Today Marathi News: वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेना आमदारांची बैठक

Maharashtra Chya Tajya Marathi Batmya Live (10 june 2024) : नरेंद्र मोदी मंत्रिमंडळ , देशासहित महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, पाऊसाच्या अपडेट, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर वाचा.
राज्यातील प्रत्येक महत्वपूर्ण घडामोडींचे वेगवान अपडेट वाचा
Today's Marathi News Live Saam tv
Published On

Buldhana Rain: बुलडाण्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस

सलग दुसऱ्या दिवशीही बुलाडाण्यात मुसळधार पाऊस

शेगाव , खामगाव , नांदुरा, बुलडाणा तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस.

पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा.

सलग पडत असलेल्या पावसाने शेतकरी सुखावला.

आगामी दोन दिवसात खरिपाच्या पेरणीला होणार सुरुवात.

Assembly Election: वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेना आमदारांची बैठक

वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री आणि शिवसेनेच्या आमदारांची बैठक सुरू आहे. बैठकीत लोकसभा निवडणुकीचा आढावा घेतला जात आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत आमदारांच्या उमेदवारीबाबत चाचपणी करणार आहेत. लोकसभेत उमेदवार निवडीवरून जो उशीर झाला होता आणि त्याचा फटका शिवसेनेला बसला ती चूक पुन्हा होऊ नये यासाठी आजपासूनच उमेदवारी चाचणी खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे.

NCP: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रौप्य महोत्सवाची सुरुवात

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रौप्य महोत्सवाची सुरुवात झाली आहे. जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, अशोक पवार, सुनील भुसारा, शशिकांत शिंदे, रोहित पवार मंचावर उपस्थित आहेत. नवनिर्वाचित खासदार निलेश लंके देखील मंचावर उपस्थित आहेत.

Pune Porsche Car Accident: विशाल आणि शिवानी अग्रवालच्या पोलिस कोठडीत ४ दिवसांची वाढ

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपीचे वडील विशाल अग्रवाल, आई शिवानी अग्रवालच्या पोलिस कोठडीत ४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. विशाल अग्रवाल, शिवानी अग्रवाल आणि अश्पाक मकानदार यांना १४ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Uddhav Thackeray: विधानसभा निवडणुकीसाठी कामाला लागा, उद्धव ठाकरेंच्या बैठकीत सूचना

विधानसभा निवडणुकीसाठी कामाला लागा. अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी बैठकीमध्ये दिल्या आहेत. या बैठकीत त्यांनी सांगितले की, 'जागावाटपाचा विचार तुम्ही करू नका. त्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल. तुम्ही तुमच्या कामाला लागा. २८८ मतदारसंघांमध्ये कामाला लागा. कोणताही मतदारसंघ सोडू नका. शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत काम करा.' दरम्यान, उद्धव ठाकरे यांचे १९ जूननंतर महाराष्ट्रभर दौरे होतील.

Mumbai News: न्हावा शेवा बंदरातून ४.1 कोटी रुपयांचे लॅपटॉप आणि सीपीयू जप्त

न्हावा शेवा बंदरातून ४.११ कोटी रुपयांचे लॅपटॉप आणि सीपीयू जप्त केलेत. गोपनीय माहितीच्या आधारावर कस्टम्स विभागाीने कारवाई केली. ६०० वापरलेले लॅपटॉप आणि १५४६ सीपीयू जप्त करण्यात आले आहेत. दुबईवरूनतस्करी करण्यात आलेले लॅपटॉप आणि सीपीयू जप्त कस्टम विभागाकडून जप्त करण्यात आले आहे. याप्रकरी कंपनीच्या मालकाला अटक करण्यात आली आहे. उपकरणं तस्करी करणाऱ्या कंपनीच्या कार्यालयातून २७.३७ लाख रुपये जप्तकरण्यात आले

Priyanka Gandhi Meet Shaikh Hasina: प्रियंका आणि राहुल गांधींनी घेतली बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांची भेट

पंतप्रधान मोदींच्या शपथ विधी सोहळ्यासाठी बांगला देशाच्या पंतप्रधान शेख हसीना भारत दौऱ्यावर आहेत. आज काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांची भेट घेतली. यावेळी प्रियंका गांधी सोबत राहुल गांधीही उपस्थित होते.

