Today Marathi News : मतदान मोजणी केंद्र परिसरात मुंबई पोलिसांनी वाहतूक मार्गात केले काही बदल

Maharashtra Chya Tajya Marathi Batmya Live (3 june 2024) : देशासहित विदेशातील राजकीय घडामोडी, महाराष्ट्रातील राजकारण, लोकसभा निवडणुका अपडेट्स आणि राज्यातील लाईव्ह अपडेट एका क्लिकवर वाचा.
राज्यातील प्रत्येक महत्वपूर्ण घडामोडींचे वेगवान अपडेट वाचा
Today's Marathi News Live Saam tv

लोकसभा निवडणूक मतमोजणीसाठी मुंबई शहर जिल्हा प्रशासन सज्ज

लोकसभा निवडणूक मतमोजणीसाठी मुंबई शहर जिल्हा प्रशासन सज्ज

मतमोजणी केंद्रात मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणण्यास सक्त मनाई

ईव्हीएम मतमोजणीसाठी विधानसभा क्षेत्रानिहाय प्रत्येकी १४ टेबल

टपाली मतपत्रीकांच्या मोजणीसाठीही १४ टेबल

मतदान मोजणी केंद्र परिसरात मुंबई पोलिसांनी वाहतूक मार्गात केले काही बदल

मतदान मोजणी केंद्र परिसरात होणारी गर्दी पाहता मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहतूक मार्गात काही बदल केले आहेत.

4 जून सकाळी ५ ते सायंकाळी ६ सर्व वाहनांना तात्पुरत्या स्वरूपात बंदी

नेस्को सेंटर तीन मतदारसंघाची मतमोजणी होणार आहे

मतदार संघाचे उमेदवार त्यांचे कार्यकर्ते आणि प्रसारमाध्यमांची वाहने यांची गर्दी लक्षात घेता वाहतूक विभागाने बदल केला आहे

एक प्रसिद्धी पत्र काढून वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्यास सांगितले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकलाआधीच विरोधी पक्षाची सावध भूमिका

लोकसभा निवडणुकीच्या निकलाआधीच विरोधी पक्षाची सावध भूमिका

INDIA आघाडीचे सर्व मोठे नेते उद्या संध्याकाळी किंवा परवा दिल्लीत येणार

निकालाचे आकडे पाहून दिल्लीत येण्याचा निर्णय घेतला जाणार

काँग्रेसकडून आघाडीतील मित्रपक्षांना याची कल्पना दिल्याची माहिती

पुढची रणनीती ठरवण्यासाठी मोठा निर्णय घेतला जाणार

सूत्रांनी दिली महत्वाची माहिती

नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात तुफान पाऊस, नद्यांना पूर

नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात तुफान पाऊस

सातपुड्याच्या नद्यांना भर उन्हात आला पूर

घाटली परिसरात भर उन्हात आला नदीला पूर

घातली ते काकडदा दरम्यान असलेल्या नदीला आला पूर

अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे आंब्याचे मोठं नुकसान

देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या व्यक्तीचा उद्धव ठाकरे यांना फोन

देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या व्यक्तीचा उद्धव ठाकरे यांना फोन

उद्याच्या निकालानंतर मागितली उद्धव ठाकरे यांची भेट

संध्याकाळी 5.30 वाजताची मागितली वेळ

काल दीपक केसरकर यांनी निकालानंतर उद्धव ठाकरे भाजप सोबत येतील असं केलं होतं वक्तव्य

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पुन्हा जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पुन्हा जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस

खुलताबाद, गंगापूर, कन्नड तालुक्यातील अनेक भागात पाऊस

शहर परिसरात वादळी वाऱ्यामुळे आकाशात सगळीकडे धुळ

आकाशात ढग दाटून आले आहेत, सोसाट्याचा वारा सुरू आहे

कोल्हापूरात ६ जणांना चिरडणारी कार माजी कुलगुरूंची

कोल्हापूर सायबर चौक भरधाव कार अपघात प्रकरण

६ जणांना चिरडणारी ती कार शिवाजी विद्यापीठाच्या माजी प्र कुलगुरूंची

शिवाजी विद्यापीठाचे माजी प्र कुलगुरू व्ही एम चव्हाण यांच्या कार ने दिली दुचाकींना धडक

