Year Ender 2022: बारा महिने 12 भानगडी; कोणी गाजवले 2022? वाचा वर्षात घडलेल्या भन्नाट घडामोडींचे किस्से

राज्याच्या राजकारणात झालेली उलथापालथ असो किंवा गावागावात गौतमीने घातलेला राडा असो हे वर्ष विविध कारणांनी अविस्मरणीय ठरले...
interesting stories of 2022
interesting stories of 2022Saamtvnews
Published On

Year Ender 2022: वर्षाचा आजचा शेवटचा दिवस. आपण नवी स्वप्ने, नविन ध्येय घेऊन नव्या वर्षात प्रवेश करणार आहोत. पण त्या आधी झुकेगा नही साला म्हणत बॉक्स ऑफिसवर पुष्पाने केलेल्या रेकॉर्ड ब्रेक कमाईने असो किंवा महाराष्ट्रात शिंदे सरकारच्या बंडखोरीने राज्याचं तापलेल राजकारण असो हे वर्ष अनेक अनेक कारणांनी प्रचंड गाजले. पाहूया सरत्या वर्षातील हे गाजलेले किस्से.

interesting stories of 2022
Rahul Gandhi: 'BJP-RSS माझे गुरू; त्यांच्यामुळेच मला...' राहुल गांधींच्या वक्तव्याची रंगली चर्चा

या वर्षाच्या सुरुवातीला अल्लू अर्जुनच्या पुष्पा चित्रपटाने देशभरात धुमाकूळ घातला. वय 8 असो किंवा 80 मै झुकेगा नही साला म्हणत लाखो reels चा महापूर सोशल मीडियावर पाहायला मिळाला. या चित्रपटाचे सर्वत्र कौतुक तर झालेच सोबतच बॉलिवूड- टॉलिवूडच्या वादाला सुरुवात ही झाली. त्यामुळेच खान मंडळींच्या चित्रपटांवर बहिष्कार घालण्याचाही मागणी होऊ लागली.

पुष्पाचा फीवर उतरता उतरता महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला अन त्याचा थेट हादरा मुख्यमंत्र्याच्या खुर्चीला बसला. महाविकास आघाडीसोबत युती करून मुख्यमंत्री झालेले उद्धव ठाकरेंचे तब्बल 40 आमदार एकनाथ शिंदेच्या (Eknath Shinde) नेतृत्वात रातोरात गुवाहाटीला गेले अन ठाकरेंचाच करेक्ट कार्यक्रम करत मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवरून खाली खेचले. राज्यातल्या बलाढ्य पक्षात पडलेली उभी फूट देशात चर्चेचा विषय ठरला. याच बंडामुळे सर्वात मोठ्या प्रादेशिक पक्ष असलेल्या शिवसेनेत दोन गट पडले.

interesting stories of 2022
Breaking News : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला धमकीचा फोन? नागपुरात खळबळ

काय झाडी काय डोंगर काय हॉटेल म्हणत शिंदे फडणवीसांनी एकदम ओके कार्यक्रम केला अन याचकाळात गौतमी पाटीलनं महाराष्ट्रात मार्केट जाम केल. गावागावात खेड्यापाड्यात पोरांच्या स्वप्नात फक्त गौतमीचं यायला लागली. गौतमीच्या कार्यक्रमांना तुफान गर्दी होत असतानाच तिच्यामुळे लावणी बदनाम होत असल्याचाही आरोप होऊ लागला. वाद झाला तर होऊ दे म्हणत गौतमी काही थांबली नाही अन यंदाची मोठी सेलिब्रिटी झाली.

क्रिडा विश्वात मात्र यंदा फक्त फिफा वर्ल्ड कपची चर्चा राहिली. आपला शेवटचा विश्वचषक खेळणाऱ्या मेस्सीने फिफावर नाव कोरत शेवट गोड केला अन या शेवटच्या सामन्यात कडवी झुंज देणारा फ्रांसच्या एंम्बापेची फुटबॉल जगताचा उगवता स्टार म्हणून दमदार एंट्री झाली. वर्षाच्या शेवटी शेवटी नफरत छोडो भारत जोडो म्हणत सुरू झालेली राहुल गांधींची भारत जोडो यात्रा राजकिय मैदानात चर्चेचा विषय ठरली.

7 सप्टेंबर ला कन्याकुमारीपासून सुरु झालेली ही यात्रा जवळपास ३,५७० किलोमीटरचा प्रवास पूर्ण करुन 20 जानेवारीच्या आसपास जम्मू काश्मीर येथे पोहोचेल.

interesting stories of 2022
Rishabh Pant Accident: रिषभ पंतच्या जागी कोण? दिल्लीच्या कर्णधारपदासाठी 'हे' खेळाडू आहेत प्रबळ दावेदार

पण.... वर्षाचा गोड शेवट होईल अस वाटत असतानाच कोरोनाची पुन्हा चाहूल लागली अन सर्वांच्या तोंडचे पाणी पळाले. अद्याप भारतात त्याचा प्रभाव वाढला नाही त्याआधी सरकारने आवश्यक खबरदारी घ्यायला सुरुवात केलीच आहे. सरकारसोबत तुम्हीही तुमची काळजी घ्या, तुम्हालाही सामटिव्हीकडून नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.. (Happy New Year)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com