Marathi News Live Update: राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस निरीक्षक वी बी बोबडे निलंबित

Maharashtra Breaking News Live Updates : सोमवार दिनांक २४ जून २०२४ संसदेत आज खासदारांचा शपथविधी होणार आहे. जाणून घेऊयात देश विदेश तसेच महाराष्ट्रातील सर्व वेगवान घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स
राज्यातील प्रत्येक महत्वपूर्ण घडामोडींचे वेगवान अपडेट वाचा
Today's Marathi News Live Saam tv

Pune Hit and Run case  : राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस निरीक्षक वी बी बोबडे निलंबित

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस निरीक्षक वी बी बोबडे यांना निलंबित करण्यात आलं आहे. पुण्यातील एफसी रोड हॉटेल पार्टी प्रकरण भोवलं आहे. पुण्यातील L3 बारमध्ये सुरू असलेल्या पार्टी संदर्भात कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी त्यांचे निलंबन करण्यात आलं आहे. बोबडे यांच्या कार्यक्षेत्रात हा बार होता. मात्र तरीसुद्धा पार्टी सुरू असताना ते त्यांच्या परिक्षेत्रात नव्हते. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त यांनी निलंबनाचे निर्देश जारी केले.

Nashik News : नाशिक जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी

Summary

नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात आज दुपारनंतर मुसळधार पावसाने हजेरी

जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील निवाणे,दह्याने या भागात जोरदार पावसाने हजेरी

नद्या दुथडी भरून वाहू लागल्या तर मुख्य रस्त्यावरून पाणी वाहू लागले आहेत.

काही ठिकाणी शेतातील बांध फुटले

Kolhapur News: बिद्री सहकारी साखर कारखान्याचा इथेनॉल उत्पादन आणि विक्रीचा परवाना तात्पुरता रद्द

बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल उत्पादन आणि विक्रीचा परवाना तात्पुरता रद्द करण्यात आलीय. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे कार्यालयाच्या अहवालानंतर ही कारवाई करण्यात आलीय. बिद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि माजी आमदार के पी पाटील यांना मोठा धक्का बसलाय. उत्पादन शुल्क विभागाच्या या कारवाईवर कारखान्याकडून न्यायालयात दाद मागितली जाणार आहे.

Akola News : अकोल्यातील भाजपचे युवा नेते वैभव माहोरे यांच्यावर अज्ञातांकडून जीवघेणा हल्ला

अकोल्यातील भाजपचे युवा नेते वैभव माहोरे यांच्यावर काल रात्री अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केलाय. अकोल्यालगतच्या आपल्या चांदूर गावी परतत असतांना हा हल्ला झालाय. चांदूर गावालगतच्या पुलावर 8 ते 10 लोकांनी हल्ला चढवलाय. हल्ल्यात गंभीर जखमी माहोरे यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरूये. राजकीय वैमनस्यातून हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू असून अद्यापही कोणाला अटक करण्यात आलेली नाहीये.

 Pune L3 Bar Party:  पुण्यातील L3 बार मधील पार्टी प्रकरण; L3 बारमधील ६ वेटर्सला राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अटक

ण्यातील L3 बार मधील पार्टी प्रकरणात मोठी अपडेट समोर आलीय. L3 बार मधील ६ वेटर यांना राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अटक. बारमधील वेटर्सला २९ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. बेकायदेशीरपणे मद्याचा साठा जमा केल्याप्रकरणी अटक करण्यात आलीय. परवानगी नसताना दुसऱ्या मजल्यावर मद्याची विक्री केल्याप्रकरणी वेटर यांना सुद्धा अटक करण्यात आलीय.

Jalgaon Ashadhi vari: धरणगाव तालुक्यातील पाधीहून ५ हजारपेक्षा जास्त वारकरी पंढरपूरकडे रवाना

धरणगाव तालुक्यातील पाधीहून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून 5 हजारपेक्षा अधिक वारकरी पंढरपूरकडे रवाना झालेत. पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि उद्योजक अशोक जैन यांनी हिरवी झेंडे दाखवत ६० पेक्षा अधिक बसेस पंढरपूरकडे रवाना झाली आहेत. बसेस पंढरपूरकडे रवाना होण्याआधी पालकमंत्री गुलाबराव पाटील देखील टाळ मृदुंगाच्या गजरात भजनात रंगले होते.

Arvinad Kejrival: अरविंद केजरीवाल यांना जेल की बेल याचा फैसला उद्या होणार

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्जावर उद्या दिल्ली उच्च न्यायालय निर्णय देणार आहे. उद्या दुपारी अडीच वाजता सुनावणी घेतली जाणार आहे. दिल्लीच्या राऊज एवेन्यू कोर्टाने केजरीवाल यांना जामीन मंजूर केला होता, मात्र हायकोर्टाने त्याला स्थगिती दिली होती.

