Maharashtra News Live : प्रा.लक्ष्मण हाके यांच्या स्वागतासाठी जात असलेल्या रॅलीवर दगडफेक

Today's Breaking Live News and Updates in Marathi: आज दिनांक २७ जून २०२४ वार गुरूवार देश विदेश तसेच महाराष्ट्रातील सर्व वेगवान घडामोडींचे लाईव्ह अपडेट् वाचा फक्त एका क्लिकवर...
Saam TV Live Marathi News 27 June 2024
Today's Marathi News Live By Saam TV [27 June 2024]Saam TV
Published On

Laxman Hake : प्रा.लक्ष्मण हाके यांच्या स्वागतासाठी जात असलेल्या रॅलीवर दगडफेक

प्रा.लक्ष्मण हाके यांच्या स्वागतासाठी जात असलेल्या ओबीसी बांधवांसह रॅलीवर दगडफेक करण्यात आली आहे. बीडच्या शिरूर कासार तालुक्यातील मातोरी गावच्या बसस्टँडवर ही घटना घडली. विशेष म्हणजे हे गाव मनोज जरांगे पाटलांचं असून या ठिकाणी ही घटना घडल्याने तणावाचं वातावरण निर्माण झाले आहे.

Uddhav Thackeray : विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी उद्धव ठाकरे ७-८ जुलैपासून राज्याच्या दौऱ्यावर

उद्धव ठाकरे ७-८ जुलैपासून राज्याच्या विविध भागाचा दौरा करणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने दौ-याचं आयोजन करण्यात आलं आहे. लोकसभा निवडणुकीत विधानसभानिहाय झालेल्या मतदानाचा आढावा घेत कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी तयार राहण्याच्या सूचना दिल्या जाणार आहेत.

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी अमित शाह ॲक्शन मोडवर

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका काही महिन्यावर आल्या आहेत. त्यामुळे अमित शाह ॲक्शन मोडवर असून जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यात राज्यातील प्रमुख नेत्यांसोबत करणार चर्चा करण्याची शक्यता आहे.महाराष्ट्रासोबतच झारखंड आणि हरियाणा राज्यातही अमित शहा यांचा दौरा होणार आहे.

Beed News : बीडमध्ये शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खाडे यांचे कार्यालय फोडलं

बीडमध्ये शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांचे कार्यालय फोडलं आहे. कुंडलिक खांडे यांची कथित ऑडिओ क्लिप बीडमध्ये व्हायरल झाली आहे. पंकजा मुंडेंना धोका देत बजरंग सोनवणे यांना मदत केल्याचं आणि धनंजय मुंडेंवर देखील हल्ला करण्याचं ऑडिओ क्लिपमध्ये संभाषण आहे.

Maharashtra Politics : अजित पवार गट आमच्या सोबत आला अन् आमचं वाटोळं झालं, सुरेश धस यांचं गंभीर वक्तव्य

लोकसभेत अजित पवार गट आमच्या सोबत आला आणि आमचं वाटोळं झालं. युतीत तिसरा गडी आला आणि आमचं मोठं नुकसान झालं. लोकसभेची चूक विधानसभेत होऊ नये यासाठी आम्ही भाजपच्या अंतर्गत बैठकीत मागणी करणार असल्याचं सुरेश धस यांनी म्हटलं आहे.

NEET Exam : संसदीय अधिवेशनात NEET परीक्षेच्या मुद्यावर चर्चा व्हावी, INDIA  आघाडीचे नेते करणार मागणी

संसदेचं अधिवेशन सुरू असून उद्या संसदेत NEET परीक्षेच्या मुद्यावर चर्चा व्हावी, अशी मागणी INDIA आघाडीचे नेते सभागृहात करणार आहेत. जर NEET पेपर लीक प्रकरणी चर्चा झाली नाही तर सभागृहात आंदोलन करण्याची शक्यता आहे.

Maharashtra Politics : अजित पवार गटाच्या ६ आमदारांनी जयंत पाटील यांची घेतली भेट; सूत्रांची माहिती

शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची अजित पवार गटाच्या पाच ते सहा आमदारांनी आज घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या आमदारांनी विधानभवनातल्या एका खोलीत ही भेट घेतली आहे.