शिवाजी विद्यापीठाचे माजी प्र कुलगुरू व्ही एम चव्हाण यांचा देखील झालाय मृत्यू

व्ही एम चव्हाण तब्येत बरी नसतानाही कार चालवत असल्याची माहिती आली समोर

दिल्लीमध्ये ताज एक्स्प्रेस ट्रेनला भीषण आग

दिल्लीतील सरिता विहारजवळ पॅसेंजर ट्रेनला आग

अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल

आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू

आगीत ४ डबे जळले असल्याची माहिती

ताज एक्स्प्रेस ट्रेनला भीषण आग

दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची सुप्रीम कोर्टात धाव

दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची सुप्रीम कोर्टात धाव

मनीष सिसोदिया यांनी जामिनासाठी सुप्रीम कोर्टात दाखल केली याचिका

उद्या होणार मनीष सिसोदियांच्या याचिकेवर सुनावणी

21 मे रोजी दिल्ली हायकोर्टाने मनीष सिसोदिया यांना जामीन देण्यास दिला होता नकार

सिसोदिया यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केल्याचे हायकोर्टाने म्हटले होते

घोटाळ्याचे इलेक्ट्रॉनिक पुरावेही नष्ट करण्यात आले असही निरीक्षण दिल्ली हायकोर्टाने नोंदवलं होत

सिसोदिया बाहेर येण्याने पुरावे आणि साक्षीदारांवर प्रभाव पाडू शकतात अस महत्वाचं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं होत

रवींद्र धंगेकरांनी 17 सी फॉर्मवर घेतलं ऑब्जेक्शन, पुणे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

- पुणे लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्याकडून 17 सी फॉर्मवर ऑब्जेक्शन

- ⁠सहा विधानसभा मतदारसंघातील 53 बुथवरील 17 सी फॉर्मवर घेतले ऑब्जेक्शन

- ⁠ऑब्जेक्शनचे पत्र पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले

- या 53 बुथवरील सर्व व्हीव्हीपॅटमधील मतदान मोजण्याची केली मागणी

- ⁠या 53 बूथवरील 17 सी फॉर्ममधील मतदानाची टोटल लागत नाही, ईव्हीएम नंबर दिलेले नाहीत अशा स्वरूपाची धंगेकर यांची तक्रार

- ⁠17 सी फॉर्म मध्ये मतदानानंतर एकूण किती मतदान झाले याची माहिती निवडणूक आयोगाकडून उमेदवारांच्या प्रतिनिधींना 17 सी फॉर्मच्या स्वरूपात दिली जाते

- ⁠धंगेकर यांच्या मागणीमुळे मतमोजणीला विलंब होण्याची शक्यता

- ⁠ 17 सी फॉर्मचा वाद सुप्रीम कोर्टापर्यंत गेला होता

लोअर परळमधील शाह अ‍ॅण्ड नाहर इंडस्ट्रीज परिसरात भीषण आग

लोअर परळमधील शाह अ‍ॅण्ड नाहर इंडस्ट्रीज परिसरात आग

अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल

इंडस्ट्रीजमधील एका गाळ्याला आग लागल्याची माहिती

आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू

उद्धव ठाकरेंच्या हस्ते ठाकरे गटाच्या डायरी बूकचे अनावरण

उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेना ठाकरे गटाच्या डायरी बूकचे अनावरण झालं. यावेळी आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, अनिल परब, सुभाष देसाई आणि अनिल देसाई उपस्थित होते.

३१.४ कोटी महिलांनी मतदानाचा हक्क बजावला - मुख्य निवडणूक आयुक्त

मुख्य निवडणूक आयु्क्त राजीव कुमार काय म्हणाले?

आम्ही आतापर्यंत १०० प्रेस नोट काढल्या. यंदा ६४ कोटी लोकांनी मतदान केलं. ३१.४ कोटी महिला मतदारांनी मतदानाचा हक्का बजावला.

काळेवाडीत निवासी परिसरातील कारखान्याला भीषण आग, पिंपरी चिंचवडमधील घटना

पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी येथे एका निवासी परिसरातील कारखान्याला भीषण आग लागली आहे. ज्या ठिकाणी आग लागली, त्या गोडाऊनमध्ये गॅस सिलेंडरचे स्फोट देखील होत आहेत तसेच आगीच काळ धूर आकाशात सर्वत्र पसरले आहेत.

Central Railway : पश्चिम रेल्वे पाठोपाठ मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत

पश्चिम रेल्वे पाठोपाठ मध्य रेल्वेची सेवा देखील विस्कळित झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर तांत्रिक बिघाडामळे गाड्या वीस मिनिटे उशिराने धावत आहेत.

कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक तिरंगी होणार, भाजपकडून निरंजन डावखरेंना उमेदवारी जाहीर

शिवसेना पक्षाकडून शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांनी कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीकरिता कोकण भवन येथून उमेदवारी अर्ज घेतला आहे. त्यामुळे कोकण पदवीधर मतदारसंघात आता तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. तसेच मनसेकडून अभिजीत पानसे आणि भाजपकडून निरंजन डावखरे मैदानात आहेत.

