Vasant More News: तात्यांचं ठरलं! डॅशिंग नगरसेवक वसंत मोरेंचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश; विधानसभेच्या रिंगणात उतरणार?

Vasant More Meet uddhav Thackeray: डॅशिंग नगरसेवक आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते वसंत मोरे यांनी आज मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
Vasant More News: तात्यांचं ठरलं! डॅशिंग नगरसेवक वसंत मोरेंचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश; विधानसभेच्या रिंगणात उतरणार?
Vasant More Meet uddhav Thackeray: Saamtv

संजय गडदे|मुंबई, ता. ४ जुलै २०२४

राज्याच्या राजकारणात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. विधानसभा निवडणुकांआधी राजकीय पक्षांमध्ये पक्षप्रवेश- सोडचिठ्ठ्यांना ऊत येण्याची शक्यता आहे. याबाबतच आता मोठी बातमी समोर आली असून पुण्याचे डॅशिंग नगरसेवक वसंत मोरे हे ठाकरेंचे शिवबंधन बांधणार असल्याचे समोर आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुण्याचे डॅशिंग नगरसेवक आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते वसंत मोरे यांनी आज मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे, विनायक राऊत आदी नेते यावेळी उपस्थित होते. या भेटीनंतर आता वसंत मोरे हे लवकरच वंचितची साथ सोडून शिवबंधन बांधणार असल्याची माहिती स्वतः वसंत मोरे यांनी दिली आहे.

"९ जुलै रोजी माझा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. मी वंचितमध्ये गेलो होतो मात्र मतदारांनी मला स्विकारलं नाही. मी शिवसेनेचा शाखा प्रमुख होतो, माझा परतीचा प्रवास शिवसेनेकडे होत आहे. शिवसेनेकडून महानगरपालिकेत कडवे आव्हान देऊ, असे वसंत मोरे यांनी सांगितले.

दरम्यान, वसंत मोरे हे खडकवासला आणि हडपसर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे आता ठाकरे गट त्यांना तिकीट देणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तत्पुर्वी लोकसभेच्या तोंडावर वसंत मोरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रामराम ठोकून वंचित आघाडीमध्ये प्रवेश केला होता. वंचित आघाडीकडून त्यांनी निवडणूकही लढवली होती. मात्र या निवडणुकीत त्यांना मोठ्या फरकाने पराभव स्विकारावा लागला. त्यानंतर आता ते विधानसभेत नशीब आजमावणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com