Maharashtra Election: सुनेत्रा पवारांसाठी दादांची फिल्डिंग; अजित पवार सहकुटुंब घेणार बड्या नेत्याची भेट

AJit Pawar : हर्षवर्धन पाटलांकडून अजित पवारांवर आणि अजित पवारांकडून हर्षवर्धन पाटलांवर सातत्याने टीका करण्यात आली आहे. मात्र ऐन निवडणुकीच्या काळात दोन्ही नेते वाद विसरून एकत्र येणार असल्याचं दिसत आहे.
 ajit pawar
ajit pawar

(मंगेश कचरे)

Ajit Pawar Meet Harshvardhan Patil : बारामती येथे सुप्रिया सुळेविरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना रंगलाय. राष्ट्रवादीमध्ये फुट पडल्यानंतर पहिल्यांदा पवार कुटुंबीय लोकसभा निडणुकीला सामोरे जात असून ही निवडणूक प्रतिष्ठापणाला लावणारी ठरलीय. कोणत्याही परिस्थितीत जिंकण्यासाठी दोन्ही बाजूकडून प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहे. पत्नी सुनेत्रा पवार यांच्या विजयासाठी अजित पवार कार्यकर्त्यांच्या आणि मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत. याचपार्श्वभूमीवर ते सहपरिवार हर्षवर्धन पाटील यांची भेट घेणार आहेत.

इंदापूर तालुक्यातील हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार यांच्यातील वाद सर्वांना माहितीये. हर्षवर्धन पाटलांकडून अजित पवारांवर आणि अजित पवारांकडून हर्षवर्धन पाटलांवर सातत्याने टीका करण्यात आली आहे. मात्र लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या मध्यस्थीने दोन्ही नेते राजकीय वाद मिटवून एकत्रित आलेत. आता यामध्ये आणखी एक पाऊल टाकलं जाणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार सहकुटुंब सहपरिवार जाणार हर्षवर्धन पाटील यांच्या भेटीला जाणार आहेत. अजित पवार १९एप्रिल रोजी संध्याकाळी हर्षवर्धन पाटील यांच्या घरी जाणार आहेत. हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापुरातील निवासस्थानी ते स्नेहभोजनाचा कार्यक्रम करणार आहेत. त्याचबरोबर अजित पवार हे भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे या मनोमिलनातून राजकीय वाद संपणार का? याकडे लक्ष आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी समजूत काढल्यानंतरही हर्षवर्धन पाटील यांनी अजित पवारांवर टीका केली होती. त्यामुळे दोन्ही नेते आता स्नेहभोजनानंतर एकदिलाने काम करणार का याकडे महायुतीसह नेत्यांचे लक्ष लागलंय. दुसरीकडे शरद पवार सुद्धा निवडणुकीच्या प्रचारात उतरले असून राज्यभरात ५० सभा घेणार आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार जुने वाद मिटवत आहेत. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी प्रेमसुख कटारिया यांची दौंडमधील निवासस्थानी घेतली होती. अजित पवार यांनीही आज त्यांची भेट घेतली. बारामती लोकसभेला सुनेत्रा पवार यांचा उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी प्रेमसुख कटारिया यांची आणि अजित पवारांची भेट महत्त्वाची मानली जातेय.

 ajit pawar
Ajit Pawar: 'तुम्हाला पाहिजे तेवढा निधी देऊ, त्यासाठी मशीनमध्ये कचाकच बटन दाबा', अजित पवारांचे इंदापूरमध्ये विधान

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com