CM Eknath Shinde
CM Eknath Shinde Saamtv

Eknath Shinde: दे दणादण! क्रिकेटच्या मैदानावर CM शिंदेंची जोरदार बॅटिंग; Video Viral

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राजकीय मैदानावरील फटकेबाजी तु्म्ही अनेकदा पाहिली असेल, पण सध्या त्यांच्या क्रिकेटच्या मैदानावरील फटकेबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.
Published on

CM Eknath Shinde: राजकीय नेत्यांचे क्रिकेटप्रेम सर्वपरिचित आहे. अनेक क्रिकेट सामन्यांच्या स्पर्धांना उपस्थिती लावत हे पुढारी क्रिकेट खेळताना दिसत असतात. सध्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्याही अशाच क्रिकेटच्या मैदानावरील फटकेबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (CM Eknath Shinde)

CM Eknath Shinde
Dhule News: पिसाळलेल्या कुत्र्याचा दहा बालकांना चावा; उपचारासाठी दाखल

याबाबत अधिक माहिती अशी की, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने 'धर्मवीर आनंद दिघे साहेब चषक 2023' या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या क्रिकेट स्पर्धेला आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून स्पर्धकांचा उत्साह वाढवला. यावेळी कार्यकर्त्यांच्या आग्रहाला मान देवून त्यांनी यावेळी बॅटिंगही केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यावेळी चांगलीच फटकेबाजी केलेली पाहायला मिळाली. त्यांच्या बॅटीतून फटकावलेला प्रत्येक चेंडू सीमापार करत होता. मुख्यमंत्र्यांच्या या धुवांधार बॅटिंगचे त्यांच्या चाहत्यांनीही चांगलेच कौतुक केले असून त्यांच्या बॅटिंगचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

CM Eknath Shinde
Satara News : चाळीस कबुतरांचा हाेरपळून मृत्यू, काेणी जाळली ढाबळ; सातारा पाेलिसांपुढे आव्हान

दरम्यान, ठाणे शहरात आयोजित करण्यात आलेली ही सगळ्यात मोठी क्रिकेट स्पर्धा असून यंदा त्यात अनेक संघ सहभागी झाले आहेत. टेम्भी नाका शिवसेना (Shivsena) शाखेचे शाखाप्रमुख निखिल बुडजडे यांच्या पुढाकाराने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आज वेळात वेळ काढून मुख्यमंत्री या स्पर्धेला हजर राहिले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com