Government Hostel Allowances: मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्त्यात वाढ, सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra Cabinet Meeting: मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा दैनंदिन आणि स्वच्छता भत्ता दुप्पट करण्यात आलाय. विद्यार्थी कल्याण आणि आधाराच्या दिशेने एक मोठे पाऊल, असल्याचं म्हटलं जात आहे.
Maharashtra Cabinet Meeting:
MAHARASHTRA GOVERNMENT INCREASES HOSTEL ALLOWANCEsaam tv
Published On
Summary
  • मंत्रिमंडळ बैठकीत ओबीसी विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय.

  • वसतिगृह निर्वाह भत्ता आणि स्वच्छता भत्ता दुपटीने वाढवला.

  • राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना थेट लाभ मिळणार.

  • शिक्षण आणि कल्याण क्षेत्रात सरकारकडून महत्त्वपूर्ण पाऊल.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंगळवारी राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली.या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आठ महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यात नवीन एनिमेशन आणि गेमिंग धोरणाला मंजुरी देण्यात आलीय. तसेच मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या दैनंदिन निर्वाह भत्ता तसेच विद्यार्थींनीसाठीच्या स्वच्छता प्रसाधन भत्त्यात सुमारे दुपटीने वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत मागासवर्गीय मुला-मुलींसाठीच्या शिक्षणासाठी शासकीय वसतिगृहे ही योजना राबविली जाते. राज्यात ४४३ शासकीय वसतिगृहे आहेत. मुलांच्या २३० वसतिगृहात २३ हजार २०८ तर मुलींच्या २१३ वसतिगृहात २० हजार ६५० मुलींची प्रवेश क्षमता आहे. याप्रमाणे शासकीय वसतिगृहात एकूण ४३ हजार ८५८ विद्यार्थ्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात येते. नुकताच आदिवासी विकास विभागाच्या अखत्यारितील वसतिगृहातील मुला-मुलींच्या सोयी-सुविधा भत्त्यांमध्ये वाढ करण्यास ४ जुलै, २०२५ च्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आलीय.

यानुसार सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वसतिगृहातील मुला-मुलींसाठीच्या निर्वाह भत्त्यात आणि मुलींना स्वच्छता प्रसाधनासाठीच्या आणि इतर भत्त्यात वाढ करण्यास मान्यता देण्यात आली. वाढ करण्यात आलेला भत्ता पुढीलप्रमाणे (कंसात सध्याचा भत्ता) विभागस्तर – १ हजार ५०० (८०० रू.), जिल्हास्तर – १ हजार ३०० (६०० रु.), तालुकास्तर – १ हजार (५०० रु.). विद्यार्थिनींसाठी स्वच्छता प्रसाधन भत्ता – दिडशे रुपये (१००रु.). हा भत्ता १ सप्टेंबर २०२५ पासून देण्यात येईल. यानुसार वाढ केल्यामुळे दरवर्षी ८० कोटी ९७ लाख ८३ हजार १४६ रुपयांचा वाढीव खर्चाच्या तरतुदीस मान्यता देण्यात आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com