Salman Khan Firing Case : आरोपीच्या मृत्यूप्रकरणी सलमान खानला दिलासा

मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी अभिनेत्याच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेतील आरोपीच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेतील प्रतिवादी म्हणून त्याचे नाव काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात अनुज थापन नावाच्या आरोपीने आत्महत्या केली होती. थापनच्या कुटुंबीयांनी सदर प्रकरणात सीबीआय चौकशीची मांगणी करत मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिका केली होती.

Thackeray Group Meeting: विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भवनात बैठक सुरू 

विधानसभा निवडणूक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भवन येथे बैठक सुरू आहे. २८८ जागावर संघटनात्मक बांधणी करण्याच्या सूचना उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र विधानसभा निवडणूक लढवू याबाबत कोणी ही शंका घेऊ नये. महाविकास आघाडी १८० ते १८५ जागा जिंकणार आहेत. विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने उद्धव ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा होणार होणार असल्याचं संजय राऊत म्हणाले.

बोगस बियाणे विक्रेत्यांवर कडक कारवाई करा: उपमुख्यमंत्री अजित पवार

राज्यात पुणे विभागासह कोकण प्रदेशात चांगला पाऊस झाला आहे, तर अन्य भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात समाधानकारक पाऊस अपेक्षित आहे. पावसाच्या आगमनानंतर शेतकरी खरीप पिकांच्या पेरणीच्या तयारीला लागला आहे. त्यामुळे खते-बियाण्यांच्या अभावी कुठेही पेरण्यांना विलंब होता कामा नये. त्यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक प्रमाणात बियाणे, खतांचा पुरवठा करा. तसेच प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पीक कर्ज मिळण्याची दक्षता घ्या, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व विभागीय आयुक्तांना दिलेत.

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपी विशाल अग्रवालविरोधात आणखी एक गुन्हा दाखल

पुण्यातील पोर्शे कार अपघातातील आरोपी विशाल अगरवाल याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

हिंजवडी पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल

२००७ साली बांधण्यात आलेल्या नॅन्सी ब्रम्हा सोसायटी धारकांची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल

सोसायटी धारकांना पार्किंग, मोकळी जागा देणे बंधनकारक असताना एकाच ठिकाणी अँमीनीटी स्पेस आणि मोकळी जागा दर्शवून सोसायटी धारकांची परवानगी नसताना बिल्डर ने ११ मजली आणि १० मजली इमारत बांधली

विशाल अगरवाल, राम अगरवाल, विनोद अगरवाल, नंदलाल किमतानी आणि आशिष किमतानी यांच्या विरोधात गुन्हा

नाशिकच्या वालदेवी नदीत लाखो मासे मृतावस्थेत आढळले

- नाशिकच्या वालदेवी नदीत लाखो मासे आढळले मृतावस्थेत

- नदीत दोन किलोमीटरच्या परिसरात लाखो मासे मृतावस्थेत आढळले

- ड्रेनेज लाईन फुटल्याने दूषित पाण्यामुळे मासे मृत्यूमुखी पडल्याचा अंदाज

- मृत पावलेले मासे नदीच्या पाण्यावर तरंगत आहेत

- नदीतील पाण्यात विविध प्रकारचे जीवाणू देखील आढळल्याचा प्रकार समोर

- स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त

Kolhapur MP : खासदार शाहू महाराज छत्रपतींनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

कोल्हापूरचे नवनिर्वाचित खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी आज विजयानंतर उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. यावेळी शाहू महाराजांचे छोटे चिरंजीव मालोजीराजे छत्रपती, तसेच काँग्रेस आमदार सतेज पाटील उपस्थित होते.

