Appasaheb Dharmadhikari : आप्पासाहेब धर्माधिकारींच्या नावानं सोशल मीडियावर व्हायरल झालेले ते पत्र बनावट

Dr. Appasaheb Dharmadhikari : महाराष्ट्रभूषण डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावे बनावट पत्र खोडसाळपणे समाज माध्यमांमध्ये शनिवारी पसरविण्यात आले आहे.
Dr. Appasaheb Dharmadhikari
Dr. Appasaheb Dharmadhikari Saam TV

Dr. Appasaheb Dharmadhikari : महाराष्ट्रभूषण डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावे बनावट पत्र खोडसाळपणे समाज माध्यमांमध्ये शनिवारी पसरविण्यात आले आहे. या पत्रातील मजकुर बनावट असून त्याद्वारे महाराष्ट्रातील लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे साम वृत्तवाहिनीने केलेल्या तपासणीत स्पष्ट झाले आहे.

समाज माध्यमांमध्ये (Social Media) पसरवलेल्या बनावट पत्राचा वापर करून राजकारण तापवण्यासाठी खोडसाळपणाचा उद्योग महाराष्ट्रात शनिवारी दिवसभर सुरू झाला. हे पत्र खोटे असल्याचे डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने सांगितले गेले. (Latest Marathi News)

समाज प्रबोधनकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांच्या नावाने बनावट आशय आणि बनावट स्वाक्षरी करून पसरवलेल्या या पत्राबद्दल त्यांनी कायदेशीर कारवाईसाठी तक्रार दाखल केली आहे.

खारघर येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये उष्माघाताने मृत झालेल्या नातेवाईकांना सांत्वनपर पत्र सोमवारी (१७ एप्रिल) सादर केले. या पत्रातील मजकूर बदलून पत्रामध्ये धादांत खोटा आणि खोडसाळपणाचा मजकूर टाकून प्रसिद्ध करण्यात आला आहे, असं प्रतिष्ठाननं म्हटलं आहे. या पत्रासंदर्भात कायदेशीर कारवाई केल्याचेही प्रतिष्ठानने सांगितले.

Dr. Appasaheb Dharmadhikari
Appasaheb Dharmadhikari's Reaction: 'माझ्या कुटुंबावर काळाने घाला घातला, त्याचं राजकारण करु नका', आप्पासाहेब धर्माधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा १६ एप्रिलला झाला होता. धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या कार्यात सहभागी होणाऱ्या हजारो श्रद्धाळू या कार्यक्रमासाठी जमा झाले होते. उपस्थितांची संख्या सात लाखांहून अधिक असल्याचे सांगितले गेले होते. त्या दिवशी उष्माघाताने ११ लोकांचा मृत्यू झाल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.

Dr. Appasaheb Dharmadhikari
Amit Shah News: श्रीसदस्यांच्या जाण्याने माझे मन जड झाले; महाराष्ट्र भूषण सोहळ्यातील दुर्घटनेवर अमित शहांचं ट्विट

डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि धर्माधिकारी प्रतिष्ठान महाराष्ट्रासह देशाच्या आणि जगाच्या विविध भागांमध्ये समाजकार्य करत आहेत. त्यांच्या अनुयायांना श्रीसेवक म्हटले जाते. दर आठवड्याला श्रीसेवक एकत्र जमतात आणि समर्थ रामदासांच्या दासबोधाचे निरूपण सादर केले जाते. श्रीसेवक सामूहिकरित्या अंधश्रद्धा निर्मूलनासह विविध समाजकार्यात भाग घेतात.

या पार्श्वभूमीवर डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि राज्य सरकारची बदनामी करण्याचा कट बनावट पत्राद्वारे रचला गेला. तो आता उघड झाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com