Breaking Marathi News Live : मंगला एक्स्प्रेसमध्ये संशयित बॅग, श्वान पथक घटनास्थळी

Maharashtra Latest Marathi Batmya 25 Jan 2024: राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा. मनोज जरांगे पाटील लाखो मराठा बांधवांसह आज नवी मुंबईत दाखल होणार आहे.
Breaking News Live Updates in Marathi (25 January 2024) on Maratha Aarakashan, Manoj Jarange Patil, Rohit Pawar and from overall Maharashtra
Breaking News Live Updates in Marathi (25 January 2024) on Maratha Aarakashan, Manoj Jarange Patil, Rohit Pawar and from overall MaharashtraSaam TV
Published On

मंगला एक्स्प्रेसमध्ये संशयित बॅग, श्वान पथक घटनास्थळी

रत्नागिरीत मंगला एक्स्प्रेसमध्ये संशयित बॅग आढळली. यामुळे ट्रेन तातडीने रत्नागिरी स्थानकात थांबवली. यानंतर श्वान पथक तातडीने घटनास्थळी पोहोचलं.

राजपत्र घेवून मुख्यमंत्र्यांचं शिष्टमंडळ निघालं जरांगेच्या भेटीला

३ महत्वाचे जीआर आणि एक राजपत्र घेवून मुख्यमंत्री यांचे शिष्ट मंडळ जरांगे च्या भेटीला निघाले

या सर्व जियारा वर सही करण्यासाठी तातडीने मुख्यमंत्री गावावरून परतले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यानी याबाबत लागलीच एक बैठक घेवून सूचना केल्यात

ज्या ठिकाणी जरांगे असतील त्या ठिकाणी हे शिष्ट मंडळ भेट घेणार

लोणावळा किंव्हा खालापूर

शरद पवार गटाकडून तटकरेंवर प्रश्नांचा भडिमार, राष्ट्रवादी आमदार अपात्रतेच्या आजच्या सुनावणीत काय झालं?

वकिल- १० जून २०२३ ला तुम्ही राष्ट्रीय कोशाध्यक्ष म्हणून नेमणुक करण्यात आली होती का?

सुनिल तटकरे- होय माझी नेमणुक झाली होती.

वकिल- तुमची नेमणुक ही शरद पवार यांनी अध्यक्ष या नात्याने केली होती.

सुनिल तटकरे- होय माझी नेमणुक झाली होती.

वकिल- तुम्ही प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या तुमच्या फॅार्म बी वर सही करण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता का?

सुनिल तटकरे - होय मला नेमणुक करण्यात आलेल्या फॉर्मवर प्रदेशाध्यक्ष यांनी सही केली होती.

वकील

तुम्ही कधी तरी प्रदेशाध्यक्ष यांच्या नेमणुकीबद्दल किंवा घटनेत तशी तरतुद नसल्याबद्दल तक्रार केली होती का?

सुनिल तटकरे- नाही. त्यावेळी तो प्रश्न उपस्थित झाला नव्हता.

ओबीसी आंदोलनालाही आझाद मैदानावर परवानगी नाकारली

ओबीसी जनमोर्चाच्या वतीने दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी आझाद मैदान येथे होणाऱ्या धिक्कार आंदोलनासाठी परवानगी मागितली होती. मात्र आझाद मैदान पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. ओबीसीनेते प्रकाश शेंडगे यांनी ही परवानगी मागितली होती.

मराठा बांधव मागास ठरत नाही त्यामुळे आरक्षण मिळू शकत नाही : गुणरत्न सदावर्तेंचा दावा

नियमाचे उल्लंघन झाले तर अप्रदिक मामला रजिस्टर होऊ शकतो.

उच्च न्यायालयाच्या निकालाचा अवमान केला तर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट खाली सर्वसंबंधित जे कोणी नेते असतील त्यांच्यावर कारवाई होऊ शकते.

याच्यामागे सगळ्यात मोठा राजकीय डाव आहे.

एका बाजूला स्वतः सांगायचं जायचं नाही आणि नंतर लोकांमध्ये संभ्रम पसरवायचा

स्वतःला वाचवायचा आणि इतरांना तोफेच्या तोंडाला द्यायचं

सामान्य कुटुंबांनी लक्षात ठेवलं पाहिजे हे राजकीय षडयंत्र आहे या षडयंत्राला तुम्ही बळी पडू नका.