Solapur News : बार्शीत मराठा समाजाच्या वतीने आरक्षणासाठी रस्तारोको आंदोलन

सोलापुरातील बार्शी तालुक्यात मराठा समाजाच्यावतीने रस्तारोको आंदोलन करण्यात आलं आहे. ओबीसी कोट्यातून कुणबी आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलन केले. बार्शीतील पोस्ट चौकामध्ये हे रास्तारोको आंदोलन करण्यात येत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं आहे.

Assembly By-election in India : देशातील ७ राज्यातील १३ विधानसभेत पोटनिवडणूक होणार

देशातील ७ राज्यातील तेरा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. पोटनिवडणुकसाठी 10 जुलैला मतदान होणार आहे. बिहार, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, मध्य प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि हिमाचल प्रदेशात विधानसभा पोट निवडणूक होणार आहे. तर मतमोजणी 13 जुलैला होणार आहे.

Nashik News : पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडून पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी

नाशिकचे पालमंत्री दादा भुसे यांच्याकडून वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील उमराणे, तिसगाव परिसरात वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यात आली आहे. उमराणे परिसरात वादळी पावसानं कांदा शेड कोसळून मृत्यू झालेल्या देविदास अहिरे यांच्या कुटुंबीयांचं देखील भुसे यांच्याकडून सांत्वन करण्यात आलं. कांदा शेड आणि कोसळलेल्या घरांची देखील दादा भुसे यांच्याकडून पाहणी करण्यात आली. पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीनं पंचनामे करण्याचे भुसे यांनी आदेश दिले आहेत.

Lok Sabha : संसदेचं १८ जूनपासून विशेष अधिवेशन सुरु होण्याची शक्यता

संसदेचे विशेष अधिवेशन येत्या 18 जूनपासून सुरू होण्याची शक्यता आहे. आज होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Narendra Modi : नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाचा पदभार स्वीकारला

नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाचा पदभार स्वीकारला आहे.

Vasai Virar Rain : वसई विरारमधील सखलभागात साचले पाणी, पालिकेच्या दाव्याची पावसाकडून पोलखोल

वसई विरारमधील सखलभागात साचले पाणी, पालिकेच्या दाव्याची पावसाकडून पोलखोल

वसई विरारमध्ये पावसाने विश्रांती घेतली असली तरी विरारच्या मनवेलपाडा भागात रस्त्यावर पाणी साचलंय

पाऊस अर्धा तास तरी जरी लागला नालासोपारा ,वसई, विरार येथील सखल भाग जलमय होतो.

daund News : दौंडमध्ये गार पुलाचे खांब कोसळले, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

पुणे आणि नगर जिल्ह्याला जोडणाऱ्या दौंड-गार गावादरम्यान नव्याने होत असलेल्या भीमा नदीवरील पुलाचे खांब कोसळले

निकृष्ट दर्जाचे काम केल्याने पुलाचे खांब कोसळले, स्थानिकांच्या तक्रारी

आज भीमा नदीला पाणी आल्याने पुलाचे खांब कोसळले,

सुदैवाने याच्यामध्ये कोणती जीवितहानी झाली नाही

Neet Exam : नीटच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांची निदर्शने; परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी

नीट परीक्षेमध्ये झालेल्या गोंधळाच्या निषेधार्थ आज छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांनी एकत्र येत मुक निदर्शने

नीट परीक्षेच्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी हातात वेगवेगळ्या प्रकारचे फलक हातात घेत निषेध व्यक्त

विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची मोठ्या संख्येने निदर्शने

लोकसभा निवडणुकीचा निकाल नरेंद्र मोदींच्या सोयीचा नाही - शरद पवार

शरद पवार यांच्या भाषणातील मुद्दे

देशाच्या निवडणुकीचा निकाल हा नरेंद्र मोदींच्या सोयीचा नाही. त्यांना उतरती कळा लागली आहे. आंध्र प्रदेशमधून मदत झाली नसती तर, त्यांना आजच्या परीस्थितीला तोंड देण्याची त्यांची स्थिती नव्हती. मागील पाच वर्ष दोनच व्यक्तींनी सरकार चालवलं. आम्ही म्हणेल तेच होणार, या दिशेने कारभार केला.

