गौतमी पाटील हिची लावनी सुरू असतानाच अचानक स्टेज वरील स्पिकर जवळ काहीशी आग लागली होती..आगीची ठिणगी लागली ही लक्षात येताच गौतमी पाटीलचे सुरक्षा रक्षक धावून गेले आणि त्यांनी आग विझवली त्यामुळे अनर्थ टळला.
'महायुतीत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा नाही. बहुमत मिळाल्यानतर मुख्यमंत्री ठरवला जाईल, असा दावा अजित पवारांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.
पुण्यातील खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा 11704 क्युसेक्स विसर्ग वाढवून वा. 16159 क्यूसेक्स करण्यात आला आहे.
नदीपात्रातील अनेक गाड्या पाण्यात
पुणे पोलिसांकडून सूचना देण्यात येत आहे
काही वेळात वाहतुकीसाठी रस्ता बंद करण्यात येणार
शिवाजीनगर पोलीस नागरिकांना सूचना देत आहेत
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची मुंबई पोलीस उपआयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. पुण्यातील पोलीस उपायुक्त संदीप गिल यांची पुन्हा जिल्हा ग्रामीण अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सांगलीच्या कृष्णा नदीत दोन तरुण वाहून गेले. एका गणेश मंडळाची गेल्या वर्षीची जुनी गणेश मूर्ती विसर्जन करताना घटना घडली.अक्षय बनसे,वय 20 आणि आदी रजपूत,वय 17 असे वाहून गेलेल्या दोघांची नावे आहेत.
नवी मुंबईकरांना बाप्पा पावला आहे. अखेर नवी मुंबईतील सर्व शाळांना (सीबीएसई/आयसीएसई/सरकारी/खाजगी) गणेशोत्सवाच्या ७ दिवस सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
आमदार भीमराव तापकीर यांनी केली पक्षश्रेष्ठीसमोर खंत व्यक्त 'माझं नाव कार्यकर्त्यांनी उमेदवारी मागताना माझ्या नावाची बदनामी करू नये. आपली रेष कशी मोठी होईल हे बघितलं पाहिजे दुसऱ्याची रेष कमी करू नका. लोकशाहीत सर्वांना तिकीट मागण्याचा अधिकार आहे.तिकीट मागणी करताना चांगल्या पद्धतीने केली पाहिजे लोकांची बदनामी होता कामा नये, असे भीमराव तापकीर म्हणाले.
सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात एका दाम्पत्याने एकाच व्यक्तीच्या नावाने लाडकी बहीण योजनेचे 30 अर्ज भरून पैसे लाटण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात या दांपत्याला न्यायालयाने तीन दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. खटाव तालुक्यातील प्रतीक्षा जाधव आणि तिचा पती गणेश घाडगे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा गैर फायदा घेतल्याने त्यांच्यावर वडूज पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. याप्रकरणी न्यायालयाने त्यांना तीन दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत एकूण 78 कोटी रुपयांचे आराखडे मजुरी देण्यात आली.
श्री क्षेत्र रिद्धपूर, ता. मोर्शी, जि. अमरावती (₹25 कोटी मंजूर)
श्री क्षेत्र पांचाळेश्वर ता. गेवराई, जिल्हा बीड (₹7.90 कोटी मंजूर)
श्री क्षेत्र पोहीचा देव, कोळवाडी, ता. जि. बीड (₹4.54 कोटी मंजूर)
श्री जाळीचा देव, ता. भोकरधन, जिल्हा जालना (₹23.99 कोटी)
श्री गोविंद प्रभू देवस्थान, भिष्णूर, ता. आष्टी, जिल्हा वर्धा (₹18 कोटी)
गणेशोत्सव काळात महामार्गावर अवजड वाहतूक बंदीचे तीनतेरा वाजलेत. मध्यरात्रीपासून मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांच्या वाहतुकीला बंदी असताना आज सकाळपासूनच महामार्गावर अवजड वाहनांची वाहतूक सुरू होती. गणेशोत्सवादरम्यान मुंबई गोवा महामार्गावर चाकरमानी गणेश भक्तांना प्रवासात अडथळा होऊ नये यासाठी जिल्हाधिका रायगड यांनी मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी घातली होती.
या बंदी आदेशाचे उलंघन करीत आज शेकडो अवजड वाहन मुंबई गोवा महामार्गावरून धावत होती. मोठा पोलीस बंदोबस्त वाहतूक सुरळीत करण्यासाठी महामार्गावर तैनात करण्यात आला होता. मात्र जिल्हाधिकारी यांच्या बंदीच्या आदेशाचा भंग करीत धावणाऱ्या अवजड वाहनांकडे कुणाचही लक्ष नव्हते.
राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पिकाची पाहणी केल्यानंतर, आता जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे हे देखील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर गेले आहेत. अतिवृष्टीने बीड जिल्ह्यात थैमान घातल असताना शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झालं आहे. आज बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे यांनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली असून शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची मागणी केलीय.
नवी मुंबई मनपामध्ये 14 गावांच्या समावेशा वरून गणेश नाईक विरुद्ध विजय चौगुले असा संघर्ष पुन्हा उफाळून आलाय. भाजपा आमदार गणेश नाईक यांनी 14 गावांच्या समावेशाला विरोध दर्शविला असताना शिवसेना शिंदे गटातर्फे मात्र 14 गावांच्या समावेशाला पाठिंबा दर्शविण्यात आलाय. 14 गावांच्या विकासासाठी अडवली येथील 300 एकर जमीन सिडको अथवा एमआयडीसीला हसतांतरित करुन त्यातून येणाऱ्या निधी मधून 14 गावांचा विकास करावा अशी भूमिका शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय चौगुले यांनी व्यक्त केलंय.
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातल्या वाकद येथील जि.प.प्राथमिक शाळेतील मुलांचे मध्यान्ह भोजन योजनेचे तांदूळ आणि इतर साहित्य शाळेतीलच मुख्याध्यापक आपल्या सहकाऱ्यांच्या सोबतीने लंपास करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. मात्र गावातील नागरिकांनी हा सगळा प्रकार उघडकीस आणलाय. मध्यरात्री काही अज्ञात व्यक्तीनी धान्य लंपास करण्यासाठी पिकप गाडी आणली आणि या मुख्याध्यापकाला हाताशी धरून हे धान्य या गाडीत भरले आणि काळ्या बाजारात विकण्यासाठी घेऊन निघाले मात्र, गावकऱ्यांना याची कुणकुण लागताच त्यांचा चोरीचा प्रयत्न हाणून पाडला. दरम्यान 8 ते 9 गोण्या या गाडीत भरण्यात आल्या होत्या आणि ही गाडी काळ्या बाजारात जाण्याऐवजी पोलीस स्टेशनला गेली आणि या मुख्याध्यापकावर पिशोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
नव्या परिपत्रकानुसार आत्महत्या केलेल्या शेजाऱ्यांच्या वारसांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधीतून मदत देण्याचा कार्यवाहीचे आदेश देण्यात असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. यापूर्वी काढलेल्या परिपत्रकानुसार शेतकरी आत्महत्यांचा अंदाज बांधता येत नसल्याचं मदत बंद करण्यात असल्याचं कारण महसूल व वन विभागाने दिलं होतं.
धाराशिवच्या परंडा तालुक्यातील खंडेश्वरवाडी प्रकल्पाची तात्काळ दुरुस्ती करावी या मागणीसाठी भूम उपविभागीय अधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांनी जन आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय.ग्रामस्थांकडून वारंवार मागणी करूनही सदरील प्रकल्पाच्या दुरुस्तीचे काम करण्यासाठी प्रशासनाकडून वेळ काढू पणा केला जात असुन त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांसह नागरिकांचे मोठे हाल होताना पाहायला मिळत आहेत.याच अनुषंगाने शेतकरी आज चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर चक्काजाम करत प्रशासनाला जाब विचारण्यात आला.येत्या पंधरा दिवसात काम सुरू करा अन्यथा प्रकल्पात जलसमाधी आंदोलन करू असा इशारा यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी दिलाय.
बदलापूरमधील दोन मुलींवरील अत्याचार प्रकरणी आरोपी अक्षय शिंदेला कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले
दोन दिवसांपूर्वी न्यायालयाने एसआयटीच्या पथकाने अक्षयचा मोबाइल मिळत नसल्याचे सांगितले होते.
दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्याची विनंती केली होती.
कल्याणच्या विशेष न्यायालयाने अक्षयला दोन दिवसांची कोठडी सुनावली होती
कोठडीची मुदत आज संपली, त्याला कल्याण न्यायालयात पुन्हा हजर केले
न्यायालयाने अक्षय शिंदे याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली
नागपूर (Nagpur News ) :
नागपूर भिवापूर रोडवर ट्रक आणि खासगी बसचा भीषण अपघात
उभ्या ट्रकला ट्रॅव्हल्सने धडक दिल्याची माहिती
या अपघातात रोडसाईड ला असलेल्या हॉटेल मध्ये बस घुसल्याने हॉटेल मध्ये नुकसान
अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू, तर 10 पेक्षा अधिक जखमी
जखमींना उपचारासाठी नजीकच्या दवाखान्यात केले दाखल
सरसंघचालक मोहन भागवत यांनी जेजूरी येथील श्री मार्तंड देव संस्थानाला भेट देत श्री खंडोबाचे दर्शन घेतले. देव संस्थान आणि जेजूरी ग्रामस्थांच्या वतीने सरसंघचालकांना मानपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी देवाच्या खंडा तलवारीची कसरत त्यांनी पाहिली.