कायद्याचं पालन करा मराठा बांधव मागास ठरत नाही त्याच्यामुळे आरक्षण मिळू शकत नाही हे सगळ्यात महत्त्वाची बाब आहे.

केवळ राजकारणातून माझ्यावर ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप , अजित पवारांचा दावा

राजकारणात हेतु पुरस्कार आरोप केले जातात

माझ्यावर ७० हजार कोटीचा आरोप केला

जोरात चालला म्हणून आडवायला मोठा आरोप केला असं सांगण्यात आलं

भष्ट्राचाराच्या आरोपावर अजित पवारांचा मोठा खुलासा

PM नरेंद्र मोदी नाशिकमधून निवडणूक लढवणार? सूत्रांची माहिती

PM नरेंद्र मोदी नाशिकमधून निवडणूक लढवण्याची शक्यता

महाराष्ट्रात भाजप मोठी राजकीय खेळी करण्याच्या तयारीत

ठाकरे गटाच्या नेत्यांच्या मागे ईडीची पीडा, रविंद्र वायकरांना पुन्हा समन्स

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप तूर्तास स्थगित

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप तूर्तास स्थगित करण्यात आला आहे.

26 जानेवारीपासून सर्व राज्यातील अंगणवाडी कर्मचारी कामावर रुजू होणार

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे सुरू असलेल्या संपाबाबत महिला आणि बाल विकास सचिव यांच्या कक्षात आज बैठक पार पडली.

यात अनेक मुद्द्यावर चर्चा होऊन अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने सुरू असलेला अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप तुर्तास स्थगित करण्यात आला आहे.

अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे निमंत्रक दिलीप उटाणे यांची माहिती.

गडचिरोली पोलीस दलातील 18 जवानांना शौर्यपदक

गडचिरोली पोलीस दलात कार्यरत 18 जवानांना शौर्य पदक जाहीर झाले आहे. यामध्ये माजी अप्पर पोलीस अधीक्षक तथा विद्यमान लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचाही समावेश आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागात कार्यरत राहून नक्षलवाद्यांशी लढा दिल्याने हे शौर्यपदक जाहीर झाले आहे. प्रजासत्ताकदिनी या जवानांना सन्मानित केलं जाणार आहे.

Breaking News Live Updates in Marathi (25 January 2024) on Maratha Aarakashan, Manoj Jarange Patil, Rohit Pawar and from overall Maharashtra
Prakash Ambedkar: 'मनाचे खेळ खेळत आहात...' मविआकडून निमंत्रण येताच प्रकाश आंबेडकर संतापले; पटोलेंवर हल्लाबोल

अजित पवारांच्या ताफ्यावर मराठा कार्यकर्त्यांच्या मोर्चा

अजित पवारांच्या ताफ्यावर मराठा कार्यकर्त्यांच्या मोर्चा

आळेफाटा चौकात काळे झेंडे दाखवण्याचा केला प्रयत्न

एक मराठा लाख मराठा अशा घोषणाबाजी करत अजित पवारांचा ताफा रोखण्याचा केला प्रयत्न

आंदोलकांना आळेफाटा पोलिसांनी घेतले ताब्यात

मराठा आरक्षण आंदोलनासाठी आझाद मैदानातील स्टेट उभारणीचं काम थांबवण्याचे आदेश

मराठा आरक्षणासाठी आजाद मैदान येथे स्टेज उभारणी सुरु असताना पोलिसांकडून मराठा समन्व्यक वीरेंद्र पवार, प्रशांत सावंत यांना नोटीस पाठवून काम थांबवण्यास सांगितले. नोटीसच्या विरोधात वीरेंद्र पवार हायकोर्टात जात आहेत.

Manoj Jarange: मनोज जरांगेंची शिष्टमंडळासोबतची बैठक निष्फळ

सरकारच्या शिष्टमंडळासोबत अजून एक बैठक होणार

सध्या आहे तिथेच थांबू

शिष्टमंडळ आल्यावर पुन्हा एकदा चर्चा

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी योग्य तोडगा काढण्याच आवाहन

1960 पासून अनेक मराठा मुख्यमंत्री झाले, पण आताचे मुख्यमंत्री आरक्षणावर तोडगा काढतील; मुंनगंटीवार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकारात्मक पद्धतीने आरक्षणाच्या विषयावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत. 1 मे 1960 पासून अनेक मराठा मुख्यमंत्री झाले, मात्र आताचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हा विषय सोडू शकतात म्हणून जरांगे मागणी करत आहेत.

