Today Marathi News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामदास आठवलेंची दिल्लीत घेतली भेट

Maharashtra Chya Tajya Marathi Batmya Live (8 june 2024) : पंतप्रधान शपथविधी सोहळा अपडेट, राजकीय घडामोडी, महाराष्ट्रातील राजकारण, सत्तास्थापनेच्या घडामोडी, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर वाचा.
राज्यातील प्रत्येक महत्वपूर्ण घडामोडींचे वेगवान अपडेट वाचा
Today's Marathi News Live Saam tv
Published On

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामदास आठवलेंची दिल्लीत घेतली भेट

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज काळजीवाहू केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची दिल्लीत भेट घेतली

दिल्लीतील सफदजंग मार्गावरील आठवले यांच्या शासकीय निवासस्थानी जवळपास 30 मिनिटे चर्चा झाली

रामदास आठवले उद्या मंत्रिपदाची शपथ घेणार ?

शाहू महाराजांनी सोनिया गांधींची दिल्लीत घेतली भेट

शाहू महाराज यांचा कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात विजय मिळवला आहे. आज दिल्लीत काँग्रेस संसदीय पक्षाची बैठक झाली. त्यानंतर शाहू छत्रपती यांनी राजधानी दिल्लीत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत आमदार सतेज पाटील उपस्थित होते

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उदयनराजेंची दिल्लीत घेतली भेट

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेतली. एकीकडे उदयनराजे भोसले यांच्या मंत्री पदाबाबत जोरदार चर्चा सुरू असताना खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी उदयनराजे यांची घेतलेली भेट यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे

कायम दुष्काळी माण तालुक्याला मुसळधार पावसाचा तडाखा

सातारा जिल्ह्यातील दुष्काळी म्हणून ओळख असणाऱ्या माण तालुक्याला मुसळधार पावसाचा तडाखा.

सलग दोन अडीच तास ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसामुळे परिसरातील ओढे नाले ओसंडून वाहू लागले.

मागील दोन महिन्यापासून या भागांमध्ये पाणीटंचाईला सामना करावा लागत होता परंतु गेल्या दोन दिवसात पडलेल्या पावसाने या भागातील ओढ्या नाल्यांना पूर सदृश्य पाणी आले आहे.

कोल्हापुरातील भाजप बड्या नेत्याच्या पत्नीची 20 लाखांची फसवणूक

कोल्हापुरातील बड्या भाजप नेत्याच्या पत्नीची वीस लाख रुपयांची केली फसवणूक

सीबीआय अधिकारी असल्याचे भासून भाजप नेते समरजित सिंह घाटगे यांच्या पत्नीला घातला वीस लाख रुपयांचा गंडा

मलेशियात पाठवण्यासाठी दिलेल्या पार्सल मध्ये अमली पदार्थ आणि बनावट पासपोर्ट असल्याचं सांगत बोगस कस्टम अधिकारी आणि सीबीआय अधिकाऱ्यांने घातला गंडा

फसवणूक झाल्याचे कळताच शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलाय गुन्हा

संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये काँग्रेस संसदीय पक्षाची बैठक सुरू

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह पक्षाचे इतर खासदार उपस्थित

काँग्रेसच्या संसदीय दलाचा नेता या बैठकीत ठरवला जाईल

घाटकोपर होर्डिंग दुर्घटना, इगो मीडियाच्या पूर्व संचालक जान्हवी मराठे यांना अटक

मुंबई गुन्हे शाखेच्या एसआयटी ने केली इगो मीडियाची पूर्व संचालक जान्हवी मराठेला अटक

सत्र न्यायालयाने अटकपूर्व जमीन फेटाळल्या पासून गुन्हे शाखेचे अधिकारी होते जान्हवीच्या मागावर