दिल्ली-मुंबई विमानात बॉम्बचा कॉल, अहमदाबादमध्ये इमर्जन्सी लँडिग

दिल्ली मुंबई akasa विमानात बॉम्बच्या धमकीचा कॉल आला. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून विमानाचं अहमदाबाद येथे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. या विमानात 187 प्रवासी आणि सहा क्रू मेंबर्स होते.

Nashik Crime News : नाशिकमध्ये पुन्हा एका माजी नगरसेवकावर हल्ला

नाशिकमध्ये पुन्हा एका माजी नगरसेवकावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. गाडीला कट मारल्याच्या कारणावरून 2 ते 3 अज्ञात लोकांनी मारहाण केली. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.

एक्झिट पोलवर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची पहिली प्रतिक्रिया

एक्झिट पोलवर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्हाला अपेक्षा आहे हा निकाल एक्झिट पोलच्या विरुद्ध असेल, अशी प्रतिक्रिया सोनिया गांधी यांनी एका वृत्तसंस्थेला दिली.

Political News : दिल्लीत मोठी घडामोड; बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार PM मोदींच्या भेटीला

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या दिल्ली दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. निवडणूक निकालापूर्वी पंतप्रधान मोदी-नितीश कुमार यांच्या भेटीने चर्चांना उधाण आलं आहे. तसेच नितीश कुमार दुपारी ४ वाजता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीही भेट घेणार आहे.

Sindhudurg rain : सिंधुदुर्गात ऊन पावसाचा खेळ; काही भागात पूर्वमोसमी पाऊस, तर काही ठिकाणी कडक ऊन

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळू लागल्या आहेत. मालवण, वेंगुर्ले व सावंतवाडी तालुक्याच्या काही भागात पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे हवेत गारवा आहे. सकाळी दहा वाजल्यापासून पाऊस सुरू आहे. तर काही भागात कडक ऊन पाहायला मिळत आहे.

Manoj Jarange Patil : सगे सोयरेच्या अंमलबजावणीसाठी पुन्हा एकदा जरांगे पाटील यांचे उपोषणास्त्र

अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील पाचव्यांदा उपोषणाला बसणार आहेत. मराठा आंदोलक मनोज जारंगे पाटील हे ४ जूनला पाचव्यांदा उपोषणाला बसणार आहेत. त्यासाठी त्यांची तयारी पूर्ण झाली आहे.

Washim Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, 3 जण जागीच ठार

वाशिममध्ये समृद्धी महामार्गावर कारची उभ्या ट्रकला धडक दिली. या भीषण अपघातात 3 जण जागीच ठार झाले. वाशिमच्या मालेगांव मालेगाव तालुक्यातील रिधोरा इंटरचेंजजवळ हा अपघात झाला. भीषण अपघातात कार चालकासह तीन जण ठार झाले.

Delhi Water Issue : दिल्लीतील पाणी समस्येवर सुप्रीम कोर्टात याचिका, आज सुनावणी होणार

दिल्लीतील वाढत्या पाणी समस्येवर दिल्ली सरकारने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.हरियाणा, उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेशकडून महिनाभर अतिरिक्त पाणी देण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. कडाक्याच्या उन्हात दिल्लीची पाण्याची गरज वाढली आहे, असं दिल्ली सरकारचं म्हणणं आहे. देशाच्या राजधानीच्या गरजा पूर्ण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असंही दिल्ली सरकारने म्हटलं. दिल्ली सरकारच्या कोर्टातील याचिकेत या मागण्या करण्यात आल्या आहेत.

Rahul Gandhi News : राहुल गांधींना बेंगळुरू कोर्टात हजर राहावं लागणार, काय आहे प्रकरण?

काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांना न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहावं लागणार आहे. राहुल गांधी यांना एका मानहानी प्रकरणात ७ जूनला बंगळुरु न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहावं लागणार आहे. राहुल गांधी यांना 2 जूनलाच न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश होते. मात्र, इंडिया आघाडीच्या निवडणुकीच्या संदर्भातील बैठकीमुळे आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी उपस्थित राहू शकले नाहीत.

