विभागीय क्रीडा संकुल अंतर्गत 'नागपूर स्पोर्ट हब' या 684 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे भूमिपूजन नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपुरातील मानकापूर येथे करण्यात आले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदाच फेरीवाल्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी, मी मुख्यमंत्री म्हणून काम करत असलो तरी मी एक कार्यकर्ता आहे. मराठी, अमराठी, हिंदू-मुस्लीम असा भेदभाव नाही. फेरीवाल्यांशिवाय लोकांना करमणार आहे का ?. कोर्टाने अवैध फेरीवाल्यांच्यांबद्दल कडक शब्दात टिपण्णी केली. संजय निरुपम हे आमच्या फेरीवाल्यांचे नेते आहेत, असं ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांचे काही बगलबच्चे याची नार्कोटेस्ट करा त्याची नार्कोटेस्ट करा अशी मागणी करत आहेत. माझे आव्हान आहे, तुमची सत्ता आहे, करून घ्या. भीती कुणाला दाखवता? वेळोवेळी दिशाभूल करणाऱ्या वाझेवर विश्र्वास ठेवता येणारं नाही. असे हाय कोर्टाने सांगितले आहे. तरीही भाजपचे नेते अशा गोष्टी करून कुणाला धमकावण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांनी केला आहे.
मुंबईतील पवई चांदिवली परिसरात बीएमसीची पाईपलाईन फुटली आहे. पालिकेकडून पाईप लाईन दुरुस्त करण्याचं काम सुरु आहे. पाईपलाईन फुटल्याने लाखो लीटर पाण्याची नासाडी झाली आहे.
काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांचा अप्रत्यक्ष दिलीप माने यांना पाठिंबा दिला आहे. दिलीप माने यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहुयात. दिलीप मानेंना भविष्यात कुठेही संधी असेल त्यावेळी आम्ही त्यांच्यासोबत आहोत. निवडणुकीत हायकमांड ठरवतील त्या उमेदवाराच्या मागे आपण राहुयात, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
नाशिक शहरात सकाळपासून सुरू असलेल्या संतधार पावसामुळे नाशिकचे गोदावरी नदी यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच दुथडी भरून वाहताना पाहायला मिळत आहे. गोदावरी नदी पावसाच्या पाण्याने प्रवाहित झाल्याने या पाण्यात होण्याचा आणि आंघोळीचाही आनंद पर्यटक घेताना पाहायला मिळत आहेत. पावसाळ्यात पूर आल्यानंतर रौद्ररूप धारण करणारी गोदावरी नदी आज मात्र काहीही संथ वाहत आहे, नाशिककरांना अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
महाराष्ट्र आणि नाशिकच्या सीमेलगत असलेल्या आणि गुजरात हद्दीत असलेल्या सापुतारा परिसरात मुसळधार पाऊस झालाय. त्यामुळे अंबिका नदीला पूर आलाय. नदीत अडकलेल्या टेम्पोतून गावकऱ्यांनी दोघांनाही बाहेर काढले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आज भेट झालीय. त्यानंतर पुणे पुरात दुर्देवी मृत्यू झालेल्या दोन युवकांच्या कुटुबियांना प्रत्येकी 10 लाखाची मदत देण्याचे मुख्यमंत्री यांनी आदेश दिले आहेत. उद्या सकाळी १० वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे सिंहगड रस्ता भागातील सोसायटीमध्ये पुन्हा जाणार आहेत. आज बैठकीत झालेल्या सर्व बाबीची माहिती नागरिकांना देणार आहेत.
खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्यानंतर एकतानगर परिसरात महापालिकेकडून सतर्कता बाळगली जात आहे. खडकवासला धरणातून आज सकाळी 27000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय. एकतानगर भागात सर्व परिस्थिती स्थिर आहे. मात्र, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनानं केलं आहे.
कोल्हापूरमध्ये काँग्रेसचे टोल आंदोलन स्थगित झालंय. रस्ते सुस्थितीत होईपर्यंत टोलमध्ये 25 टक्के सवलत देण्यात येणार आहे. टोलनाक्याच्या 20 किलोमीटर परिसरातील वाहनांना टोल आकारणी न करण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती सतेज पाटलांनी दिलीय.