गडावर येत्या काळात नवीन भक्तनिवास उभारण्यात येणार असून, गुरूकुल पद्धतीचे शिक्षणही उपलब्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रमूख विश्वस्त सौंदडे यांनी यावेळी दिली. श्री खंडेरायाची पगडी, घोंगडे आणि भारतमातेच्या प्रतिमेने संरसंघचालकांचे स्वागत करण्यात आले. द्वादश मल्हार दर्शन सृष्टीचे भूमिपूजन -महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील खंडोबा देवाची प्रमूख १२ ठाणी आहेत. याचे दर्शन जेजूरीत येणाऱ्या भाविकांना एकाच ठिकाणी व्हावे, या उद्देशाने देव संस्थान आणि पूरातत्व विभागाच्या वतीने द्वादश मल्हार दर्शन सृष्टी उभारण्याचे कार्य होणार आहे. त्याचे भूमिपूजन आणि कोनशिलेचे उद्घाटन सरसंघचालकांच्या हस्ते झाले.
रामगिरी महाराज यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी बेकायदेशीर जमाव जमा केल्याप्रकरणी १२० ते १३० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील खडक पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुस्लिम समाजाचे धर्मगुरू मोहम्मद पैगंबर यांच्याविरुद्ध रामगिरी गुरुनाथ महाराज यांनी अपशब्द वापरल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात कारवाईची मागणी करण्यात आली होती.
बदलापूर दोन चिमुकली अत्याचार प्रकरणी आरोपी अक्षय शिंदे पुन्हा कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी न्यायालयाने एसआयटीच्या पथकाने अक्षयचा मोबाईल मिळत नसल्याचे सांगत दोन दिवसाची पोलिस कोठडी देण्याची विनंती केली होती. या नंतर कल्याण स्पेशल कोर्टाने अक्षयला दोन दिवसांची कोठडी सुनावली होती. आज ती कोठडी पूर्ण झाल्याने त्याला कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले आहे. न्यायालयाने अक्षय शिंदे याला पुन्हा तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मावळमधील कुंडमळ्यात एक तरुण आणि तरुणी वाहून गेलेत, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना दिलीये. पिंपरी चिंचवड पोलीस आणि बचावपथक घटनास्थळी पोहचून शोधकार्य सुरू करतायेत. काही वेळा पूर्वी ही घटना घडली आहे. श्रेया सुरेश गावडे वय 17 आणि रोहन ज्ञानेशवर ढोंबरे वय 22 असे वाहून गेलेल्यांची नावे असून दोघेही चिंचवड गाव येथील रहवाशी आहे...
शिक्षणाला कौशल्याची जोड असेल तर जीवनात मोठी उंची गाठता येते हे आपण पाहिलं आहे. योग्यवेळी दिशा देण्याचे काम गुरू करत असते. शाळा सोडून खूप वर्ष झाली तरी आमचे शिक्षक रघुनाथ परब अजूनही स्मरणात आहेत. किसननगरला शाळा होती. शाळेनंतर बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्यासारखे गुरू आले. त्यांनी दिलेली शिकवण आजवर जपली. माझ्या आयुष्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
बीडच्या माजलगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जोमात असलेल्या सोयाबीन, कापूस, तूर, उडीद या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गतवर्षी बीड जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती होती. यानंतर संततधार पावसावर पिके जोमदार आली होती, परंतु आता अतिवृष्टीमुळे तोंडचा घास हिरावला गेलाय. या शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अन्यथा आम्ही कृषीमंत्र्याची गाडी अडवणार असल्याचा इशारा शेतकरी नेते भाई गंगाभीषण थावरे यांनी दिला आहे.
नागपूर येथे १०० एकरात भव्य चित्रनगरी निर्माण करण्याच्या सूचना सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या आहेत. मराठी चित्रपटांच्या अधिक दर्जेदार निर्मितीसाठी हा निर्णय घेण्यात आला असून मुंबई आणि कोल्हापूरप्रमाणे नागपूर येथे फिल्मसिटी निर्माण करणार आहेत. अनुदानास पात्र ठरलेल्या चित्रपटात महिला दिग्दर्शिका असलेल्या चित्रपटाला अतिरिक्त पाच लाख रुपयांची प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी झालेल्या मराठी चित्रपटांना विना परिक्षण दुप्पट अनुदान देण्यात येणार आहे.
वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या जामिनावर आज दिल्ली उच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली. सुनावणीत पूजा खेडकरला दिल्ली उच्च न्यायालयाने दिलासा आहे. १० दिवसात सविस्तर तपास करण्याचे कोर्टाचे पोलिसांना निर्देश दिले असून २६ सप्टेंबरला होणार सुनावणी आहे.
