Maharashtra Politics: 'धरणवीर ला धर्मवीर कसे समजणार...' भाजपा आमदाराची अजित पवारांवर जोरदार टीका

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात केलेल्या विधानावरुन राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे.
Ajit Pawar
Ajit PawarSaam TV
Published On

Nitesh Rane: विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात केलेल्या विधानावरुन राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. छत्रपती संभाजीराजेंना धर्मवीर नको, स्वराज्यरक्षक म्हणा असे विधान अधिवेशनादरम्यान केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन सत्ताधारी पक्षातील नेते आक्रमक झाले असून त्यांच्याविरुद्ध आंदोलनही करण्यात आले होते.

याच मुद्द्यावर भाजपा नेते नितेश राणे यांनी ट्विट करत अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

Ajit Pawar
Breaking News : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला धमकीचा फोन? नागपुरात खळबळ

याबाबत अधिक माहिती अशी की, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वक्तव्यावरुन नव्या वादाला सुरूवात झाली आहे. छत्रपती संंभाजी राजेंना धर्मवीर नव्हे स्वराज्यरक्षक म्हणा असे वक्तव्य अजित पवार यांनी नागपुर अधिवेशनात केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर सत्ताधारी पक्षाने जोरदार टीका केली होती. याचसंबंधी भाजपा (BJP) नेते आमदार नितेश राणे यांचे ट्विट जोरदार व्हायरल होत आहे.

या ट्विटमध्ये नितेश राणेंनी "धरणवीर ला धर्मवीर कसे समजणार, आता धर्म रक्षणासाठी तलवार नको शाही पेनही चालेल,"अशा शब्दात अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.

Ajit Pawar
Year Ender 2022: बारा महिने 12 भानगडी; कोणी गाजवले 2022? वाचा वर्षात घडलेल्या भन्नाट घडामोडींचे किस्से

दरम्यान, अजित पवार (Ajit Pawar) यांच्या वक्तव्यानंतर आचार्य तुषार भोसले यांनीही जोरदार टीका केली होती. छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान केल्यामुळे या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार अजित पवार यांना नाही असे वक्तव्य त्यांनी याबद्दल बोलताना केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com