पूर ओसरला, पण शेतकऱ्यांच्या ओल्या स्वप्नांचा चिखल कायम

Maharashtra Torrential Rains Flood: राज्यात अतिवृष्टीने धुमाकूळ घातलाय.. शेती पाण्यात गेली... घरं पडले.. आता पूर ओसरलाय.. मात्र शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चिखल झालाय..
A devastated soybean field in Beed district after torrential rains — farmers voice anguish over lost crops and livelihoods.
A devastated soybean field in Beed district after torrential rains — farmers voice anguish over lost crops and livelihoods.Saam Tv
Published On

हा आक्रोश आहे अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेल्या बीडमधील महिला शेतकऱ्याचा....अतिवृष्टीने सोयाबीन गेलं, मोसंबीचा सडा पडला...सगळी पिकं वाहून गेलेत... पुराचं पाणी हळूहळू ओसरतय... मात्र शेतकऱ्यांनी जपलेल्या स्वप्नांचा चिखल झालाय.... आता मुलांची फी कशी भरावी? या प्रश्न शेतकऱ्याला मनातून पोखरायला लागलाय...

ही विदारक परिस्थिती फक्त बीडच नाही तर मराठवाड्यातील लातूरमध्येही निर्माण झालीय.. आता पाऊस थांबलाय.. मात्र शेतातलं पाणी कायम आहे.. त्यामुळे सोयाबीनला कोंब फुटलेत... आता सरकारच्या तुटपुंज्या मदतीपेक्षा आत्महत्या बरी... असं उद्विग्न मत शेतकऱ्यानं व्यक्त केलंय...

अतिवृष्टी फक्त मराठवाड्यापुरती नाही.. तर खान्देशातील धुळ्यातला शेतकरीही अतिवृष्टीने बेहाल झालाय.. लेकरासारखी जपलेली शेवग्याची बाग उद्ध्वस्त झाल्यानं भीषण अतिवृष्टीचा फटका सहन करण्याचं अवसानच शेतकऱ्यात राहिलं नाही...

राज्यात खरीप हंगामात 147 लाख हेक्टरवर पेरणी झाली.. त्यातील जूनपासून आतापर्यंत तब्बल 93 लाख हेक्टरचं नुकसान झालंय.. अर्ध्या महाराष्ट्रात ओला दुष्काळ पडलाय.. त्यातच सरकारने हेक्टरी 8500 रुपये मदत केलीय.. मात्र खरीप हंगाम हातातून गेलाय. आता अजूनही शेतात पाणीच पाणी असल्यानं आणि जमीन खरवडून गेल्यानं रब्बी हंगामही हाती लागण्याची चिन्हं नाहीत.. त्यामुळं तुटपुंज्या मदतीत मुलांचं शिक्षण करावं पेरणीसाठी जमीन तयार करावी की जगण्यासाठी अन्नधान्यावर खर्च करावा? असा सवाल शेतकऱ्यापुढं आ वासून उभा आहे... त्यामुळे शेतकरी सावकारी कर्जाच्या विळख्यात सापडण्याची शक्यता आहे...मात्र सरकार एनडीआरएफच्या निकषांपेक्षा जास्त मदत करणार असल्याचं आश्वासन सरकारने दिलंय..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारकडे विशेष पॅकेजची मागणी केलीय.. त्यामुळे सरकार मदतीसोबत शेतकऱ्याला कर्जमुक्त करुन दिलासा देणार का? याकडे राज्यातील कोलमडून पडलेल्या बळीराजाचं लक्ष लागलंय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com