मुंबई गोवा महामार्गावर कशेडी बोगद्यात मोठा अपघात झाला आहे. पोलादपूरजवळ कशेडी बोगद्यात तिहेरी अपघात झाला असून कोकणात जाणाऱ्या कंटेनरला मागून येणाऱ्या एस टी बसने धडक दिली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नसून वाहतूक विस्कळीत झाली आहे.
महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला, काँग्रेसने पुण्यात झटका दिला असून, रासप’चे पुणे शहर युवक अध्यक्ष असलेल्या उमेश कोकरे यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत कॉंग्रेस मध्ये प्रवेश केला आहे. त्यांना खडकवासला विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे कॉंग्रेसने आता राजकारणात अधिकाधिक तरुणांना संधी देण्यास सुरुवात केली असल्याचे यातून समोर येते आहे. यावेळी त्यांच्याबरोबर आमदार संजय जगताप, श्रीरंग चव्हाण, लहू निवंगुणे, सचिन बराटे, दत्ता झंजे आदी उपस्थित होते.
धावत्या बसचे दार अचानक उघडल्याने दोन विद्यार्थी खाली पडून गंभीर जखमी झाले. ही चंद्रपूरहून गडचिरोली जात होती. वाटेत आगडी गावातून दोन विद्यार्थी बसले. ते दाराजवळ उभे होते. मूल गावाजवळ एका वळणावर अचानक दार उघडल्याने हे दोन्ही विद्यार्थी खाली रस्त्यावर पडले. यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांना त्याच बसमधून मूल येथील रुग्णालयात हलविण्यात आले.
भाजपा आमदार नितेश राणे यांनी आपल्या भाषणात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाने नितेश राणे यांच्या विरोधात निषेध आंदोलन केल आहे. पिंपरी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुख्य चौकात एकत्र येत शरद पवार गटाचा अल्पसंख्याक सेल आणि इतर पदाधिकाऱ्यांनी नितेश राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध आंदोलन केल आहे. यावेळी नितेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
येरवड्यातील गोल्फ चौकात गुरुवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात डंपरने दुचाकी वरील चालकाला चिरडले. दीपक केशव भटेवरा (वय ४०, रा. लोहगाव पुणे) याचा या अपघातात जागीच मृत्यू झाला असून डंपरचालक भीमा तुकाराम कट्टमणी (वय ३१, रा. वाघोली पुणे) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास लूपस्त्याकडून नगररोडकडे भरधाव वेगाने जाणारा डंपर क्रमांक (MH 12 SX 7922 )याने एक्टिवा दुचाकी क्रमांक (MH 12 PL 7530) ला जोरदार धडक दिली. त्यामध्ये दुचाकीस्वार डंपरच्या चाकाखाली आल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी येरवडा पोलिसांनी तातडीने जाऊन आरोपी डंपर चालकाला ताब्यात घेतले आहे.
मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीत अडकलेल्या चाकरमान्याना प्रचंड त्रास सहन करीत आहेत. रात्री मुंबईतून निघालेल्या चाकरमान्यांना ८ तास झाले तरी अर्धे अंतर देखील पार करता आले नाही. मागील २ तासांपासून हे चाकर मानी लोणेरे ते माणगाव दरम्यान अडकून पडले आहेत. तर कोलाड, नागोठणे, सुकेळी खिंड, इंदापूर, इथ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेतील मुख्य आरोपी असलेल्या जयदीप आपटेला मालवण पोलीस ठाण्यात आणले आहे. काल रात्री उशिरा कल्याण पोलिसांनी आपटेला त्याच्या घरून ताब्यात घेतले होते. आपटेचा ताबा सिंधुदुर्ग पोलिसांना दिल्यानंतर आज आरोपीला घेऊन पोलीस पथक मालवणात दाखल झाले आहे. काही वेळात जयदीप आपटेला करणार मालवण न्यायालयात हजर केले जाणार आहे. दरम्यानसह आरोपी असलेल्या चेतन पाटील याची आज पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्यालाही आज न्यायालयात हजर केले जाणार आहे
आज काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि राष्ट्रीय अध्यक्ष मालिकार्जुन खर्गे यांनी दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांच्या कुटुंबीयांची नांदेडच्या नायगाव येथ3 भेट घेतली.आणि सांत्वन केले.तब्बल तासभर चव्हाण कुटुंबियांसोबत चर्चा केली.