गोव्यातून घेतलं गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात

जान्हवीसह कंत्राटदार सागर कुंभारला देखील करण्यात आली अटक

दुर्घटना ग्रस्त झालेलं होर्डिंग बांधल्याचा सागरवर आरोप

मराठा समाजाला प्रचंड त्रास दिला; फडणवीसांच्या विधानानंतर मनोज जरांगे आक्रमक

मराठा समाज कोणत्याही राजकीय पक्षाच्या बाजून नाही, विनाकारण गैरसमज निर्माण करू नये. योजना लागू केल्या पण अनेक अटीशर्थी घातल्या. मराठा तरुणांना प्रचंड त्रास दिला. त्याचा परिणाम निवडणुकीत दिसला. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही तर विधानसभेत एकही आमदार निवडून येणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे.

देवेंद्र फडणवीसांनी सरकारमध्ये राहून पक्षासाठी काम करावं : चंद्रशेखर बावनकुळे

उद्या मोदी तिसऱ्यांदा शपथ घेत आहेत

या शपथविधीबाबत विधिमंडळ गटाने प्रस्ताव ठेवला,

महायुतीचे सर्व आमदार उद्या दिल्लीला शपथविधीला जाणार

उद्या महाराष्ट्रात सर्वत्र जल्लोष साजरा केला जाईल

बुथपर्यंत जल्लोष साजरा करण्याचा प्रयत्न

उद्याचा जल्लोष विकसित भारताचा

दुसरा ठराव देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल होता

फडणवीसांनी सरकारमध्ये काम न करता पक्षासाठी काम करण्याची इच्छा व्यक्त केली,

ही भावना त्यांनी मागे घ्यावी भूमिका मागे घ्यावी, त्यांनी सारकारामध्येच राहून महाराष्ट्रासाठी काम करावं असा ठराव विधिमंडळ गटाने केला आहे, काही जिल्ह्यांतून देखील ठराव आले आहेत

देवेंद्रजी शिवाय महाराष्ट्र अधुरा आहे ही आमची भावना, त्यांनी सरकार आणि संघटनेत काम करावं असं ठराव आम्ही मांडला आहे, ते आमच्या ठरावाला मान्य करतील

कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट, पश्चिम घाट माथ्यासह जिल्ह्याला सतर्कतेचा इशारा

कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी

9,10 आणि 11 जून रोजी कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट

पश्चिम घाट माथ्यासह जिल्ह्याला दक्षतेचा इशारा

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांची माहिती

जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना

पुढील 3 दिवस जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज

Pune News : पुण्यातील इस्कॉन मंदिरासमोरील खोल खड्ड्यात ४ मुली पडल्या

पुण्यात काञज-कोंढवा रस्ता, इस्कॉन मंदिरासमोरील अंदाजे १०\१५ फुट खोल खड्डयामधील साचलेल्या पाण्यात ४ मुली पडल्याची घटना घडली आहे. स्थानिकांनी ३ मुलींना तातडीने सुरक्षित बाहेर काढले. तर अग्निशमन दलाच्या जवानांनी जखमी अवस्थेत चौथ्या मुलीला पाण्यातून बाहेर काढलं. त्यानंतर या मुलीला उपचाराकरिता रुग्णालयात रवाना केले. मात्र, या घटनेन एका मुलीचा मृत्यू झाला आहे.

इगतपुरीत धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात यश

इगतपुरीच्या धम्मगिरी आणि परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलं आहे. मागील काही दिवसांपासून धम्मागिरी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार होता. पाळीव जनावरांवर हल्ले करून बिबट्यानं अनेक जनावरांचा फडशा पाडला होता.

प्रफुल पटेल यांच्या नावावर मंत्रिपदासाठी शिक्कामोर्तब?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रफुल पटेल यांच्याच नावावर मंत्रिपदासाठी शिक्कामोर्तब असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नेत्यांच्या दिल्लीत पार पडलेल्या बैठकीत प्रफुल पटेल यांच्या नावावर राष्ट्रवादीकडून शिक्कमोर्तब झाल्याची माहिती मिळत आहे. प्रफुल पटेल उद्या कॅबिनेट दर्जाच्या मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून वर्धापन दिनाचं आयोजन

अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचा वर्धापनदिन दहा तारखेला षणमुखानंदमध्ये होणार आहे.