Pune Traffic : पुण्यातील फुरसुंगीमध्ये वाहतूक कोंडी

पुणे : उड्डाण पुलावर ट्रक बंद पडल्याने फुरसुंगीकरांना सकाळपासूनच वाहतूक कोंडी

वाहतूक कोंडीवर मार्ग काढावा, अशी नागरिकांकडून मागणी

उड्डाण पूल वाहतुकीस पडतोय अपुरा

वाहतूक कोंडी होऊन सकाळीच वाहनांच्या दोन्ही बाजूने एक किलोमीटरपर्यंत रांगा

vitthal temple pandharpur : विठ्ठल रुक्मिणी मंदिराला पावसाचा फटका, स्लॅबमधून झिरपू लागले पावसाचे पाणी

पंढरपूर येथील पुरातन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला गळती सुरू झाली आहे. सलग तीन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे विठ्ठल मंदिरात पाणी गळू लागले. विठ्ठल मंदिरातील नैवेद्य दरवाजा, रुक्मिणी सभागृहाच्या स्लॅबमधून पावसाचे पाणी झिरपू लागले. विठ्ठल मंदिरात दीडशे कोटीच्या विकास आराखड्याची कामे सुरू असल्याने या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Manoj Jarange Patil News : खासदार कल्याण काळे जरांगे पाटील यांच्या भेटीला

खासदार कल्याम काळे हे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला पोहोचले आहेत. कल्याण काळे आणि मनोज जरांगे यांच्याशी संवाद आहेत.

Amaravati News : अमरावतीत बालमृत्यू आणि मातामृत्यूचं तांडव

अमरावती जिल्ह्यात बालमृत्यू व मातामृत्यूचं तांडव पाहायला मिळत आहे. वर्षभरात 1019 बालकांसह तर 35 मातांचे मृत्यू झाले आहेत. 481 मृत्यू हे उपजत होते. जिल्ह्यात वर्षभरात 32 हजार 394 बालकांचा शासकीय रुग्णालयात जन्म झाला.

Narendra Modi News : आज मोदींच्या मंत्रिमंडळाची पहिली बैठक

आज संध्याकाळी मोदी मंत्रिमंडळाची पहिली बैठक होणार आहे. मोदी मंत्रिमंडळाची संध्याकाळी ५ वाजता पहिली बैठक होईल. नरेंद्र मोदी यांच्यासह नव्याने शपथ घेतलेले सर्व केंद्रीय मंत्री बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचा आज २५ वा वर्धापन दिन, दोन्ही गटाकडून कार्यक्रमाची मोठी तयारी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज 25 वा वर्धापन दिन आहे. शरद पवार यांच्या गटाचा वर्धापन अहमदनगरला होणार आहे. तर अजित पवार गटाचा वर्धापन दिन मुंबईत होणार आहे.

Kolhapur News : कोल्हापुरात हिंस्त्र प्राण्याचा हल्ला, 7 मेंढ्या ठार

कोल्हापुरात अज्ञात हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात 7 मेंढ्या ठार तर 10 जखमी आहेत. कोल्हापूरातल्या कागल तालुक्यातील बामणी गावातील घटना आहे. या घटनेत मेंढपाळचे अतोनात नुकसान झाले आहे.

karvir assembly constituency : करवीर विधानसभा राहुल पाटील लढवणार

काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील यांच्या निधनानंतर करवीर विधानसभा मतदारसंघातून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील निवडणूक लढणार

करवीरमधून कोण लढणार याची ताणलेली उत्सुकता संपली

पी.एन पाटील समर्थकांनी मेळावा घेऊन हा निर्णय घेतला

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com