BMC कोविड काळातील कथित खिचडी घोटाळा

कोविड काळातील कथित खिचडी घोटाळा प्रकरणी सूरज चव्हाणांना 7 फेब्रुवारीपर्यंत न्यायलयीन कोठडी

न्यायमूर्ती एम जी देशपांडे कोर्टाचा निर्णय, खिचडी घोटाळ्यात सूरज चव्हाण आहेत आरोपी

युवासेना सचिव असलेले सूरज चव्हाण आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय

Latur News: लातूरमध्ये पुन्हा मराठा आरक्षणासाठी 27 वर्षीय तरुणाची आत्महत्या

लातूरमध्ये पुन्हा मराठा आरक्षणासाठी 27 वर्षीय तरुणाची आत्महत्या

लातूर जिल्ह्यातल्या उदगीर तालुक्यातील वाढवण गावात राहणाऱ्या माधव भांगे या तरुणाची आत्महत्या

स्वतःच्या शेतात गळफास घेत संपवलं जीवन

लातूर जिल्ह्यात आतापर्यंत मराठा आरक्षणासाठी एकूण 8 मराठा बांधवांच्या आत्महत्या

मनोज जरांगे पाटील मुंबईत जाण्यावर ठाम

मनोज जरांगे पाटील मुंबईत जाण्यावर ठाम

आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही- मनोज जरांगे

आपल्या मोर्चामुळे कुणाला त्रास होता कामा नये, मराठा बांधवांना आवाहन

मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस अॅक्टिव्ह मोडमध्ये

मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस अॅक्टिव्ह मोडमध्ये

मोर्चात सहभागी होणाऱ्या मुंबईतील कार्यकर्त्यांना पोलिसांनी बजावल्या नोटीसा

मुंबईतील जनजीवन विस्कळीत होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कायदेशीर कारवाईचा दिला इशारा

प्रत्यक्ष मोर्चात सहभाग झालेला जनसमुदाय, आयोजक तसेच मोर्चाला आर्थिक व इतर प्रकारे मदत करणार्या सर्वांना वैयक्तिकरित्या जबाबदार धरणार : मुंबई पोलीस

आंदोलकांना कायदेशीर कारवाईचा मुंबई पोलिसांचा इशारा

Supriya Sule: सुप्रिया सुळे आमदार अपात्रता सुनावणीसाठी उपस्थित राहणार

सुप्रिया सुळे आमदार अपात्रता सुनावणीसाठी उपस्थित राहणार

शरद पवार हे सुद्धा सुनावणीला उपस्थित राहण्याची शक्यता

आज अजित पवार गटाच्या आमदार खासदारांची साक्ष नोंदवली जाणार

आज सुनील तटकरे आणि अनिल पाटील यांची साक्ष नोंदवली जाणार आहे

Solapur News: सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोथिंबिरला कवडीमोल किंमत

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोथिंबिरला कवडीमोल किंमत

कोथिंबीरीला १ रुपये प्रति पेंडीही मिळत नाहीये भाव

कोथिंबीर उत्पादक शेतकऱ्याने वैतागून रस्त्यावर फेकून दिली कोथिंबीर

शेत पिकाला हमीभाव द्या, अन्यथा गांजा लागवड करण्याची परवानगी सरकारने द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली

राहुल यांची यात्रा आज पश्चिम बंगालमध्ये प्रवेश करणार

राहुल यांची यात्रा आज पश्चिम बंगालमध्ये प्रवेश करणार

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीबाबत काल घेतली आहे भूमिका

त्यानंतर आज पश्चिम बंगालमध्ये येत असलेल्या यात्रेला महत्व

ममता यांनी यात्रेत सहभागी व्हावं यासाठी यापूर्वीच काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना पत्र लिहिली आहेत