मुंबईत विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. सायन गांधी मार्केट परिसरात सखल भागात पाणी साचायला सुरवात झालीय.
नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील दरेवाडी गावात पावसाचे पाणी साचलंय. परिसरात सकाळपासून संततधार पाऊस सुरू आहे. या गावातील अनेक घरात पाणी शिरल्याची माहिती मिळत आहे.
राज ठाकरे उद्या पुन्हा पुण्यात
राज ठाकरे उद्या एक दिवसीय पूणे दौऱ्यावर
एकता नगर भागातील नागरिकांची राज ठाकरे पुन्हा घेणार भेट
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत पुणे शहरातील पुर परिस्थिती बाबत चर्चा केल्यानंतर राज ठाकरे उद्या एकता नगर मधील नागरीकांना भेटणार
याआधी राज ठाकरे यांनी नागरिकांशी संवाद साधला होता
मृत कुटुंबीयांच्या नातेवाईकांना करणारा आर्थिक मदत
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
कुख्यात गँगस्टर अबू सालेमची दिल्ली कोर्टातील पुढील सुनावणी १० सप्टेंबरला होणार आहे. अबू सालेमला आज दिल्लीहून नाशिकला आणण्यात येणार आहे. २ दिवसांपूर्वी दिल्ली कोर्टातील सुनावणीसाठी अबू सालेमला नाशिक जेलमधून प्रचंड सुरक्षा व्यवस्थेत नेण्यात आले होते. मात्र दिल्ली कोर्ट रजेवर असल्यानं सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.
महाराष्ट्रात सध्या जी आग लागलेली आहे ती, उद्धव ठाकरे यांच्या हसण्यामुळे लागली आहे. एवढी संकंट येऊनही उद्धव ठाकरे यांचा चेहरा हसरा आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सध्या जळफळाट सुरु आहे. सुषमाताई तुम्ही विचारले काही जागा मिळाल्या पाहिजेत, काळजी करु नका, यादी तयार आहे. आता स्वतः साठी लढण्याची वेळ आली आहे, असे संजय राऊत म्हणाले.
पाच दिवसाच्या विश्रांतीनंतर मुंबई पश्चिम उपनगरात मुसळधार पावसाला सुरुवात. मागील अर्धा तासापासून उपनगरात बरसतोय मुसळधार पाऊस. सांताक्रुज पार्ले अंधेरी जोगेश्वरी गोरेगाव मालाड कांदिवली बोरिवली दहिसर परिसरात मुसळधार पाऊस. रस्त्यांवरील सखल भागात पाणी साचण्यात सुरुवात. जुलै महिन्यात मुंबईसह राज्यभरात पावसाची धुवाधार बॅटिंग, पाच दिवस विश्रांतीनंतर आता पुन्हा मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाला सुरुवात.
राज्यातील विविध मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवास्थानी तब्बल १ तासांहून अधिक वेळ दोन्ही नेत्यांमध्ये बैठक झाली. आता ही बैठक संपली असून थोड्याच वेळात राज ठाकरे माध्यमांसोबत संवाद साधण्याची शक्यता आहे.
सुप्रीम कोर्टाने दिलेल्या SC/ST बाबत क्रिमिलियरच्या निर्णयाला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी विरोध केला आहे. अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणास आर्थिक निकष क्रिमिलेयर लावण्यास रिपब्लिकन पक्षाचा तीव्र विरोध आहे, असं रामदास आठवले यांनी ट्विट करत म्हटलं आहे.
अनुसूचित जातीमध्ये उपवर्गिकरण करण्यासोबत ओबीसी आणि खुल्या वर्गाचे उपवर्गीकरण करावे. सर्वोच्च न्यायालयाच्या उपवर्गिकरणाच्या निर्णयामुळे अनुसूचित जातीतील सर्व जातींना न्याय मिळेल, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या पाच महिन्यांपासून लोकसभा निवडणूक आचारसंहिता आणि त्यानंतर पालकमंत्री नसल्यामुळे जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली नव्हती. त्या बैठकीला आज मुहूर्त लागला आहे. नव्याने नियुक्त करण्यात आलेले पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा नियोजन समितीची बैठक होत आहे. या बैठकीमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या विविध कामांना मंजुरी मिळणार आहे.