Maharashtra Politics : राज्यातील भाजपचे २ नेते दिल्लीत? विधानपरिषद निवडणुकीसाठी नाव निश्चित होणार

राज्यातील भाजपचे २ नेते दिल्लीत आल्याची माहिती हाती आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दिल्लीत आल्याची माहिती मिळत आहे. विधानपरिषद निवडणुकीची नाव निश्चित केली जाणार असल्याचं बोललं जात आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून करणार नाव निश्चित केली जाणार असल्याचं बोललं जात आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत देखील चर्चा होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Chhatrapati Sambhajinagar Rain: छत्रपती संभाजीनगरमध्ये शहरासह जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी

छत्रपती संभाजी नगर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. सोयगाव तालुक्यात सावळदबारा आणि इतर आसपासच्या परिसरामध्ये जोरदार मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शेताला तलावाचा स्वरूप आलं होतं, तर दुसरीकडे दौलताबाद,माळीवाडा आणि आसपासच्या परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली यामुळे आता शेतकरी सुखावला. खुलताबाद कन्नड सिल्लोड आणि सोयगाव तालुक्यात पावसाने हजेरी लावली.

Train Accident : दिवा-रत्नागिरी पॅसेंजरमधून पडून प्रवाशाचा मृत्यू

Summary

दिवा-रत्नागिरी या कोकणात जाणाऱ्या पॅसेंजर रेल्वेमधून पडून प्रवाशाचा मृत्यू

संकेत गोठल असे मृत तरुणाचे नाव

खेड तालुक्यातील भडगाव कोंड येथील रहिवासी

अपघात महाड तालुक्यातील उंदेरी गावाजवळ अपघात

Ajit Pawar : अजित पवार गटाकडे विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी इच्छुकांची गर्दी

अजित पवारगटाकडे विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी इच्छुकांची गर्दी वाढली आहे. पुण्यातून दिपक मानकर,अमरावतीमधून सुरेखा ठाकरे,परभणीमधून राजेश विटेकर,उसमानाबादमधून सुरेश बिराजदार,बीडमधून संजय दौंड, बुलढाणामधून नझीर काझी तर मुंबईमधून सिद्धार्थ कांबळे हे लोक राष्ट्रवादीमधून इच्छुक आहेत.

विधानपरिषदेवर रिक्त झालेल्या ११ जागांपैकी २ जागा या अजित पवार गटाच्या वाटेला येऊ शकतात.

सध्या अजित पवार यांना ४० आमदारांचा पाठिंबा आहे.

Laxman Hake : लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांना धमकीचे फोन

जालन्यातील वडीगोद्री येथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे यांनी आमरण उपोषण केले .त्यांचावर आता जालन्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांना धमकीचे फोन येत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

jalna rain Update : जालन्यात दमदार पावसाला सुरुवात

जालन्यात दमदार पावसाला सुरुवात

जालना शहरासह जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये आज दमदार पावसाने हजेरी

या पावसामुळे पेरणी पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा

जालना शहरासह जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाऊस

Pune Party Case : पुणे एल ३ बार प्रकरण , आरोपींना २९ तारखेपर्यंत पोलीस कोठडी

पुणे L3 बार प्रकरणी आरोपींना २९ तारखेपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

८ आरोपींना २९ जूनपर्यंत कोठडी देण्यात आली आहे. सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे.

CM Eknath Shinde :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कोल्हापूर दौरा रद्द

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्याचा कोल्हापूर दौरा रद्द करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या शाश्वत परिषदेनिमित्त येणार होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऑनलाइन प्रणाली द्वारे शाश्वत परिषदेमध्ये संवाद साधणार होते. मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द झाल्याने कोल्हापूर बंद स्थगित झाला आहे.

Neet Exam Case : नीट पेपरफुटी प्रकरणी मोठी अपडेड, एटीएसने केलं धाराशिव कनेक्शन उघड

नीट पेपरफुटी प्रकरणाचं धागेदोरे नांदेड,लातूर पाठोपाठ आता धाराशिवपर्यंत पोहोचले आहे.

धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथील एकाला एटीएसने ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

एटीएसकडून ताब्यात घेतलेल्या व्यक्तीची कसून तपासणी सुरू असल्याची सूत्रांची माहिती समोर आली आहे.

स्थानिक पोलिसांना मात्र प्रकरणाची माहिती नाही. संबंधित व्यक्तीने आर्थिक देवाण घेवाण केली असल्याची माहिती हाती आली आहे.

Ravikant Tupkar : रविकांत तुपकरांची राजू शेट्टींवर खोचक टीका

रविकांत तुपकारांनी राजू शेट्टींवर खोचक टीका केली आहे. 'बारामतीमध्ये झालेल्या बैठकीचे निमंत्रण नव्हते, मी बैठकीला नव्हतो. त्यांचं काय ठरलं ते मला माहीत नाही. राजू शेट्टी महान नेते आहेत. ते 288 काय ते देशातील प्रत्येक राज्यात विधानसभेत उमेदवार उभे करतील. त्यांची ताकद फार मोठी आहे, अशी खोचक टीका शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी राजू शेट्टींवर केली आहे.

j p nadda : राज्यसभेच्या नेतेपदी केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांची नियुक्ती

राज्यसभेच्या नेतेपदी केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांची नियुक्ती करण्या आली आहे. येत्या 27 जूनपासून राज्यसभेचे अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनात नड्डा हे सत्ताधारी पक्षाचे नेते म्हणून भूमिका बजावणार आहेत. यापूर्वी राज्यसभेच्या नेतेपदी पियुष गोयल हे कार्यरत होते. गोयल लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यामुळे हे पद रिक्त झाल होतं. आता त्याठिकाणी नड्डा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Kangana ranaut News : अभिनेत्री कंगना रणौत यांनी घेतली लोकसभा सदस्यपदाची शपथ