Mahadev Jankar : भाजपकडून महादेव जानकर यांना विधानपरिषदेवर पुन्हा संधी मिळणार

भाजपकडून विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी ११ लोकांच्या नावाचा विचार केला जाणार आहे. भाजपच्या कोट्यातून महादेव जानकर यांना पुन्हा एकदा संधी मिळणार आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे

पुण्यातील L3 बार प्रकरणी मोठी अपडेट, ड्रग्स पेडलर पुणे पोलिसांच्या ताब्यात

पुण्यातील L3 बार प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे.

L3 मध्ये ड्रग्स पुरवठा करणारा ड्रग्स पेडलर पुणे पोलिसांच्या हाती लागला आहे.

पुणे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. अभिषेक असे या ड्रग्स पुरवठा करणाऱ्या ड्रग्स पेडलरचे नाव आहे.

Ahmednagar News : आयुक्तांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई, नागरिकांनी वाजवले फटाके

अहमदनगर महानगरपालिकेच्या आयुक्तांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई झाल्याने नागरिकांनी वाजवले महानगरपालिकेसमोर फटाके वाजवले. अधिकाऱ्यांचा निषेध करत नागरिकांनी महानगरपालिकेसमोरच फटाके फोडले.

BJP MP Meeting : भाजपच्या नवनिर्वाचित खासदारांची मुख्यालयात बैठक, वरिष्ठ नेते करणार मार्गदर्शन

भाजपच्या पहिल्यांदाच निवडून आलेल्या खासदारांची आज मुख्यालयात बैठक होत आहे. अठराव्या लोकसभेत पहिल्यांदाच खासदार म्हणून निवडून आलेल्यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. भाजपचे वरिष्ठ नेते नवनिर्वाचित खासदारांना मार्गदर्शन करणार आहेत.

Pune Accident Case : पुणे अपघात प्रकरण : सुरेंद्र कुमार आणि विशाल अग्रवालच्या जामीनाच्या अर्जाचा निकाल कोर्टाने राखून ठेवला

पुणे कल्याणीनगर अपघात ड्रायव्हर अपहरण प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे.

सुरेंद्र कुमार अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांच्या जामीन अर्जावर १ तारखेला निकाल लागणार आहे.

कोर्टाने त्यांच्या जामिनाचा अर्जाचा निकाल राखून ठेवला आहे. कोर्ट १ तारखेला कोर्ट निकाल देणार आहे.

india alliance  : इंडिया आघाडीची ५ वाजता बैठक होणार, काय रणनीती ठरणार?

इंडिया आघाडीची आज सायंकाळी ५ वाजता बैठक होणार आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी बैठक होणार आहे. बैठकीला इंडिया आघाडीच्या घटक पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या अभिभाषणावरील चर्चेची रणनीती बैठकीत ठरवली जाणार आहे.

Pune accident Case : पुणे ससून ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरण; डॉ. अजय तावरे याच्या जामीनावर आज सुनावणी

पुणे ससून ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरण डॉ अजय तावरे याच्या जामीन अर्जावर आज पुणे सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. अजय तावरे हा ससून ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणी मास्टरमाईंड आहे. कोर्टाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

Rahul Gandhi News : राहुल गांधी घेणार ओम बिर्ला यांची भेट

विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे ओम बिर्ला यांची भेट घेणार आहेत.

राहुल गांधी थोड्याच वेळात भेटीसाठी पोहोचत आहेत.

काल ओम बिर्ला यांनी आणीबाणीबद्दल मांडलेल्या प्रस्तावावर ही भेट असल्याची माहिती आहे.

Dhangar Aarakshan : धनगर समाज आरक्षणाबाबतची बैठक संपली, काय झालं?

धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत बोलावलेली बैठक संपली. या बैठकीत नेमकं काय चर्चा झाली, याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली. आज बैठक झाली. त्यात सकारात्मक चर्चा झाली. थोडा उशीर झालाय. अजून एक-दोन राज्यांचा दौरा करावा. समितीचा अहवाल ३० जुलैपर्यंत द्यावा आणि नंतर राज्य सरकार कार्यवाही करेल, असं महाजन यांनी सांगितलं.

NEET Exam Scam : महाराष्ट्रातील NEET पेपरफुटीचा तपास सीबीआयकडे

NEET परीक्षा पेपरफुटीमुळं देश हादरून गेला आहे.

