Maharashtra Politics: वीर सावरकर वाद पुन्हा पेटला.. कॉंग्रेस नेते प्रियांक खर्गेंविरोधात भाजप आक्रमक; राज्यभरात आंदोलने अन् निदर्शने

Priyank Kharge Controversy: राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र आणि कर्नाटक सरकारमधील माहिती आणि प्रसारणमंत्री प्रियांक खर्गे यांनी वीर सावरकर यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
Maharashtra BJP Agitation In Nashik Pune Kolhapur Against Priyank Kharge Controversial Statment on Veer Savarkar
Maharashtra BJP Agitation In Nashik Pune Kolhapur Against Priyank Kharge Controversial Statment on Veer SavarkarSaamtv
Published On

Maharashtra Politics News:

राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र आणि कर्नाटक सरकारमधील माहिती आणि प्रसारणमंत्री प्रियांक खर्गे यांनी वीर सावरकर यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला आहे. प्रियांक खर्गे यांच्या वक्तव्यानंतर भारतीय जनता पक्षाने आक्रमक भूमिका घेतली असून राज्यभरात भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत.

काय म्हणाले होते प्रियांक खर्गे?

"कर्नाटक विधानसभेच्या दालनातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे तैलचित्र काठून टाकण्यात यावे," असे विधान प्रियांक खर्गेंनी (Priyank Kharge) केल्याने नवा वाद उभा राहिला आहे. प्रियांक खर्गे यांच्याविरोधात भाजपचे नेते आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगरसह विविध शहरांमध्ये भाजपकडून निदर्शने तसेच आंदोलने करण्यात येत आहेत.

पुण्यात भाजपचे आंदोलन...

प्रियांक खर्गे यांच्या विधानाचा निषेध करण्यासाठी पुण्यामध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळा सारसबाग या ठिकाणी आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रियांक खर्गे यांच्या पुतळ्याला जोडे मारत भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा बाजी करत निषेध व्यक्त केला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maharashtra BJP Agitation In Nashik Pune Kolhapur Against Priyank Kharge Controversial Statment on Veer Savarkar
Ajit Pawar On Nawab Malik : त्या पत्राबद्दल काय करायचं ते माझं मी करेन; फडणवीसांच्या 'लेटर'वरील प्रश्नावर अजित पवार रोखठोक बोलले

कोल्हापुरातही निदर्शने...

प्रियांक खर्गे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ कोल्हापूरमध्येही भाजप तसेच युवा मोर्चाच्या वतीने निदर्शने करण्यात आली. कोल्हापुरातल्या बिंदू चौकात निदर्शने निदर्शने करत खर्गे यांचा निषेध करण्यात आला. शिवाय काँग्रेस आणि खर्गे यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी केली.

कल्याणमध्येही भाजप कार्यकर्ते रस्त्यावर

कल्याण जिल्हा भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष वैभव गायकवाड यांच्या नेतृत्वात भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात राहुल गांधी ,मंत्री प्रियांक खर्गे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला. यावेळी प्रियांक खरगे यांच्या प्रतीकात्मक फोटोला जोडेमार आंदोलन करण्यात आले. (Latest Marathi News)

Maharashtra BJP Agitation In Nashik Pune Kolhapur Against Priyank Kharge Controversial Statment on Veer Savarkar
Sanjay Raut News: 'नैतिकतेचे बुडबुडे, ढोंग अन् सोंग...' नवाब मलिकांवरुन राजकारण तापलं; संजय राऊत भाजपवर बरसले

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com