Maharashtra Board Supplementary Exam 2023 Dates: दहावी-बारावी पुरवणी परीक्षेच्या तारखा जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक

SSC-HSC Supplementary Exam 2023: यंदा परीक्षेत अपयश आलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही मोठी संधी असणार आहे.
Maharashtra Board Supplementary Exam 2023 Dates:
Maharashtra Board Supplementary Exam 2023 Dates: Saam TV
Published On

Supplementary Exam 2023 Dates: दहावी-बारावीचा निकाल जाहीर झाल्यावर काही विद्यार्थ्यांना यात अपयश आल्याचं दिसलं आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी घेतल्या जाणाऱ्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. सदर परीक्षा जुलै-ऑगस्ट २०२३ मध्ये घेतली जाणार आहे. (Latest Marathi News)

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नागपूर, मुंबई (Mumbai) लातूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, कोकण, अमरावती व नाशिक या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणारी इयत्ता दहावी व इयत्ता बारावीची पुरवणी लेखी परीक्षा जुलै-ऑगस्ट २०२३ मध्ये होणार आहे. यंदा परीक्षेत अपयश आलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही मोठी संधी असणार आहे.

Maharashtra Board Supplementary Exam 2023 Dates:
Jitendra Awhad News | राज ठाकरेंना भावी CM च्या शुभेच्छा वरुन आव्हाडांचा ठाकरेंना टोला !

इयत्ता १२ वीसाठी लेखी परीक्षा मंगळवारी १८ जुलै २०२३ ते मंगळवार ८ ऑगस्ट २०२३ या कालावधीत होणार आहे. तसेच इयत्ता बारावीची उच्च माध्यमिक प्रमाणपत्र लेखी परीक्षा मंगळवार १८ जूलै २०२३ ते शनिवार ५ ऑगस्ट २०२३ या कालावधीत घेतली जाणार आहे. १२ वीच्या कला वाणिज्य आणि विज्ञान अशा तिन्ही शाखांचे सविस्तर वेळापत्रक तुम्हाला बोर्डाच्या संकेतस्थळावर मळेल.

HSC टाइम टेबल २०२३ कसे डाउनलोड करावे?

विद्यार्थ्यांनी प्रथम बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

त्यानंतर नवीनतम सूचना विभागात जावे.

HSC जुलै 2023 टाइम टेबल PDF लिंकवर क्लिक करा.

आता तुमची पुरवणी परीक्षेवर डाउनलोडचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा आणि सेव्ह करा.

टाइम टेबल pdf फाईल स्वरुपात डाउनलोड होईल.

त्याची प्रिंटआउट काढून घ्या.

Maharashtra Board Supplementary Exam 2023 Dates:
Satara News : सातारकरांसाठी गुड न्यूज, आजपासून पाणी कपात रद्द; 'हे' चार दिवस कास, शहापूरच्या पुरवठ्यावर परिणाम

इयत्ता दहावीच्या परीक्षेच्या तारखा देखील आल्या आहे. १० वी लेखी परीक्षा मंगळवारी १८ जुलैपासून सुरु होत आहे. ही परीक्षा १ ऑगस्टपर्यंत सुरु होणार आहे. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भेट देऊन तुम्ही पाहू शकता.

तोंडी परीक्षा केव्हा घेतली जाणार?

लेखी परीक्षेसह (Exam) विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाचे गुण देखील मिळतात. यात प्रात्यक्षिक परीक्षा, तोंडी परीक्षा आणि श्रेणीनुसार गुण दिले जातात. इयत्ता १० वीची प्रात्यक्षिक परीक्षा १८ जुलै २०२३ पासून घेण्यास सुरुवात होत आहे. यात परीक्षा श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा यानुसार विद्यार्थ्यांना गुण दिले जातात. त्यामुळे मंगळवार १८ जुलै २०२३ ते मंगळवार १ ऑगस्ट २०२३ मध्ये तोंडी परीक्षा होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com