावरूनही आडम मास्तरांनी मोदींवर निशाणा साधलाय. तर हा घरकुलांचा प्रकल्प सोनिया गांधींच्या सांगण्यावरून 2013 ला काँग्रेस सरकारने मंजूर केल्याचा निशाणाही आडम मास्तरांनी साधला.
Maharashtra Election: लोकसभेच्या प्रचारादरम्यान सोलापुरात तापला घरकुलांचा मुद्दा
Narsayya Adam Slams Over Gharkul Sakal

विश्वभूषण लिमये

Narsayya Adam Slams Over Gharkul : सोलापूर : सोलापूरच्या लोकसभेच्या प्रचारात बिडी कामगारांसाठीच्या 30 हजार घरांचा मुद्दा चांगलाच तापलाय. यावरून फडणवीस यांनी केलेल्या टीकेला कामगार नेते नरसय्या आडम, यांनी शेलक्या शब्दात निशाणा साधलाय. पाहुया त्याबद्दलचा एक खास रिपोर्ट.

माकपचे नेते माजी आमदार नरसय्या आडम यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अशा शेलक्या शब्दात हातवारे करत निशाणा साधला. मुद्दा होता बिडी कामगारांना दिलेल्या 30 हजार घरकुलांचा. भाजपचे उमेदवार राम सातपुतेंचा अर्ज भरताना फडणवीस यांनी आडम यांच्यावर निशाणा साधला होता. त्याला आडम मास्तरांनी उत्तर दिलंय. तर मोदींचा पराभव करण्यासाठी मी इथे उपस्थित असल्याचा हल्लाबोल आडम मास्तरांनी केलाय.

बिडी कामगारांना सरकारने दिलेल्या 30 हजार घरकुलांच्या मुद्द्यावरूनही आडम मास्तरांनी मोदींवर निशाणा साधलाय. तर हा घरकुलांचा प्रकल्प सोनिया गांधींच्या सांगण्यावरून 2013 ला काँग्रेस सरकारने मंजूर केल्याचा निशाणाही आडम मास्तरांनी साधलाय..

एकंदरितच बीडी कामगारांच्या घरकुलाच्या मुद्द्यावरून सोलापूरचं राजकारण तापलंय. घरकुलांवरून भाजपने आडम मास्तरांवर केलेल्या टीकेला आडम मास्तर यांनी जशास तसं उत्तर दिलंय.

Maharashtra Election: लोकसभेच्या प्रचारादरम्यान सोलापुरात तापला घरकुलांचा मुद्दा
Maharashtra Politics: लढणाऱ्या लेकींसाठी 'बाप' बुलंद कहाणी, शिंदे-पवारांनी सोलापूर-बारामतीची सूत्रे घेतली हाती

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com