अभिनेत्री कंगना रणौत यांनी लोकसभा सदस्यपदाची शपथ घेतली आहे. कंगना यांनी सांयकाळी ४ वाजून २१ मिनिटाला शपथ घेतली. त्या हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघातील लोकांचं अभिनेत्री कंगना प्रतिनिधित्व करणार आहेत.

bjp president j p nadda : विषारी दारू प्रकरण : भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांचं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र

भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहिलं आहे. तामिळनाडूमधील विषारी दारू प्रकरणी काँग्रेस गप्प का? असा सवाल नड्डा यांनी केला आहे. तामिळनाडूत विषारी दारू प्यायल्याने आतापर्यंत 57 लोकांचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडूमधे DMKचं सरकार असल्याने भाजपने जोरदार टीका केली आहे.

Pune Party Case : पब संस्कृती बंद करा, पुण्यात मनसे विद्यार्थी सेना आक्रमक

पुण्यात मनसेच्या विद्यार्थी सेनेच आंदोलन सुरु झालं आहे. मनसे विद्यार्थी सेनेचे कार्यकर्ते L3 पब बाहेर आंदोलन करत आहेत. मनसेकडून प्रतिकात्मक आंदोलन केलं जातं आहे. भ्रष्ट सरकार पोलीस अधिकारी आणि एक्साईज अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात येत आहे. पब संस्कृती बंद करा, अशी मागणी देखील करण्यात येते आहे.

Bhandara News : मुख्यमंत्र्यांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे

भंडारा येथील 547 कोटींच्या कामांच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री शिंदे भंडारा येथे दाखल

आज वैनगंगा नदीवर भंडारा ते गोसेखुर्दपर्यंत जल पर्यटन निर्मिती होत आहे.

या कामातील पहिला टप्पा भूमिपूजन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते पार पाडून सभा

यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून मुख्यमंत्री यांच्या निषेध व्यक्त केला

Mumbai-Goa Highway traffic : मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, रस्त्यावर वाहनाच्या लांबच लांब रांगा

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटात अपघात झाल्याची घटना घडली आहे. या घाटात क्रेन वाहतूक कंटेनर कलंडला. त्यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी वाहनाच्या रांगाच रांगा लागल्या आहेत. या अपघातमुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. मुंबई गोवा महामार्गावर कशेडी ते पोलादपूर मार्गावरील घाटात ही कोंडी झाली आहे.

Pune Party Case : पुण्यातील ड्रग्ज पार्टी प्रकरणाचे आणखी २ व्हिडिओ आले समोर

पुण्यातील L3 बारमधील ड्रग्ज पार्टीमधील आणखी २ व्हिडीओ समोर आले आहेत. ही पार्टी रविवारी पहाटे ४ वाजेपर्यंत सुरू होती. ४० ते ५० जणांची पुण्यातील एफसी रोड असलेल्या L3 बारमधील पार्टीचे व्हिडिओ समोर आले आहेत.

Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा संघटना आक्रमक, डॉ. रमेश तारख यांच्या तोंडाला फासले काळे

छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा संघटना आक्रमक झाली आहे. डॉक्टर रमेश तारख यांच्या तोंडाला काळे फासले आहे. मनोज जरंगे यांच्या अंतरवलीतील उपोषणाला विरोध केल्यामुळे डॉक्टरांच्या तोंडाला काळे फासले आहे. मनोज जरांगे यांच्या विरोधात रमेश तारख यांनी अर्ज दिला होता.

संकेश्र्वर - बांदा मार्गावरील टोल नाक्याला शेतकऱ्यांचा विरोध, आजरा शहर बंद ठेवत आंदोलनाला पाठिंबा

कोल्हापूरातील संकेश्र्वर - बांदा मार्गावरील टोल नाक्याला शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. शेतकऱ्यांची आज टोल नाक्यावर धडक घेत मोर्चा काढला. आजरा परिसरातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. आमच्याच जमिनी घेऊन टोल आकारण्याची कुठली वृत्ती म्हणत टोल रद्द करण्याची मागणी केली. आजरा शहर बंद ठेऊन आंदोलनाला पाठिंबा दिला.

Nashik News: नाशिकच्या कश्यपी धरणाचा पाणीप्रश्न पेटला, गंगापूर धरणात ५०० क्यूसेक पाणी सोडल्याने ग्रामस्थ आक्रमक

नाशिकच्या कश्यपी धरणाचा पाणीप्रश्न पेटला. कश्यपी धरणातून ५०० क्यूसेक वेगानं पाणी सोडण्यात आले. गंगापूर धरणातील पाणीसाठा कमी झाल्यानं कश्यपी धरणातून पाणी सोडण्यात आले. पाणी सोडायला ग्रामस्थांचा विरोध लक्षात घेता पोलिस बंदोबस्तात पाणी सोडण्यात आले. कश्यपी धरण परिसरात तणावपूर्ण वातावरण आहे.

Navi Mumbai: एपीएमसी कांदा-बटाटा मार्केटमधील पाणी लाईन कापल्याने माथाडी वर्ग आक्रमक

नवी मुंबईतील एपीएमसी कांदा-बटाटा मार्केटमधील पाणी लाईन कापल्याने माथाडी वर्ग आक्रमक झाला आहे. माथाडी नेते नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली मनपा मुख्यालयावर मोर्चा काढण्यात आला. कांदा बटाटा मार्केट बंद करुन सर्व माथाडी, मापाडी आणि व्यापारी नवी मुंबई मनपा मुख्यालयाबाहेर एकत्र जमले. मनपा मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ माथाडी कामगारांनी ठिय्या आंदोलन केले. आयुक्तांना भेटून मार्केटचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.

