Kirit Somaiya: 19 बंगले, 49 स्टुडिओ अन् डझनभर नेते.. 2023 मध्ये कोणाचा होणार करेक्ट कार्यक्रम? किरीट सोमय्यांनी यादीचं जाहीर केली

किरीट सौमय्यांनी वर्षभर महाविकास आघाडीच्या नेत्यांचे घोटाळे उघड करत अनेक नेत्यांची डोकेदुखी वाढवली होती. आता नववर्षातही ते असाच धडाका सुरू ठेवणार आहेत
Kirit Somaiya
Kirit SomaiyaSaam Tv
Published On

Kirit Somaiya: आज वर्षाचा शेवटचा दिवस. नव्या वर्षाचे सर्वांनाच वेध लागले असताना हे वर्ष कोणत्या कारणांनी गाजले, याचीही सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे. यामध्ये भाजपा नेते किरीट सौमय्या यांचे नाव आघाडीवर आहे. कारण किरीट सौमय्यांनी वर्षभर महाविकास आघाडीच्या नेत्यांचे घोटाळे उघड करत अनेक नेत्यांची डोकेदुखी वाढवली होती. आता नववर्षातही ते असाच धडाका सुरू ठेवणार आहेत, असे सुचक ट्विटही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Kirit Somaiya)

Kirit Somaiya
Maharashtra Politics: 'धरणवीर ला धर्मवीर कसे समजणार...' भाजपा आमदाराची अजित पवारांवर जोरदार टीका

याबाबत अधिक माहिती अशी की, किरीट सौमय्या यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केलेल्या आरोपांमुळे सरते वर्ष चांगलेच गाजले. त्यांच्या या आरोपांच्या कचाट्यातून उद्धव ठाकरेही सुटलेही नाहीत. अनेक नेत्यांवर त्यांनी मोठे मोठे घोटाळ्याचे आरोप केले, ज्यामुळे शिवसेनेचे नेते यामधून सुटले नाहीत. त्यांचा हा धडाका नववर्षातही सुरू राहणार आहे, असा इशारा त्यांनी ट्विट करत दिला आहे.

Kirit Somaiya
Mumbai Crime News: नवी मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई, एक कोटी रुपये किंमतीचे ड्रग्स जप्त

किरीट सोमय्यांचे ट्विट सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यांनी उद्यापासून सुरु होणाऱ्या नव्या वर्षात ठाकरे परिवाराचे १९ बंगले, ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचे साई रिसॉर्ट, राष्ट्रवादीचे (NCP) नेते हसन मुश्रीफ, असलम खान यांचे ४९ स्टुडिओ, किशोरी पेडणेकर यांचे एसआरए फ्लॅट्स, मुंबई महापालिकेतील घोटाळा, या सर्वांचा हिशोब पूर्ण करणार,” असा इशाराच त्यांनी यामधून दिला आहे. त्यांच्या या ट्विटमुळे नववर्षात सोमय्या कुणाचा करेक्ट कार्यक्रम करणार, हे पाहणे चांगलेच औत्सुक्याचे ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com