राहुल गांधी यांच्या सांगली दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना नोटीस पाठवली आहे. राहुल गांधी यांच्या दौऱ्यात सहभागी होण्यास मज्जाव केला असून कायदा व सुव्यवस्था लक्षात घेता विश्रामबाग पोलिसांनी हाके नोटीस बजावली आहे. राहुल गांधी यांच्या कार्यक्रमात जाण्याचा प्रयत्न केल्यास कायदेशीर कारवाईचा पोलिसांनी इशारा दिला आहे. हॉटेल आयकॉन येथून विश्रामबाग पोलिसांनी हाके यांना ताब्यात घेतले आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात बीएससी पॅरामेडिकल विद्यार्थी असोसिएशन तर्फे आंदोलन सुरू करण्यात आले. विविध मागण्यांसाठी हे विद्यार्थी आता चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. प्रशासन विरोधात जोरदार घोषणाबाजी हे विद्यार्थी सध्या करत आहे. दरम्यान बीएससी पीएमटी या पदवीचे आम्ही विद्यार्थी असून आमच्या पदवी नुसार सद्यस्थितीत शासन सेवेमध्ये कोणत्याही प्रकारचे स्वतंत्र प्रकारचे स्थायी पद अस्तित्वात नाही त्यामुळे bsc पीएमटी अंतर्गत भरण्यात येणाऱ्या अन्य सर्व अभ्यासक्रमाच्या पदवीकरिता शासनाने स्वतंत्र पदाच्या शैक्षणिक आर्थिक नुसार ही पदे भरण्यात यावी शिवाय हे पद बाहेरील स्रोतांमार्फत भरले जात असून त्याला शैक्षणिक अहर्ता दहावी पास आहे अशा या विद्यार्थ्यांचे म्हणणं आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या सातपुड्यातील बिलगाव येथील बारामुखी धबधबा हा प्रवाहित झाला असून पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे उदय नदीवर असलेल्या या धबधबातून बारा ठिकाणहून पाणी प्रवाहित होत असते यामुळे हा धबधबा आकर्षक दिसत असतो सातपुड्यातील सौंदर्याचा हा एक नमुनाच असून महाराष्ट्रसह जवळील गुजरात आणि मध्य प्रदेशातील अनेक पर्यटक या ठिकाणी धबधबा बघण्यासाठी येत असतात यातच प्रशासनाने या ठिकाणी संरक्षणाचा दृष्टीने उपाययोजना करण्याची आता गरज आहे..
पुण्यातील एका 35 वर्षीय बँकरने अटल सेतूवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ॲलेक्स रेगी असे या बँकरचे नाव असून तो पिंपरी येथील रहिवासी होता. ॲलेक्स एका बैठकीसाठी मुंबईत आला होता. यावेळी तो चेंबूर येथे सासऱ्याला भेटण्यासाठी गेला होता आणि पुण्याला परत जात असताना अटल सेतू पुलावर गाडी थांबवून त्याने उडी मारली. ॲलेक्स वर कामाचा प्रचंड दबाव असल्याची माहिती त्याच्या कुटुंबियांनी दिली आहे. यासंदर्भात ॲलेक्सने कुठलीही सुसाईड नोट सोडली नव्हती. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवरून मॉनिटरिंग टीमने कार थांबलेली पाहिली आणि पोलिसांना इशारा दिला पण पोलीस पोहोचण्याआधीच ॲलेक्सने उडी मारली. बचाव पथकाने मृतदेह बाहेर काढला असून त्याच्या कुटुंबियांच्या ताब्यात दिला आहे.
मारामारी तपासात मदत करण्यासाठी 50 हजार रुपये लाचेची मागणी करून 35 हजारांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने एक पोलीस अधिकारी व पोलीस शिपायाला रंगेहाथ अटक केली.वडगाव मावळ पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीत करण्यात आली..सहाय्यक पोलीस उप निरीक्षक सुनील तुळशीदास मगर व पोलीस शिपाई सागर कैलास गाडेकर अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. याप्रकरणी वडगाव पोलिसात गुन्हा दाखल आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सुमारे ६५ टक्क्यांहून अधिक बसफेऱ्या रद्द झाल्या. त्यामुळे गणेशोत्सवाला येणाऱ्या चाकरमान्यांना आणि खरेदीसाठी ग्रामीण भागातून आलेल्या गणेश भक्ताचे मोठे हाल झाले. काल रद्द झालेल्या फेऱ्यांमुळे सुमारे नऊ लाख ३७ हजार रुपयांचे उत्पन्न बुडाले. तर मंगळवारी रद्द झालेल्या फेऱ्यांमुळे साडेचार लाखांहून अधिक उत्पन्न बुडाले.
बीडच्या परळीमध्ये भाजप नेते नितेश राणे यांच्यावर एनसी दाखल करण्यात आली . मुस्लिम समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या आरोपाखाली, राणे यांच्यावर ही एनसी दाखल करण्यात आली आहे. अहमदनगर येथे 1 सप्टेंबर रोजी रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ आयोजित कार्यक्रमात, नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाविषयी आक्षेपहार्य वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या असून राणे यांच्यावर कारवाई करावी, अशी तक्रार अन् फिर्याद परळीतील सय्यद साजिद सय्यद इब्राहिम यांनी दिली आहे. दरम्यान याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात नितेश राणे यांच्यावर एनसी दाखल करण्यात आली आहे...