Ratnagiri News: मुंबई- गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील बोगद्याला गळती

रत्नागिरीमध्ये मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील बोगद्याला अनेक ठिकाणी गळती लागलीये. बोगद्यातून प्रवास करताना प्रवाश्यांना पावसाचा अनुभव येत आहे. सिमेंटच्या फेसिंगमधून पाण्याचे फवारे येत आहेत. राष्ट्रीय महामार्गाच्या तज्ञांकडून पाहणी केली जाणार आहे. कशेडी बोगदा दोन किलोमीटर लांबीचा आहे. मागील 2 महिन्यापासून कशेडी बोगदा वाहतुकीस खुला करण्यात आला.

Sharad Pawar Ashadhi WariNews: शरद पवार करणार पायीवारी; तुकोबारायांच्या पालखीत सहभागी होणार

यंदा जगदगुरू तुकोबरायांच्या पालखी सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार सहभागी होणार आहेत. ७ तारखेला शरद पवार स्वतः वारीत सहभागी होऊन असून बारामती ते सणसर पायी वारी करणार आहेत.

Pune News: पुणे ड्रग्ज प्रकरण: इव्हेंट ऑर्गनायझर अक्षय कामठेने केले होते पार्टीचे आयोजन!

पुणे ड्रग्ज प्रकरणी सर्वात मोठी अपडेट: इव्हेंट ऑर्गनायझर अक्षय कामठे याने एल- थ्री बारमध्ये पार्टी आयोजित केल्याचे समोर आले आहे. अक्षय कामठे यानेच ४० ते ५० जणांना L3 मध्ये आणल्याचे उघड झाले असून पोलिसांना संशय येऊ नये म्हणून L3 चे मुख्य द्वार बंद करून पाठीमागच्या दरवाजाने तरुणांना प्रवेश दिल्याचेही समोर आले आहे.

Student Morcha Pune: पुणे ते मुंबई विद्यार्थ्यांचा लाँगमार्च; अधिवेशनाच्या तोंडावर विधानभवनावर धडकणार मोर्चा

विविध शैक्षणिक मागण्यासाठी सारथी, बार्टी, आणि महा ज्योतीच्या विद्यार्थ्यांनी पुण्यातून मुंबईकडे लाँग मार्च काढला आहे. फेलोशिप मिळावी यासाठी फुलेवाडा ते विधानभवन विद्यार्थ्यांचा पायी लाँग मार्च निघणार असून राज्यभरातील ओबीसी, दलित, भटके विमुक्त, मराठा समाजातील विद्यार्थी एकत्र आले आहेत. या मोर्चाला पाठींबा देण्यासाठी थोड्याच वेळात ज्येष्ठ समाजसेवक डॉ.बाबा आढाव, प्रशांत जगताप सहभागी झाले आहेत.

Mumbai Congress News: विधानसभेआधी काँग्रेसमध्ये कलह! वर्षा गायकवाड यांच्याविरोधात ज्येष्ठे नेते आक्रमक

विधानसभेच्या तोंडावर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी समोर आली असून वर्षा गायकवाड यांच्याविरोधात मुंबईतले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आक्रमक झाले आहेत. पक्ष संघटनेच्या नियुक्त्यांवरुन वाद असल्याची माहिती समोर येत असून यासंबंर्भात पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली जाणार आहे. यासाठी मुंबईमधील काँग्रेसच्या काही नेत्यांनी दिल्ली हायकमांडची ‌ वेळ मागितल्याचे सांगण्यात येत आहे

Pune L3 Bar News: पतीत पावन संघटना आक्रमक; एल ३ बारची तोडफोड

पुण्यातील एफ सी रोड वर असलेल्या एल ३ बारमधील ड्रग्ज प्रकरण उघडकीस आल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी पतित पावन संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला असून बारची तोडफोड करण्यात आली आहे.

Pimpari Chinchwad: पिंपरी चिंचवडमध्ये वाहनांची तोडफोड; वाकड परिसरातील घटना

पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरामध्ये दोन अल्पवयीन गुन्हेगारांनी काल मध्यरात्री चार चाकी वाहनांची तोडफोड केली आहे. कोयता ने चार चाकी वाहनावर वार करून अल्पवयीन गुन्हेगारांनी वाहनांची तोडफोड केली आहे. वाकड पोलीस स्टेशन हद्दीतील गणेश नगर भागामध्ये काल मध्यरात्री ही घटना घडली आहे.

Maharashtra Politics: 'पिपाणी चिन्ह यादीतून वगळा,' शरद पवार गटाचे निवडणूक आयोगाला पत्र!

लोकसभा निवडणुकीत पिपाणी चिन्हामुळे झालेल्या अडचणीनंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने निवडणूक आयोगाला पत्र लिहले आहे. पिपाणी हे चिन्ह निवडणुकीच्या चिन्हाच्या यादीतून वगळण्यात यावं अशी शरद पवार पक्षाची मागणी आहे. निवडणूक आयोगाने योग्य तो निर्णय न घेतल्यास शरद पवार पक्ष सुप्रीम कोर्टात जाणार आहे.

