(अश्विनी जाधव- केदारी)
पुणे -पुणे महापालिकेच्या शेवटच्या दिवशी पालिकेत मनसेने महापालिकेत आंदोलन केले. शहरातील अनेक ठिकाणी पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने हे आंदोलन करण्यात आले. पालिकेत मनसेचे शहराध्यक्ष वसंत मोरे आणि कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या
(सुशांत सावंत)
मुंबई - चक्क दावूदची माणसं वक्फ बोर्डावर नियुक्त केली आहेत, असे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या सरकारवर आणखी एक पेन ड्राईव्ह बाँब टाकला आहे....सविस्तर वृत्त काही वेळातच
(संभाजी थोरात)
कोल्हापूर - महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न
गावातील वीज तोडल्याने संतप्त नागरिक आक्रमक
बीड, महे, वाशी येथील वीज न नोटीस देता तोडली कनेक्शन
कार्यालयातच अंगावर ओतून घेतले डिझेल
(सूरज सावंत)
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख जामीन अर्ज कोर्टाने नाकारला
मुंबई सत्र न्यायालय विशेष पीएमएलए कोर्टाचा महत्वाचा आदेश
अनिल देशमुख यांना दिलासा नाहीच
100 कोटी वसुली मनी लाँड्रिंग प्रकरणात देशमुख यांना ईडीने अटक केली होती
सध्या देशमुख आर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत .
नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक 20 चा अजब कारभार.
चक्क विद्यार्थ्यांकडून मारून घेतला झाडू.
शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून करून घेतली शाळेची स्वच्छता.
आज पासून नवी मुंबई मनपा क्षेत्रातील कंत्राटी कामगारांनी पुकारले कामबंद.
सफाई कामगारही आंदोलनात सहभागी.
सफाई कामगार न आल्याने शाळेने विद्यार्थ्यांकडूनच मारून घेतला झाडू.
(सुशांत सावंत)
मुंबई - पालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसे गुढीपाडवा दणक्यात साजरा करणार
-गुढीपाडवा तयारीसाठी मनसेची आज वांद्रे एमआयजीला बैठक
- मनसे अध्यक्ष राज ठाकरे या बैठकीत मार्गदर्शन करणार
- मनविसेचे नवनियुक्त अध्यक्ष अमित ठाकरे हेदेखील या बैठकीस उपस्थित राहणार
(रश्मी पुराणिक)
मुंबई - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या पेनड्राईव्ह प्रकरणातील आरोपांवरुन भाजप आज विधीमंडळ अधिवेशनात आक्रमक होण्याची शक्यता आहे. आज गृहमंत्री वळसे पाटील हे फडणवीस यांच्या आरोपांना उत्तर देणार आहेत. याबाबत महाविकास आघाडीची काही वेळात विधानसभा अध्यक्ष दालनात बैठक होणार आहे.
(अभिजित सोनवणे)
नाशिक - महापालिका निवडणुका लांबल्याने नाशिक महापालिकेवर आतपासून प्रशासकीय राजवट लागू झाली आहे. आयुक्त कैलास जाधव महापालिकेचा कारभार पाहणार आहेत. महापौर आणि इतर महत्वाच्या नेत्यांना मनपाकडून मिळणाऱ्या सर्व सुविधा आजपासून बंद करण्यात येणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.