दोहावरून कतार एअरवेजच्या फ्लाईटमधील दोन प्रवाश्याकडून 61 लाखाचे सोन जप्त करण्यात आले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही कारवाई करण्यात आली आहे. नागपूर सीमाशुल्क विभागाने ही कारवाई केली असून सोन्याला चांदीचा पॉलिश लावून तयार केले असून वजन 858.33 ग्रॅम इतके आणि किंमत 61 लाख 25 हजार रुपये इतकी आहे. आरोपींवर कारवाईत करत अटक करण्यात आली.
काँग्रेसचे दिवंगत नेते, भारती विद्यापीठाचे संस्थापक-कुलपती, माजी मंत्री, आमदार डॉ. पतंगराव कदम यांचा पूर्णाकृती पुतळा व 'लोकतीर्थ' स्मारकाचे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. डॉ. पतंगराव कदम यांनीच स्थापन केलेल्या सोनहिरा सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात दहा एकर जागेवर हे दिमाखदार स्मारक साकारले आहे. या परिसरात पतंगराव कदम यांचा १८ फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. स्मारकाच्या प्रवेशद्वारातच स्वागत कक्ष व स्वागत कमान उभारण्यात आली आहे.
पुणे नगर महामार्गावर शिक्रापूर चाकण रोडवर रात्रीच्या सुमारास बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला. त्यामध्ये बीड वरून एक कुटुंब मुंबईकडे चालले होते. शिक्रापूर पोलीस व करंदी येथील स्थानिक नागरिकांच्या मदतीने कार विजवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. विकास बरगजे असे कार मालकाचे नाव असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर शहरात काही वेळेपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली असून पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
आज दुपारी १२.३० वाजता राज्यमंत्रीमंडळाची बैठक
राज्यात मराठवाड्यासह काही भागात झालेल्या अतिवृष्टीवर कॅबिनेटमध्ये चर्चा होणार
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा कॅबिनेट बैठकीत आढावा
विधानसभा निवडणुकी जवळ आल्याने काही महत्वाच्या प्रकल्पांना मार्गी लावण्याबाबत अंतिम निर्णयाची शक्यता
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेतील मुख्य आरोपी असलेल्या जयदेव आपटेला आज मालवण न्यायालयात हजर केले जाणार आहे. काल रात्री उशिरा कल्याण पोलीसांनी आपटेला त्याच्या घरून ताब्यात घेतले होते.
पुण्यात जंगली महाराज रस्त्यावर छत्रपती संभाजी महाराज उद्यान मेट्रो स्थानकाला जोडणारा पादचारी पूल बांधण्यात आला आहे.या पादचारी पुलाची उंची कमी असल्याने या पुलामुळे विसर्जन मिरवणुकीत अडथळा निर्माण होण्याची शक्यता असल्याचे सांगत मंडळांनी नाराजी व्यक्त केली आहे.या बाबत गणेश मंडळांनी अतिरिक्त पोलीस आयुक्त यांना निवेदन दिले. मेट्रोच्या पादचारी पुलाच्या उंचीवरून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे
सांगोल्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांना धक्का. पक्षाचे उपजिल्हा प्रमुख दत्तात्रय सावंत यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश. टेंभुर्णी येथील जाहीर सभेत जयंत पाटील यांच्या उपस्थितीत केला प्रवेश. सांगोला तालुक्यात आमदार शहाजी बापू पाटील पक्ष वाढू देत नसल्याचा आरोप करत पक्षांतर केले. दत्तात्रय सावंत हे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे निकटवर्तीय समजले जातात. पुढील आठ दिवसांमध्ये सावंत बंधू राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करतील असा दावा दत्तात्रय सावंत यांनी केला.
नागपूर येथे १०० एकरात भव्य चित्रनगरी निर्माण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सूचना दिल्या आहेत.
मराठी चित्रपटांच्या अधिक दर्जेदार निर्मितीसाठी निर्णय
मुंबई आणि कोल्हापूर प्रमाणे नागपूर येथे फिल्मसिटी निर्माण करणार
अनुदानास पात्र ठरलेल्या चित्रपटात महिला दिग्दर्शिका असलेल्या चित्रपटाला अतिरिक्त पाच लाख रुपयांची प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय.
आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी झालेल्या मराठी चित्रपटांना विना परिक्षण दुप्पट अनुदान देणार
Pune Crime : उलटी केल्याने प्रेयसीच्या चार वर्षाच्या मुलाचा खून केल्याची खळबळजनक घटना
प्रेयसीच्या चार वर्षांच्या मुलाने उलटी केल्याने प्रियकराने मुलाला केली बेदम मारहाण मारहाणीत मुलाचा मृत्यू
प्रियकराला बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली.
महेश कुंभार असे आरोपीचे नाव आहे.तर वेदांश काळे असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव
गणेशोत्सवासाठी चाकरमानी कोकणात दाखल होण्यास सुरुवात झाली.
कोकण रेल्वे मार्गावरील ट्रेनला मोठी गर्दी
गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर 310 विशेष गाड्या
मुंबई, सुरत , अहमदाबाद, वांद्रे , पनवेल वरुन सुटणार विशेष गाड्या
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी जवळपास 150 रेल्वे सुरक्षा बल कर्मचारी अधिकारी
प्रवाशांच्या सोयीसाठी यात्री सहाय्यक तैनात करण्यात येणार आहेत
रत्नागिरी स्थानकातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल कलये यांनी..
बलात्काराचा गुन्हा रद्द करण्यासाठी आलेल्या आरोपी आणि पीडितेला उच्च न्यायालयाने प्रत्येकी २ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंडाची रक्कम सैनिकांसाठी वापरण्याचे निर्देश
पीडित आणि आरोपीमध्ये न्यायालयाबाहेर झालेल्या तडजोडीची दखल घेत बलात्काराचा गुन्हा केला रद्द
अमरावतीच्या जवाहरनगरात सराफा व्यापाऱ्यास मुलासह लुटल्याची घटना घडली आहे.
25 किलो चांदी लुटली, सोने रोख रक्कम बचावली.
महाराष्ट्र राज्य शासनाच्या खटुवा समितीच्या शिफारशीनुसार कॅब विषयी रेट कार्ड जाहीर झाले आहे. सात ते आठ महिने उलटून गेली तरीही या दरपत्रकानुसार ओला, उबर व तत्सम एप्लीकेशनवर आधारित कंपन्यांनी दर अंमलात आणले नाहीत. याचे पालन न करणाऱ्या प्रवासी कॅब कंपन्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी कॅब चालक मालक आज मुंबईत मंत्रालयाकडे निघाले असताना पोलीस प्रशासनाने हा ताफा पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरील उर्से टोल नाक्यावर अडवला.
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या मुंबई ठाण्यातील चाकरमान्यांची मोठी गर्दी दिवा रेल्वे स्थानकात झालेली पाहायला मिळतेय. सकाळी 6:20 ची दिवा सावंतवाडी एक्सप्रेस कोकणवासियांनी खचाखच भरलेली पाहायला मिळतेय. ट्रेनमध्ये बसण्यासाठी जागा मिळावी यासाठी काल रात्री पासून कोकणवासीय दिवा रेल्वे स्थानकात होते मात्र तरीही बसण्यासाठी जागा मिळाली नसल्याने प्रवाशांना प्लॅटफॉर्म चां खाली उतरून जागा पकडावी लागत आहे.नेहमीच कोकणात जाणाऱ्या खास करून गणेश उत्सवाचा काळात कोकण वासियांना गर्दीचा सामना करावा लागत आहे.
तापाच्या उपचारासाठी डॉक्टरऐवजी पुजाऱ्याकडे गेलेल्या दोन चिमुकल्या भावंडांचा काही तासांच्या अंतराने संशयास्पद मृत्यू झाला. या घटनेनंतर आई-वडलांनी रुग्णालय गाठले. पण उशीर झाला होता.
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव रेल्वे स्थानकात एका युवतीने भरधाव रेल्वे गाडी समोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अटाळी येथील अर्चना अनंता महाले नामक ही युवती असून 11 वाजता समोरून येणाऱ्या भरधाव रेल्वे गाडी समोर या युवतीने उडी घेत आत्महत्या केली आहे. या घटनेचा व्हिडिओ आता समोर आला आहे. ही घटना 26 ऑगस्ट रोजी ची असल्याचं सांगितलं जात आहे. घटनेतील युवती ही विवाहित असून तिचा काही दिवसांपूर्वी घटस्फोट झाला असल्याची माहिती देखील समोर आली आहे. त्यामुळे कौटुंबिक ताण-तणावामुळे या युवतीने आत्महत्या केली असावी असा कयास लावला जात आहे. घटनेचा व्हिडिओ मानवी मन सुन्न करणारा ठरत आहे..
राष्ट्रवादी कॅाग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आज नवाब मलिकांच्या मतदारसंघात
सुप्रिया सुळे आज अणुशक्तीनगरचा दौरा करणार आहेत.
दुपारी १ वाजल्यापासून सायंकाळपर्यंत अणुशक्तीनगरच्या विविध भागात सुप्रिया सुळे भेटी देणार आहेत.