यासाठी पक्षाच्या सर्व नेत्यांना कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आलं आहे.

तर शरद पवार गटाचा वर्धापन दिन 10 जूनला नगरमध्ये होणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर दोन्ही वर्धापनदिनाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मुंबई विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई; साडेपाच कोटी रुपयांचं सोन केलं जप्त

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून तब्बल साडेपाच कोटी रुपयांचं सोनं जप्त करण्यात आले आहेत. कस्टम विभागाने ही कारवाई केली आहे. लोखंडी रॉड, अंतर्वस्त्र तसेच गुद्वारातून सोन्याची तस्करी सुरू होती.

केदारनाथच्या बोगस नोंदणीचा महाराष्ट्रातल्या पर्यटकांना फटका

केदारनाथच्या बोगस नोंदणीचा महाराष्ट्रातल्या पर्यटकांना फटका बसला आहे. केदारनाथला केलेलं रजिस्ट्रेशन बोगस निघालं. स्थानिक रजिस्ट्रेशनधारकाकडून मराठी पर्यटकांची फसवणूक केली आहे. केदारनाथचं ऑन द‌ स्पॉट रजिस्ट्रेशन बोगस निघालं आहे. पोलिस ठाण्यात‌ तक्रार झाल्यानंतर पर्यटकांचं केदारनाथचं दर्शन झालं.

Sangli News : सांगलीचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील मातोश्रीवर

सांगलीचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील मातोश्रीवर पोहोचले आहेत. सांगलीतून पराभूत झाल्यानंतर पहिल्यांदाच चंद्रहार पाटील मातोश्रीवर आले आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्गचे उमेदवार विनायक राऊत देखील ठाकरेंच्या भेटीला आले आहेत. नारायण राणे यांच्याकडून हरल्यानंतर पहिल्यांदाच विनायक राऊत मातोश्रीवर आले आहेत.

Narendra Modi :  नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीची कार्यक्रम पत्रिका आली समोर

नरेंद्र मोदी यांच्या उद्याच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याची कार्यक्रम पत्रिका समोर आली आहे.

Sanjeev Naik : संजीव नाईक यांना पंतप्रधान शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण

नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा दिल्लीत पंतप्रधान शपथविधी सोहळा होणार आहे.

मोदी पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी विराजमान होणार आहेत.

नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला माजी खासदार संजीव नाईक यांना देखील निमंत्रण मिळाले आहेत.

Amit Deshmukh : लातूरमध्ये अमित देशमुख यांचे भावी मुख्यमंत्री आशयाचे बॅनर

लातूर जिल्ह्यात अमित देशमुख यांचे भावी मुख्यमंत्री या आशयाचे बॅनर

काँग्रेस पक्षाच्या शिरपेचात मानाचा तुरा लावणारे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री अमित देशमुख यांना लक्षवेधी शुभेच्छा अशा आशयाचे बॅनरच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत.

या बॅनरमुळे अनेकांच्या भवया या उंचावले आहेत

ठाकरे गटाचे २ खासदार शिंदे गटाच्या संपर्कात; खासदार नरेश म्हस्के यांचा दावा

ठाकरे गटाचे २ खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी केला आहे. ठाकरे गटाच्या दोन खासदारांना मोदींना पाठिंबा द्यायचा आहे. अपत्रतेचा विषय असल्यामुळं ते थांबले असून ६ लोकांना जमून एकत्र येणार आहेत, असा दावा नरेश म्हस्के यांनी केला आहे.