Pune Breaking News: पुण्यात ३ तरुणांसह महिलेला बेदम मारहाण; VIDEO व्हायरल

पुणे जिल्ह्याच्या शिक्रापूर येथील तीन तरुणांसह एका महिलेला काही अज्ञात इसमाकडून अपहरण करून नेत बेदम मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. या तिघांना कारमधून अज्ञात स्थळी नेत लाठ्या काठ्या, कोयता ,तलवारीसह हात पाय बांधून जबर मारहाण करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Beed News: पंकजा मुंडे यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट,आज जिंतूर बंदची हाक

भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या विषयी समाज माध्यमावर अश्लील भाषेत आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे एकावर जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले आहे. या पोस्टमुळे सकल ओबीसी समाज बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत सकल ओबीसी समाज बांधवांच्या वतीने आज जिंतूर बंद ची हाक दिली आहे.

Jalgaon News: दुर्दैवी! वीज पडून १५ मेंढ्यांचा मृत्यू

जळगाव रात्री झालेल्या पावसाने वीज कोसळल्यामुळे शिरसोदे येथे पंधरा मेंढ्या दगावल्याची घटना घडली. पारोळा रात्रीच्या सुमारास झालेल्या पावसात शिरसोदे येथे मखनापूर पाझर तलाव परिसरामध्ये विज पडल्यामुळे पंधरा मेंढ्या व एक बकरी दगावली. यावेळी मेंढपाळही विजेच्या धक्का बसल्यामुळे दुखापत झाली असून मोठे आर्थिक नुकसान झाले.

Dhule Shirpur News: शिरपुरमध्ये मुसळधार पाऊस; वीज पडून दोन बैल ठार

शिरपूर तालुक्यात अभानपूर येथे रविवारीच्या रात्री साडे आठ वाजेच्या दरम्यान अचानक वादळी-वाऱ्यासह पाऊस सुरू झाला, दरम्यान अभानपूर पासून एक किमी अंतरावरील शेत शिवारात वीज पडून दोन बैल ठार झाले आहेत. अभानपुर शिवारातील रतु पोलाद भिल या शेतकऱ्याच्या बैलांच्या गोठ्यावर वीज पडल्याने त्यांचे दोन बैल मृत्यूमुखी पडले आहेत, त्यामुळे सदर शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नुकसान भरपाईची मागणी केली जात आहे.

Arvind Kejriwal News: CM केजरीवाल यांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी

दिल्ली उच्च न्यायालयाने केजरीवाल यांच्या जमिनीला दिलेल्या स्थगितीविरोधात अरविंद केजरीवाल यांनी काल सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. अरविंद केजरीवाल यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी सुरू झाली आहे. केजरीवाल यांच्या बाजूने अभिषेक मनु सिंघवी तर ED च्या वतीने तुषार मेहता बाजू मांडत आहेत

Parliament Session Live Updates:  अधिवेशनाच्या पहिल्याच सत्रात विरोधक आक्रमक; प्रोटेम स्पीकर पॅनेलवर बहिष्कार

संसदेच्या पहिल्या सत्रात विरोधकांचा पहिला मोठा विरोध पाहायला मिळाला. आज विरोधी पक्षाच्या तीनही खासदारांनी प्रोटेम स्पीकर पॅनेलवर बहिष्कार टाकला. काँग्रेसचे के सुरेश, TMC चे सुदीप बंदोपाध्याय आणि DMK चे टीआर बालू यांनी प्रोटेम स्पीकर पदाच्या पॅनलची शपथ घेण्यास नकार दिला. सर्वात ज्येष्ठ सदस्य असलेल्या के सुरेश यांना प्रोटेम स्पीकर नियुक्त करावं अशी मागणी विरोधकांनी केली होती.

Pune Ravindra Dhangekar News: पुणे पोलीस आयुक्तांनी पदभार सोडावा, आमदार रविंद्र धंगेकर आक्रमक

पुणे पोलीस आयुक्तांनी स्वतः पदभार सोडावा, ड्रग्स प्रकरणात त्यांनी स्वतः जबाबदारी घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. ड्रग्ज प्रकरणात योग्य ती कारवाई होणं अपेक्षित असताना ती होताना दिसत नाही. पुणे पोलीस, राज्य उत्पादन शुल्क विभाग गप्प का आहेत? असा सवाल करत अधिवेशनात पब मुक्त पुणे ड्रग्जमुक्त पुणे यासाठी आवाज उठवणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Sindhudurg Rain: सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची हजेरी; हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळपासून दमदार पाऊस सुरू झाला आहे. मालवण तालुक्यात सकाळपासूनच मुसळधार पाऊस कोसळत असून समुद्रही खवळलेला पाहायला मिळत आहे. हवामान विभागाकडून आज सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे त्यामुळे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

Jalgaon News: मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून अनाथ व गोरगरीब मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

जळगावच्या धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे आज मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते गरीब वाहनात मुलांना शैक्षणिक साहित्याच्या किटचे वाटप करण्यात आले. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या तर्फे दरवर्षी हा कार्यक्रम घेतला जातो. सालाबदाप्रमाणे यावर्षी सुद्धा आज हा कार्यक्रम पारधी येथे पार पडला या कार्यक्रमात तब्येत विद्यार्थ्यांना तब्बल दीड लाख वह्या पुस्तक तसेच शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आल .