या प्रकरणात महाराष्ट्रातील कनेक्शनही समोर आलं होतं.

आता राज्यातील नीट पेपरफुटीचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आलाय.

गृह विभागातील वरिष्ठ सूत्रांनी ही माहिती दिलीय.

Pune News: पुणे ड्रग्स प्रकरण: एल-थ्री बारमधील पार्टीत ड्रग्स पेडलरचा सहभाग

पुण्यातील L3 बार पार्टी प्रकरणी अपडेट समोर आले असून L3 मध्ये झालेल्या पार्टीमध्ये ड्रग्स पेडलरचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. ड्रग्स पेडलर ने पुरवले ठोंबरे आणि मिश्रा यांना पार्टीमध्ये अमली पदार्थ पुरवल्याचे समोर आले असून पार्टीमध्ये अमली पदार्थ पुरवणाऱ्या "त्या" ड्रग्स पेडलर चा शोध सुरू आहे.

Ulhasnagar News: उल्हासनगरमधील अनधिकृत डान्सबारवर महापालिकेचा हातोडा!

उल्हासनगरमधील अनधिकृत डान्सबारवर महापालिकेने निष्कासनाची कारवाई सुरू केली आहे. श्रीराम चौकातील ऍपल आणि एंजल या दोन डान्सबारवर महापालिकेकडून ही धडक कारवाई सुरू करण्यात आली असून शहरातील इतरही बारवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती उल्हासनगर महापालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Ashadhi Wari: संत चैतन्य महाराजांच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान

जगद्गुरू तुकोबाराय पालखी सोहळ्याचे प्रस्थान काहीच तासांनी होणार आहे या आषाढी वारी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी जगदगुरु तुकोबारायांचे गुरू संत चैतन्य महाराज यांच्या दिंडी सोहळ्याचे आज ओतूर येथून प्रस्थान झालेय मागच्या 64 वर्षांची परंपरा असणाऱ्या या दिंडी सोहळ्याला आज ओतूर येथून सूरवात झाली असून आगामी चाळीस दिवसांचा पायी प्रवास करून हा दिंडी सोहळा पंढरपूर येथे पोहोचणार आहे.

Mumbai News: मोठी बातमी! कुलाबा ते नरीमन पॉईंट सागरी सेतूचा मार्ग मोकळा

कुलाबा ते नरीमन पॉईंट सागरी सेतूचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्षांच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. कुलाब्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी या मार्गाची मदत होणार असून कोस्टल रोडचा पुरेपूर वापर होणार आहे. तसेच कोळी बांधवांना त्रास होऊ नये म्हणून नवीन मार्ग तयार करण्यात येणार आहे.

Ratnagiri Land Slide: रत्नागिरीच्या तुळशी घाटात दरड कोसळली

रत्नागिरीमध्ये पुन्हा एकदा दरड कोसळल्याची घटना समोर आली आहे. रत्नागिरी - मंडणगडमध्ये तुळशी घाटात दरड कोसळल्याची दुर्घटना घडली. आतापर्यंत या ठिकाणी तीनवेळा दरड कोसळली असून ग्रामस्थांकडून सुरक्षेची मागणी केली जात आहे.

Maharashtra News: संत रुपलाल महाराज यांचे राष्ट्रीय स्मारक तयार होणार, उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासन

संत रुपलाल महाराज यांचे राष्ट्रीय स्मारक तयार होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले आहे. स्मारकाला जागा व आर्थिक नियोजन करण्याचे आश्वासन दिले असून उद्या याबाबत घोषणा होणार आहे.

Maratha Reservation: मराठा आरक्षणावरील याचिकांवर मुंबई उच्चन्यायालयात सुनावणी

मराठा आरक्षणाविरोधातील सर्व याचिकांवर आज मुंबई उच्च न्यायालयाच्या पूर्णपीठापुढे सुनावणी होणार आहे. आरक्षणाच्या विरोधात आणि समर्थनात विविध याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारनं मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात दिलेलं आरक्षण वैध की अवैध यावर होणार सुनावणी. या निकालावर राज्य सरकार विद्यार्थ्यांना देत असलेले प्रवेश आणि नोकरभरती अवलंबून असेल असं हायकोर्टानं आधीच स्पष्ट केलंय. दुपारी 2:30 वाजता सुनावणी होणार आहे....