Mumbai Traffic : आठड्याच्या पहिल्या दिवशी वाहतूक कोंडी; ठाणे ते मुंबईदरम्यान रस्त्यावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा

आठवड्याचा पहिला दिवस चाकर मान्यांना वाहतूक कोंडीचा फटका बसला आहे. ठाणे ते मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मुलुंड टोल नाक्यावर वाहतूक कोंडी आनंदनगर जकात नका ते ऐरोलीपर्यंत वाहतूक कोंडी आहे. गेल्या अर्धा ते पाऊण तासांपासून वाहतूक कोंडी आहे. दोन ते तीन किलोमीटर वाहतुकीचा सामना हा वाहनधारकांना करावा लागत आहे. रुग्णवाहिकांना देखील याचा फटका बसत आहे

Pune Hit And Run Case : अग्रवाल पती-पत्नीने कोणाच्या मध्यस्थीने डॉ. तावरेशी संपर्क साधला?

विशाल अग्रवाल यांच्या सांगण्यावरून ससूनच्या आपत्कालीन विभागाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर यांनी शिवानी यांचे रक्त घेतल्याचे समोर आले आहे. विशाल अग्रवाल याने ससूनमधील कर्मचारी अतुल घटकांबळे याला दोन संशयित व्यक्तींच्या मदतीने तीन लाख रुपये डॉ. हाळनोर यांना दिले, त्या व्यक्तींची माहिती घ्यायची आहे.

रक्ताचा नमुना घेतला, त्या दिवशीचे ससून रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आले आहेत. विशाल अग्रवाल यांच्यावर एकूण तीन गुन्हे नोंद आहेत. अल्पवयीन मुलाला वाहन चालविण्यास परवानगी देणे, चालक गंगाधर शिवराज हेरीक्रुब यांच्या अपहरणाचा प्रयत्न आणि रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट केला, असे तीन गुन्हे त्यांच्यावर नोंद आहेत.

Jalna bus Accident : जालन्यात बसचा आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात; १ ठार १६ जखमी

छत्रपती संभाजीनगरात बसचा आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात

जालना मार्गावर कुंभेफळ चौकात बसने मजूर घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला धडक दिल्याने अपघात

भीषण अपघातात एक जण ठार तर १६ जण जखमी झाल्याचा प्राथमिक अंदाज.

आज सकाळी साडेतीन वाजता घटना घडली

जखमींवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू

Nagpur News : नागपूरसह विदर्भात पूर्वमोसमी पावसाची शक्यता

नागपूरसह विदर्भात पूर्वमोसमी पावसाची शक्यता

नागपूरसह विदर्भात मान्सून पूर्व पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आज काही जिल्ह्यांना ऍलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

कालपासून उन्हाचा पारा कमी झाल्याने पावसासाठी पोषक वातावरण तयार झालं आहे.

45 पार गेलेले तापमान आता कुठे तरी कमी झालं आहे.

ढगाळ वातावरण सध्या असल्यानं तापमात घट राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे

UGC Net Exam : यूजीसी नेट परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

सहायक प्राध्यापक पदासाठी आणि पीएचडी प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्‍या यूजीसी नेट परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध

नेट परीक्षा येत्या 18 जूनला घेतली जाणार

प्रथमच नेट परीक्षेच्या गुणांच्या आधारे देशभरातील विद्यापीठांमधील पीएच.डी. पदवीसाठी प्रवेश

नेट परीक्षा दोन सत्रात घेतली जाणार

परीक्षा - सकाळी पहिलं सत्र- 9.30 ते 12.30

दुसरं सत्र - दुपारी 3 ते 6 वाजता

नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे युजीसी नेट परीक्षा घेतली जाणार

यंदाची नेट परीक्षा पेन आणि पेपर पद्धतीने घेतली जाणार

परीक्षेच्या तारखेसह परीक्षा शहर स्लिप प्रसिद्ध करण्याबाबतची माहिती जाहीर

Solapur News : ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांच्या गाभाऱ्यात २१ डझन आंब्याची सजावट

सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या गर्भगृहात २१ डझन आंब्यांची सजावट

सिद्धरामेश्वर महाराजांचे भक्त कैलास कुंभार यांनी ही सजावट

मागील सात वकर्षांपासून कुंभार यांच्याकडून सजावट

गर्भगृहात आंब्यांची सजावट केल्यामुळे मंदिर परिसरात आंब्यांचा सुगंध

Shirur Lok Sabha : शिरूरमध्ये झळकले कोल्हेंचे बॅनर; एक्झिट पोलनंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

शिरुर लोकसभा मतदारसंघाचा गड अमोल कोल्हे राखणार असल्याचा अंदाज एक्झिटपोलमधून वर्तवला आहे. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हेंना शुभेच्छा देणारे बॅनर शिरुर लोकसभा मतदारसंघात झळकले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com