Parliament Session Live: संसद परिसरात विरोधकांचे आंदोलन; संविधानाची प्रत घेऊन घोषणाबाजी

आज १८ व्या लोकसभेच्या संसदीय अधिवेशनाला सुरूवात होत आहे. त्याआधी संसद भवन परिसरात विरोधकांनी आंदोलक केले. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी हातात संविधानाची प्रत घेऊन केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

Parliament Session 2024 Live: १८ व्या लोकसभेच्या अधिवेशनाला सुरूवात; PM मोदींनी घेतली शपथ!

आज १८ व्या लोकसभेच्या संसदीय अधिवेशनाला सुरूवात होत आहे. आज देशभरातील नव्या खासदारांचा शपथविधी होणार आहे. तत्पुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदीय सदस्यत्वाची शपथ घेतली. त्यानंतर देशभरातील खासदार शपथ घेतली.

Sanjay Raut News: 'मोदी- शहांना विरोधी पक्ष कळेल', संजय राऊतांचे टीकास्त्र

"आजपासून संसदेचे अधिवेशन सुरू होत आहे. पहिले ३ दिवस नवीन खासदारांचा शपथविधी होईल. इंडिया आघाडीचे खासदार महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ जमतील. हातात संविधानाची प्रत घेत संविधानाच्या प्रति कटिबद्ध आहोत हे संदेश देतील, मोदी शहांच्या ईस्ट इंडिया कंपनीला आता विरोधी पक्ष कळेल," असे संजय राऊत यावेळी म्हणाले.

MNS Morcha Navi Mumbai: मनसेचा नवी मुंबई मनपा मुख्यालयावर मोर्चा; विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके देण्याची मागणी

एप्रिलमध्ये दहावीचे वर्ग सुरु होऊन देखील अद्याप पाठ्यपुस्तके दिले नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. आज मनसेने दहावीच्या विद्यार्थ्यांसह नवी मुंबई मनपा मुख्यालयावर मोर्चा काढला. सर्व आंदोलनकर्त्यांना मुख्यालयात सोडत नसल्याने मनसे कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांनी प्रवेशद्वारावर ठिय्या दिला. सर्व विद्यार्थ्यांना तात्काळ पाठ्यपुस्तके देण्याची मागणी यावेळी केली.

NEET Exam Scam: नीट परीक्षा घोटाळा: शिक्षकांकडे आढळले १२ विद्यार्थ्यांचे एडमिट कार्ड

नीट पेपर फुटी प्रकरणात आता मोठी माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या ताब्यात असणाऱ्या शिक्षकाच्या मोबाईलमध्ये जवळपास 12 विद्यार्थ्यांचे एडमिट कार्ड आढळल्याची माहिती मिळाली आहे. एका एका विद्यार्थ्यासाठी 40 ते 50 लाख रुपये आर्थिक व्यवहार झाल्याचेही सांगण्यात येत असून ते बारा विद्यार्थी नेमकी कुठले आहेत आणि यांच्यासोबत किती मोठा आर्थिक व्यवहार झाला याची माहिती आता पोलिसांकडून तपासली जात असल्याची माहिती मिळत आहे.

Narendra Modi Speech: आणीबाणी देशाला लागलेला काळा डाग : पंतप्रधान मोदी

आणीबाणीला उद्या ५० वर्ष पूर्ण होत असून २५ जून हा कधी न विसरणारा दिवस आहे. आणीबाणी देशाला लागलेला काळा डाग आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेतील भाषणातून केली आहे.

PM Narendra Modi Speech: संसदीय लोकशाहीत आजचा दिवस वैभवाचा: PM नरेंद्र मोदी

आज १८ व्या लोकसभेच्या संसदीय अधिवेशनाला सुरूवात होत आहे. आज देशभरातील नव्या खासदारांचा शपथविधी होणार आहे. संसदेच्या कामकाजाला सुरूवात होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व नवनिर्वाचित खासदारांना शुभेच्छा दिल्या. देशाच्या प्रगतीची स्वप्न घेऊन संसदीय कामकाजाला सुरूवात करु, जगातली सर्वात मोठी निवडणूक शानदार झाली. आम्ही सर्वांना सोबत घेऊन जाणार आहोत," असे ते म्हणाले.

Rohit Pawar News: आमदार रोहित पवार घेणार राज्यपालांची भेट; विद्यार्थी, शेतकऱ्यांच्या समस्यांवर निवेदन देणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र गटाचे आमदार रोहित पवार हे आज राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेणार आहेत. आज सायंकाळी ४ वाजता रोहित पवार हे राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेणार असून शेतकरी, विद्यार्थी यांच्याशी संबंधित विविध समस्यांबाबत राज्यपालांना भेटून निवेदन देणार आहेत.