Manoj Jarange Patil :  मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला ग्रामस्थांचा पाठिंबा

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला ग्रामस्थांनी पाठिंबा दिला आहे. सरपचं सदस्य आणि ग्रामसेवकांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

BJP News : शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर भाजप शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता

नरेंद्र मोदी उद्या तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथविधी घेणार आहे. यासाठी भाजपचे सर्व आमदारांना दिल्लीत शपथविधीच्या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आला आहे. भाजपकडून उद्या दिल्लीमध्ये शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे.

शिर्डीत साईभक्तांची मांदियाळी

उन्हाळी सुट्ट्यांचा शेवटचा आठवडा आणि शनिवार, रविवारच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत भाविकांची मांदियाळी

साई भक्तांनी मोठ्या संख्येने शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी गर्दी केल्याचे चित्र

सलग सुट्ट्यांचा हा शेवटचा आठवडा असल्याने शिर्डीत साईभक्तांचा ओघ

साई मंदिर परिसरासह शिर्डीतील रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले आहेत.

नंदुरबारमधील मुंदलवळ गावात वीज कोसळून एकाचा मृत्यू

नंदुरबार जिल्ह्यातील मुंदलवळ गावात वीज कोसळून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

पाऊस येत असल्यामुळे एका झाडाखाली थांबलेल्या 2 युवकांवर वीज कोसळली.

घटनास्थळी नातेवाईकांचा एकच आक्रोश पाहायला मिळाला. वीज कोसळताच एकाचा जागीच मृत्यू तर एकाची प्रकृती गंभीर झाली.

गंभीर युवकास उपचारासाठी धडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं आहे.

Manoj Jarange Patil : मी माझ्यावर मतावर ठाम, आमरण उपोषण करणार - मनोज जरांगे पाटील

मनोज जरांगे उपोषणस्थळी पोहोचले आहेत. आजपासून मनोज जरांगे यांच्या उपोषणाला सुरुवात होत आहे. यावेळी मनोज जरांगे यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले. मी माझ्यावर मतावर ठाम, आमरण उपोषण करणार असल्याचे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.

Pune Builder : सुरेंद्र अग्रवाल, विशाल अग्रवाल यांच्या अडचणी वाढल्या, पोलिसांत आणखी एक गुन्हा

सुरेंद्र अग्रवाल, विशाल अग्रवाल विरोधात आणखी एक गुन्हा नोंद झाला आहे. फसवणुकीचा व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे. शब्बीर मोमीन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पिता आणि पुत्र विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमिनीच्या व्यवहारात आर्थिक फसवणूक आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एक कोटी ३२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Dharashiv Lok Sabha : सत्काराला हार तुरे ऐवजी वह्या पुस्तके घेऊन या; खासदार ओमराजेंच्या आवाहनाला कार्यकर्त्यांकडून प्रतिसाद

धाराशिवचे ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर हे सलग दुसऱ्या वेळी मोठ्या मताधिक्याने निवडून आले. त्यामुळे लोकसभा मतदारसंघातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी सत्काराला येत आहेत. त्यामुळे सत्काराला येताना हार तुरे आणण्या ऐवजी वह्या पुस्तके शालेय साहित्य आणावे ,असे आवाहन ओमराजे निंबाळकर यांनी केले होते. या आवाहनाला कार्यकर्त्यांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. जमा झालेले शालेय साहित्य हे गरजु विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत.

Ghatkopar Tragedy :  घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी मोठी अपडेट, VJTIच्या अंतरिम चौकशी अहवालात खुलासा

होर्डिंगचा पाया कमकुवत असल्याचा VJTI च्या अंतरिम चौकशी अहवालात खुलासा झाला आहे. 13 मे रोजी पेट्रोल पंपावर कोसळलेल्या होर्डिंगचा पाया वाऱ्याचा जोर रोखण्यास सक्षम नव्हता, असे अहवालातून समोर आले आहे. VJTI मधील अभियांत्रिक स्ट्रक्चरल विभागाच्या प्राध्यापकांच्या पथकाने सादर केलेल्या अंतरिम तपासणी अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. दुर्घटनेत १७ जणांचा झाला. तर ७४ जम जखमी झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com