पाकिस्तान आणि अफगानिस्तान सीमेवर गोळीबार झालाय.
दोनही बाजूने झालेल्या गोळीबारात काही लोक जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
अफगानिस्तानची सेना सीमेवर चौक्या बनवत असताना गोळीबार झाल्याची माहिती मिळाली आहे.
तर, काही लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
महापालिका प्रशासनाने चालू आर्थिक वर्षात मालमत्ता कर आणि पाणीपट्टीच्या माध्यमातून 500 कोटी रुपये तिजोरीत आले पाहिजे या दृष्टीने आता नियोजन केलय. त्यामुळे 1 एप्रिल पासून मालमत्ता कर पाणीपट्टी आणि थकबाकी वर पालिका प्रशासनाने भर दिलाय त्याबरोबरच मोठी थकबाकी असलेल्या मालमत्ता धारकांना आता जप्तीच्या नोटिसा देण्यास सुरुवातही केली आहे.
Rain Update : नाशिक जिल्ह्यातील पूर्व भागात गेल्या काही दिवसां पासून सतत पडणा-या पावसामुळे भाजीपाला पिकाला फटका बसला आहे.अनेक शेतक-यांनी लागवड केलेल्या मेथी पिकाला त्याचा फटका बसला असून पावसामुळे मेथी पिवळी पडली असल्याने शेतात काही प्रमाणात भाजीपाला खराब होत असला तरी मेथी जुडीला किरकोळ बाजारात २० रुपयां पेक्षा जास्त दर मिळतोय तर या महिन्याच्या अखेरीस दर वाढण्याची शक्यता शेतक-यांनी व्यक्त केलीय
Pune News : पुण्यात गणेशोत्सव काळात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे.
गणेशोत्सवात शहरातील दीड हजारांहून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे.
गणेश मंडळांनाही सीसीटीव्ही बसविण्याच्या सूचना दिल्या आहेत.
खडकवासला धरणातून सकाळी ८ वाजता १७१२ क्यूसेक पाणी सोडण्यात येणार आहे.
खडकवासला धरणातून मध्यरात्री १२ वाजता ८५६ क्यूसेक पाणी मुठा नदीत सोडण्यात सुरुवात झाली. त्यानंतर आज सकाळी अजून विसर्ग वाढवणार आहेत.
खडकवासला धरण साखळीत सकाळपासून पाऊस पडत आहे.
आज सकाळी जायकवाडी धरणाचा पाणीसाठा आता 92.10 टक्क्यांवर पोहचलाय. आज आवक कमी झाली आहे. सध्या 11 हजार क्यूसेक इतकी आवक सुरू आहे. दोन दिवसापासून संपूर्ण जिल्ह्यात पावसाने उसंत घेतली आहे. शिवाय आणि नाशिक जिल्ह्यात पाऊस नसल्यामुळे गोदावरी नदीतून येणारी आवक ही कमी झाली आहे. शिवाय जायकवाडी धरणातून माजलगाव धरणासाठी उजव्या कालव्यातून 500 क्युसेक्स वेगाने पाणी विसर्ग केला जातोय. त्यामुळे आता सध्या हळूहळू जायकवाडी धरणातील पाणीसाठा वाढू लागला आहे. जवळपास 95% च्या वर त्यानंतर पाणी सोडणे बाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.
Pune Crime News : गंभीर गुन्हा असल्याने बारकाईने तपास गरजेचा वनराज आंदेकर खून प्रकरणात न्यायालयाचे निरीक्षण
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाबाबत सुरू असलेल्या तपासाचा आवाका मोठा असल्याने तो १४ दिवसांत पूर्ण होणार नाही.गंभीर गुन्हा असून त्याचा बारकाईने तपास गरजेचा आहे.त्यातून सत्य समोर येईल.एकदम १४ दिवसांची पोलिस कोठडी देणे योग्य ठरणार नाही, असे नमूद करत प्रथमवर्ग न्यायालयाने आरोपींना १२ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
आंदेकर यांच्या खून प्रकरणात पोलिसांनी आत्तापर्यंत एकूण १५ आरोपींना अटक केली आहे. तर दोघांचा पोलिस शोध घेत आहे.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी
० लोणेरे येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा
० गणेशोत्सवासाठी कोकणात जाणारे चाकरमानी अडकले
० महामार्गावर सुरू असलेल्या कामामुळे वाहतूक कोंडी
० मागील एक तासापासून कोकणा कडे जाणारी वाहतूक ठप्प
० दोन्ही लेन वरती वाहने आल्याने महामार्ग जाम...
PM modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 सप्टेंबरला विदर्भाचा दौऱ्यावर, प्रशकीय यंत्रणेकडून तयारी करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या विश्वकर्मा योजनेतील लाभार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या हस्ते किट वाटप होणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.