Beed Agriculture News: बीड जिल्ह्यात पुन्हा गोगलगायीचे संकट; उत्पादनाला फटका बसणार

बीड जिल्ह्यात यंदा 3 लाख हेक्टर वर सोयाबीनचा पेरा झाला असून यावर आता यावर्षीही गोगलगायचे संकट आल्याचे पाहायला मिळत आहे. सोयाबीनचे अंकुर उगताच गोगलगायचा हल्ला होत असून यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. गतवर्षी याचा फटका बसल्यानंतर आता यावर्षी कृषी विभाग व शेतकरी उपाययोजना करत असले तरी हे संकट कायम आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या उत्पन्नात घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Pune News: इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली; वारकऱ्यांचा संताप

संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा काही तासांवर येऊन ठेपला असताना, आज ही इंद्रायणी नदी फेसाळलेली आहे. इंद्रायणी नदीकडे दुर्लक्ष करून गेल्या सात वर्षांपासून सरकारकडून वारकऱ्यांच्या जीवाशी खेळ सुरु आहे. काही मूठभर कंपन्या नदीत रसायनयुक्त पाणी सोडून, नदीत विष कालवत आहेत. मात्र या कंपन्यांचा बंदोबस्त हे सरकार लावू शकत नाही, ही मोठी शोकांतिका आहे. यामुळं वारकऱ्यांमध्ये मोठा रोष निर्माण झाला आहे.

Pune News:  'ड्रग्स प्रकरणात कडक कारवाई करा' मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांचे आदेश

पुणे ड्रग्ज प्रकरणी कडक कारवाई करण्याच्या सुचना मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. यासंबंधी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना फोन करुन कालच्या प्रकरणाची माहिती घेण्यात आली. तसेच याप्रकरणी जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करा, असे आदेश दिले आहेत.

BJP Meeting News: लोकसभेतील पराभवानंतर भाजपची मंथन बैठक; विधानसभेची रणनिती ठरणार

राज्यातील लोकसभेच्या दारुण पराभवानंतर भारतीय जनता पक्ष मंथन करणार आहे. यासाठी भाजपची पुढील आठवड्यात मंथन बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला भाजपचे राज्यातील वरिष्ठ 20 नेते उपस्थित राहणार असून लोकसभेला झालेल्या चुका टाळून विधानसभा निवडणुकीची रणनीती बैठकीत ठरवली जाणार आहे.

Nashik Breaking News: जळगावच्या तरुणाची नाशिकमध्ये आत्महत्या

नाशिकच्या मालेगावमध्ये जळगाव येथून टायपिंगच्या परीक्षेला आलेल्या तरुणाने आत्महत्या आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. कुलदीप पाटील असे या तरुणाचे नाव आहे. 19 तारखेला तो मालेगाव येथे टायपिंगच्या परीक्षेला आला होता,परीक्षा संपल्यावर तो आपल्या गावी पुन्हा गेला नाही त्यामुळे घरच्या लोकांनी त्याचा शोध घेतला मात्र मोबाईल बंद येत असल्याने अखेर मालेगाव पोलिसात हरवल्याची तक्रार करण्यात आली होती. तपासामध्ये त्याने आत्महत्या केल्याचे समोर आले.

Ahmednagar News : मार्केटमध्ये कांद्याची आवक वाढली, भावही वधारले; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण

अहमदनगर कांदा मार्केट मध्ये कांद्याची आवक वाढली असून भावही वाढले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. शुक्रवारी नगरच्या नेप्ती उपबाजार समितीत ३७४ ट्रक म्हणजे ४१ हजार १४१ क्विंटल कांद्याची आवक झाली. यात सरासरी ४०० ते ३१०० रुपये असा दर कांद्याला मिळाला.

मागील लिलावाच्या तुलनेत यावेळी चांगली वाढ झाली आहे. त्यामुळे ऐन मान्सूनच्या आगमनालाच भाव वाढले असल्याने आता कांदा विक्री केली तर खरिपात पेरणीसाठी लागणाऱ्या खते व बियाणे खरेदी करण्यासाठी लागणारी रक्कम वेळीच उपलब्ध होणार आहे. यामुळे थोडा फार का होईना शेतकऱ्यांना आधार मिळाला आहे.

आज कांद्याला काय भाव मिळतो हे आता दुपारी लावल्यानंतर कळेल मात्र गेल्या काही दिवसांपासून कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने आजही चांगला भाव फुटेल अशा अपेक्षा शेतकरी वर्गाला आहे.

Beed News : सोयाबीनवर पुन्हा एकदा गोगलगायीचे संकट; शेतकरी, कृषी विभाग सतर्क

बीड जिल्ह्यात यंदा 3 लाख हेक्टर वर सोयाबीनचा पेरा झाला असून यावर आता यावर्षीही गोगलगायचे संकट आल्याचे पाहायला मिळत आहे. सोयाबीनचे अंकुर उगताच गोगलगायचा हल्ला होत असून यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

गतवर्षी याचा फटका बसल्यानंतर आता यावर्षी कृषी विभाग व शेतकरी उपाययोजना करत असले तरी हे संकट कायम आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या उत्पन्नात घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Sambhajinagar News : संभाजीनगरमध्ये दामिनी पथकाने १७ महिन्यात रोखले तब्बल ९२ बालविवाह; ४ अल्पवयीन मुली बालगृहामध्ये

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात गेल्या 17 महिन्यात तब्बल बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आला आहे. चाईल्ड दामिनी पथक आणि महिला बाल विकास अधिकाऱ्यांनी चालू वर्षात आतापर्यंत हे बालविवाह रोखले असून ही प्रकरणे बालकल्याण समिती समोर सादर करण्यात आली आहे.

