Maharashtra Budget 2024 Video: अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना काय मिळालं?, एका क्लिकवर वाचा

Maharashtra Budget 2024 Announcement Video: अर्थसंकल्पामध्ये गॅस सिलेंडर, दूध, पेट्रोल-डिझेलबाबत अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला.
Maharashtra Budget 2024: अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना काय मिळालं?, एका क्लिकवर वाचा
Maharashtra Budget 2024 Announcement by Ajit PawarSaam TV

राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी रोजी राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प मांडला. राज्यातील तरुणाईला समोर ठेवून अनेक महत्वपूर्ण निर्णय आणि घोषणा करण्यात आल्या आहेत. तरुणांच्या शिक्षणापासून ते रोजगानिर्मिती अशा प्रत्येक पातळ्यांचा विचार या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे, असं महायुती सरकारचं म्हणणं आहे.

राज्याचे अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांच्या कारकिर्दीतील त्यांनी मांडलेला हा १० वा अर्थसंकल्प आहे. महाराष्ट्राचं दैवत श्री विठ्ठलाचं स्मरण आणि वारीच्या जयघोषात अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडायला सुरुवात केली. या अर्थ संकल्पात अर्थसंकल्पा सर्वसामान्यांना काय मिळालं, हे जाणून घेऊ...

राज्यातील दहा लाख युवकांना प्रत्यक्ष कामावर प्रशिक्षण आणि दरमहा दहा हजार रुपयांपर्यंत विद्यावेतन देणाऱ्या ‘मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजने’ची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली. शासनाच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी दरवर्षी ५० हजार युवकांना कार्यप्रशिक्षण देणे तसेच अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना विदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्तीही दिली जाणार आहे.

इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत दरवर्षी ३८ ते ६० हजार रुपयांपर्यंत निवासभत्ता देण्याची घोषणा या अर्थसंकल्पात अजित पवार यांनी केली. अर्थसंकल्पातील या तरतुदींमुळे शिक्षण आणि रोजगार कसा दुहेरी फायदा राज्यातल्या विद्यार्थी, तरुणांना होणार आहे.

सिलेंडर -

राज्याच्या अर्थसंकल्पामुळे गृहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे. स्वयंपाकातील इंधनाचा आणि महिलांच्या आरोग्याचा जवळचा संबंध आहे. गॅस सिलेंडर प्रत्येक घराला परवडेल यासाठी सरकारने मोठी घोषणा केली आहे. पात्र कुटुंबाला वर्षांला 3 गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत. ही घोषणा करताना अजित पवार यांनी सांगितले की, 'महिलांच्या आरोग्याच्या तक्रारी कमी करायच्या असतील तर सुरक्षित इंधन दिलं पाहिजे. एलपीजी गॅस प्रत्येक घराला देण्यासाठी प्रत्येक पात्र कुटुंबाला ३ गॅस सिलेंडर मोफत देणारी 'मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना' जाहीर करत आहेत. ५२ लाख १६ हजार ४०० कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळेल. यामुळे पर्यावरण संरक्षण केलं जाईल.'

Maharashtra Budget 2024: अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना काय मिळालं?, एका क्लिकवर वाचा
Budget Session 2024 : शेतकऱ्यांना तातडीने कर्जमुक्त करा, पावसाळी अधिवेशनात उद्धव ठाकरेंची मोठी मागणी, पाहा VIDEO

दूध -

⁠गायीच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी प्रति लिटर ५ रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. १ जुलैपासून अनुदान देण्यात येणार आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. दूध दरावरून आज शेतकरी आक्रमक झाले होते. त्यानंतर सरकारने अर्थसंकल्पामध्ये ही घोषणा केली आहे.

Maharashtra Budget 2024: अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना काय मिळालं?, एका क्लिकवर वाचा
Maharashtra Budget 2024 : लाडकी बहीण, अन्नपूर्णा योजना, पिंक रिक्षा; अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून बजेटमधील १० महत्वाच्या घोषणा, VIDEO

पेट्रोल -डिझेल -

पेट्रोल-डिझेलबाबत देखील अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आली आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत पेट्रोल आणि डिझेलवरील मुल्यवर्धित कर २४ टक्क्यांवरून २१ टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. सरकारच्या या घोषणेमुळे पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार आहेत. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील पेट्रोलचा दर साधारण ६५ पैसे आणि डिझेलचा दर साधारण २ रुपये ७ पैसे प्रति लिटरने स्वस्त होणार आहे. त्यामुळे वाहनचालकांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

बस प्रवास -

सर्वसामान्यांचे प्रवासाचे साधन म्हणजे बस. बसद्वारे मोठ्याप्रमाणात सर्वसामान्य नागरिक प्रवास करतात. अशामध्ये अर्थसंकल्पामध्ये याबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे. बस प्रवासात सर्वसामान्यांना सवलत मिळणार आहे. यामुळे त्यांना दिलासा मिळणार आहे.

Maharashtra Budget 2024: अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना काय मिळालं?, एका क्लिकवर वाचा
Maharashtra Budget 2024 Petrol Disel : महाराष्ट्रात पेट्रोल, डिझेल होणार स्वस्त; राज्य सरकारची मोठी घोषणा, मुंबईसह कोणकोणत्या शहरांत दर कमी होणार?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com