ममता बॅनर्जी यात्रेत सहभागी होतात का याकडे सर्वांचं लक्ष

उद्धव ठाकरे ४ आणि ५ फेब्रुवारीला कोकण दौऱ्यावर

उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर जाणार

उद्धव ठाकरे यांचा दोन दिवसांचा कोकण दौरा

4 फेब्रुवारी आणि 5 फेब्रुवारी उद्धव ठाकरे यांची संवाद यात्रा

सिंधुदुर्गपासून संवाद यात्रेला सुरुवात

5 फेब्रुवारीला रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर

राज्यभरातील मराठा बांधव एपीएमसी मार्केटमध्ये येण्यास सुरुवात

मराठा आंदोलक आज नवी मुंबईत मुक्कामाला येणार असून मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातील मराठा बांधव नवी मुंबईतील एपीएमसी बाजारपेठेत दाखल होण्यास सुरुवात झाली. हलगीच्या तालावर जोरदार घोषणाबाजी करत हे मराठा बांधव दाखल झाले असून आरक्षण घेतल्या शिवाय आम्ही जाणार नसल्याची प्रतिक्रिया मराठ्यांनी व्यक्त केलेय.

नागपुरात थंडीचा जोर वाढला, आज 8.7 अंश तापमानाची नोंद

नागपुरात थंडीचा जोर वाढला, आज 8.7 अंश तापमानाची नोंद

24 तारखेला 14.6 अंश तापमान नोंदवले

आज अचानक तापमानाचा पारा खाली

5.9 अंशानी तापमानाचा पार घसराला.

नाशिक शहरात आजपासून पुन्हा मनाई आदेश लागू

नाशिक शहरात आजपासून पुन्हा मनाई आदेश लागू

२५ जानेवारी ते ८ फेब्रुवारीपर्यंत १५ दिवसांसाठी शहरात मनाई आदेश लागू

मनाई आदेशाच्या कालावधीत पोलिसांच्या परवानगीशिवाय कुठल्याही प्रकारचे आंदोलन अथवा सभा घेता येणार नाही

५ पेक्षा जास्त लोक एकत्र येण्यासाठी पोलीस आयुक्तांची परवानगी आवश्यक

विना परवानगी मोर्चे, आंदोलनांना मनाई

स्फोटक पदार्थ,शस्त्र बाळगण्यास,पुतळ्याचे दहन करण्यास देखील सक्त मनाई

ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर आज चौकशीला हजर न राहण्याची शक्यता

कोविड बाॅडी बॅगप्रकरणी ईडीने चौकशीला बोलवलेल्या ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर आज चौकशीला हजर न राहण्याची शक्यता

किशोरी पेडणेकर ईडीकडे वेळ वाढवून मागणार असल्याची सूत्रांची माहिती

किशोरी पेडणेकर यांचे वकील आज ईडी कार्यालयात उपस्थित राहणार असल्याची माहिती

महाविकास आघाडीच्या आज मुंबईत लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाची महत्वाची बैठक

मुंबईत महाविकास आघाडीच्या लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाची महत्वाची बैठक

ट्रायडेंट हॉटेलमध्यान द्याज सकाळी 11 वाजता बैठकीचं आयोजन

आजच्या बैठकीत मतदारसंघनिहाय चर्चा होणार

या बैठकीत काही जागांवर सहमती झाली नाही तर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात दिल्लीत आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक होऊन त्यात अंतिम जागावाटप होईल

आतापर्यंत ३० जागांचं वाटप झालंय, त्यात जो पक्ष‌ जागा जिंकून येतो ती जागा त्या पक्षाला असा फॉर्म्युला

उरलेल्या १८ जागांवर चर्चा अपेक्षित

ठाकरे गटाने २३ जागांचा प्रस्ताव ठेवला आहे

ठाकरे गटाच्या कोट्यातून दोन जागा वंचितला, तर राजू शेट्टी यांना हातकणंगलेची जागा पवार गटाच्या कोट्यातून मिळण्याची शक्यता

आजच्या बैठकीसाठी वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण, मात्र वंचितने निमंत्रण न मिळाल्याने बैठकीला उपस्थित राहण्याचा निर्णय घेतलाय

कोल्हापुरात गर्भलिंग निदान प्रकरणातील तीन एजंट्सना अटक

कोल्हापुरात गर्भलिंग निदान प्रकरणातील तीन एजंट्सना अटक

कोल्हापुरातील वाशी नाका इथे 17 जानेवारी रोजी बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरण आलं होतं उघडकीस

या तीनही एजंट्सनी गर्भलिंग निदानासाठी प्रत्येकी दोन ते तीन ग्राहक शोधून बनावट डॉक्टर स्वप्निल पाटील यांच्यापर्यंत पोहोचवल्याची तपासत माहिती

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com