यापैकी चार अल्पवयीन मुलींना बालगृहांमध्ये दाखल करण्यात आले असून संबंधितावर गुन्हेही दाखल करण्यात आले आहे. दरम्यान बालविवाह रोखण्यासाठी १०९८ या हेल्पलाइन नंबरवर माहिती द्या, तसेच माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल असे आवाहन आता प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात तुफान पाऊस; नद्या-नाल्यांना पूर

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड परिसरात काल सायंकाळी धुव्वाधार पाऊस झाल्याने परिसरातील पिकांना जीवदान मिळाले आहे. शिवाय आज सकाळपासून ढगाळ वातावरण असल्याने पावसाची शक्यता आहे. बळीराजा या पावसाने आनंदित झाला आहे. सिल्लोड तालुक्यातील बहुतांशी शेतकऱ्यांनी गेल्या काही दिवसापूर्वी कोरड्या जमिनीत पिकांची पेरणी केली होती.

पाऊस हुलाकावणी देत असल्याने मात्र शेतकरीवर्ग बऱ्याच दिवसापासून पावसाची प्रतीक्षा करीत चिंताग्रस्त होता. मात्र केऱ्हाळा, भवन, निल्लोड, कायगाव, वरुड, पिंप्री, पिंपळगाव पेठ, तांडाबाजार, टाकळी जिवरग, बनकिन्होळा, गेवराई सेमी, तलवाडा, गव्हाली आदी परिसरात दुपारपासून सायंकाळपर्यंत जोरदार पावसाने दुरपर्यंत दीड ते दोन तास सततधार हजेरी लावली.

त्यामुळे परिसरातील छोट्या मोठ्या नदी नाल्यां वाहू लागले व कोरड्यात पेरणी केलेल्या पिकांना मात्र जीवदान मिळाल्याने परिसरातील शेतकरी वर्ग आनंदित झाला आहे.

Sambhajinagar News : अंत्योदय रेशन कार्डधारकांच्या घरावर लागणार पाट्या; राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांना सूचना.

बीपीएल अर्थातच अंत्योदय रेशन कार्डधारकांच्या घरावर पाट्या लावण्याच्या सूचना आता राज्य शासनाने जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. गरिबांना धान्य मिळावे यासाठी शासनाने अंत्यय योजना सुरू केली आहे मात्र त्यांचे धान्य इतरत्र पळवले जात असल्याचीही बाब आणि तक्रारी वाढल्यामुळे शासनाकडून कार्डधारकाची ओळख व्हावी यासाठी पाट्या लावण्याचा निर्णय घेतला आहे. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात 66,105 लाभार्थी हे अंत्योदय योजनेचे असून यामुळे गरिबांचे धान्य लुटणाऱ्यांची आता गोची होणार आहे.

Sambhajinagar News : बैल बाजारात खरेदी विक्रीची उलाढाल वाढली; शेतकऱ्यांची आठवडे बाजारात गर्दी

यंदाच्या पेरणीचा खरीप हंगाम सुरू होताच जनावरांच्या आठवडी बाजारात मोठ्या प्रमाणात पशुधन विक्रीसाठी आलेले असून शेतकरी, व्यापारी आणि पशुपालक यासह काही नागरिकांनी बैल खरेदी करण्यासाठी गर्दी केलीय. असंख्य शेतकरी रब्बी हंगाम संपल्यानंतर उन्हाळ्यातच आपली जनावरे विकून टाकतात आणि शेती हंगाम जवळ आला की पुन्हा नवीन बैल जोडी खरीप हंगामासाठी खरेदी करतात.

दरम्यान काही ठिकाणी पेरणी योग्य पाऊस झाला असल्याने शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी बैल जोडी खरेदी करण्यासाठी आता पासूनच आठवडी बाजारात लगबग सुरू केली असून मोठ्या प्रमाणात पशुधन आठवडी बाजारात विक्रीसाठी आलेले आहे.

Vidhan Parishad Election : विधानपरिषदेसाठी महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरू

विधानपरिषदेसाठी महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरू

रिक्त होत असलेल्या ११ जागांसाठी मतांचा कोटा ठरवणार जागा कुणाचा?

लोकसभेत पराभूत झालेले उमेदवारांना पुन्हा संधी देण्याचा विचार सुरू

शिवसेना ठाकरे गटाला मिळणाऱ्या जागेवर विदर्भाची लॅाबिंग सुरू.

शरद पवार युवकाला पदाधिकाऱ्याला संधी देण्याची शक्यता तर कांग्रेसकडे वरिष्ठ नेत्यांना संधी मिळू शकते.

उद्धव ठाकरे पक्षातर्फे विदर्भात सुधीर सुर्यवंशी, जयदीप पेंडके यांच्या नावाची चर्चा. दुसरीकडे शरद पवार गटात ग्रामीण भागातील युवकाच्या शोधात, काँग्रेस मुंबईतली अल्पसंख्याक चेहरा उतरवण्याच्या तयारीत

Parliament Session : आजपासून संसदेचे अधिवेशन, खासदारांचा होणार शपथविधी

भाजप प्रणित एनडीए सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील १८ व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन आज सोमवारपासून सुरू होत आहे.या अधिवेशनात पहिले दोन दिवस नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी होणार आहे. त्यानंतर लोकसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे अभिभाषण होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अभिभाषणासाठी धन्यवाद प्रस्ताव मांडून चर्चेला सुरूवात करणार आहेत. यासह देशविदेश आणि महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.