मुंबई अहमदाबाद महामार्गावर सिलिंडर वाहून नेणाऱ्या ट्रकचा अपघात झाला. रस्त्याच्या मध्यभागी ट्रक उलटल्याने महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सध्या पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे.
सचिव वाझे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केल्यानंतर राज्याचं राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. संजय राऊत यांनी वाझेच्या आरोपावर देशमुखांची पाठराखण करताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. यावरून निलेश राणे यांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केलाय.
कोल्हापुरातील किनी टोल नाक्यावर काँग्रेसने जोरदार निदर्शने सुरू केली आहे. टोलनाका बंद करण्यासाठी काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू केलंय.
आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कारवरील हल्याप्रकरणी पोलिसांनी दुसरी अटक केली आहे. श्रवण दुबे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. खंडविरोधी पथकाने त्याला रायगडमधून ताब्यात घेतलंय. आव्हाड यांच्यावर हल्ला करण्यापूर्वी आरोपींना घेऊन त्यांच्या गाडीचा पाठलाग केल्याचा दुबे याच्यावर आरोप आहे. हल्ल्यात वापरण्यात आलेली कार देखील पोलिसांची जप्त केली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. उरण येथे यशश्री शिंदे या तरुणीची झालेली हत्या, हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवावी, या मागणीसाठी राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याची माहिती आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात 6 ऑगस्ट रोजी सुनावणी होण्याची शक्यता कमी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार यांना देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार यांनी सुप्रीम कोर्टात दाखल याचिका केली होती.
मानखुर्दच्या अण्णाभाऊ साठे नगरमध्ये अंत्यविधिदरम्यान गोळीबार
पूर्व वैमनस्यातून झाला गोळीबार
सुदैवाने गोळीबारात कोणीही जखमी नाही
मानखुर्द पोलिसांनी सोहेल अब्दुल सैय्यद, ३१ आणि कार्तिक मुदलियार, ३२ नावाच्या दोघांना अटक केली.
हत्येचा प्रयत्न करणे तसेच हत्यार कायद्यांतर्गत दोघांना अटक
पुण्यातील वारजे परिसरात महानगरपालिकेच्या ठेकेदाराचा भोंगळ कारभार उघड झाला आहे. ठेकेदार पावसात काँक्रेट भरून खड्डा बुजवत आहेत. महानगरपालिकेच्या ठेकेदाराकडून अशा पद्धतीने काम केले जात आहेत. या ठेकेदारावर महानगरपालिका काय कारवाई करणारी पाहणं महत्वाचं आहे.
सचिन वाझेचं तुरुंगातून अनिल देशमुखांवर आरोप
वाझेने तुरुगांतून आरोप केलाय.
देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे, त्यांनी फडणवीसांना पत्र लिहून सर्व माहिती दिली.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
आजपासून राज्यभर भाजपच्या जिल्हास्तरीय अधिवेशनाला सुरूवात
भाजपचे प्रमुख नेते याअधिवेशन साठी हजेरी लावणार आहे
कोंकण विभागत रवींद्र चव्हाण , मराठवाडा विभाग मध्ये रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे विदर्भ सुधीर मुनगंटीवार, संजय कुटे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे वर्धा, भंडाऱ्यात अधिवेशन हजर राहणार
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळें आज वर्धा भंडारा मध्ये उपस्थित राहणार
पुण्यातील खडकवासला धरणातून 21142 क्यूसेक्स पाण्याचं विसर्ग सुरू
धरण क्षेत्रात चांगला पाऊस पडल्याने आणखी विसर्ग वाढण्याची शक्यता
हवामान खात्याने दिला पाच ऑगस्टपर्यंत ऑरेंज अलर्ट
पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी चारही धरण 90 टक्के भरले
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा उद्यापासून मराठवाडा दौरा
दौऱ्याच्या आधी राज ठाकरे आणि मुख्यमंत्री भेट महत्त्वाची ठरणार आहे.
राज ठाकरे आज मुख्यमंत्र्यांना भेटून राज्यातील कायदा सुव्यवस्था, जातीय तेढ तसेच महिला अत्याचार प्रकरणात चर्चा करणार असल्याची माहिती....
फेरीवाला प्रकरणात देखील राज ठाकरे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती...
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.