Congress News: काँग्रेसच्या आसावरी देवतळे व विजय देवतळे यांचे पक्षातून निलंबन

चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे नेते आसावरी देवतळे व विजय देवतळे यांना काँग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबीत करण्यात आले आहे.लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्याने ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

Maharashtra Politics: शिंदे गटाचे डॉ. विश्वास वळवी करणार ठाकरे गटात प्रवेश

पालघरचे शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी डॉ विश्वास वळवी यांचा शिवसेना ठाकरे गटात दुपारी बारा वाजता पक्षप्रवेश होणार आहे. शिवालय या पक्ष कार्यालयात हा पक्षप्रवेश होईल. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत विश्वास वळवी हे ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील. विश्वास वळवी यांनी पालघर लोकसभेची उमेदवारी महायुतीकडून मागितली होती मात्र त्यांना तिकीट नाकारण्यात आलं... त्यामुळे मागील काही दिवसांपासून वळवी नाराज असल्याची चर्चा होती.

Pune News: रात्रीच्या अंधारात अज्ञात ड्रोनच्या घिरट्या; भोर परिसरात खळबळ

पुण्यातील भोर शहरासह ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी अज्ञात ड्रोनच्या घिरट्या घातल्याचे पाहायला मिळाल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या आठवडाभरापासून वेगवेगळ्या भागात रात्री 11 ते 2 वाजेच्या दरम्यान ड्रोन घिरट्या घालत आहेत. रात्रीच्या अंधारात उडवण्यात येणाऱ्या ड्रोनमुळं  नागरिक धास्तावले, नागरिकांमध्ये ड्रोनच्या घिरट्यांनी भीतीचं वातावरण पसरले आहे.

Navneet Rana: खासदार असदुद्दीन ओवेसी यांची खासदारकी रद्द करा, नवनीत राणा यांचे राष्ट्रपतींना पत्र

अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहित  खासदार असदुद्दीन ओवेसी यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी केलीय. भारतीय संविधानाच्या कलम 102/103 अन्वये खासदारकी रद्द करण्याची मागणी केलीय.

State Cabinet Expansion:  उद्या राज्य मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती

उद्या मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पानंतर विस्तार केला जाऊ शकतो संदीपान भुमरे यांचं खातं सजंय राठोड यांच्याकडे जाईल, असं म्हटलं जात आहे.

Nashik Onion Market: NCCF ने कांदा खरेदी थांबवल्याने कांदा दरात घसरण

NCCF नं कांदा खरेदी, कांदा खरेदी पोर्टल बंद केले आहे.

कांदा खरेदीचं उद्दिष्टं पूर्ण झाल्यानं NCCF ने पोर्टल बंद केल्याची माहिती

-NCCF ने कांदा खरेदी थांबवल्याने कांदा दरात घसरण

- उमराणे बाजारसमितीत कांद्याचे भाव २०० रुपयांनी घसरलेत.

कांदा आवक ही निम्म्याने घटली आहे.

कांद्याच्या बफर स्टॉकसाठी केंद्रानं नाफेड आणि NCCF ला प्रत्येकी अडीच लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचे उद्दिष्टं दिले होते.

दुधाला किमान ३५ रुपये भाव द्या या मागणीसाठी २८ जून पासून राज्यभर आंदोलन : संघर्ष समिती

दूध दरासाठी पुन्हा एकदा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. दुधाला किमान ३५ रुपये भाव मिळावा या मागणीसाठी राज्यभर दूध उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरणार आहेत. दूध उत्पादकांच्या विविध मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी २८ जूनपासून राज्यभर आंदोलन छेडण्यात येणार आहे.

Loksabha Monsoon Session:  आणीबाणी हा संविधानावरील सर्वात मोठा हल्ला: राष्ट्रपतींचे अभिभाषण

राष्ट्रपतींनीही आपल्या भाषणात आणीबाणीचा उल्लेख केला. १९७५ मध्ये संपूर्ण देशात हाहाकार माजला होता. आणीबाणी हा संविधानावरील सर्वात मोठा हल्ला होता, असं राष्ट्रपती मुर्मू  म्हणाल्या.

Nashik News: नाशिकमध्ये अंगावर झाड कोसळून दुचाकीस्वाराचा मृत्यू 

नाशिकमध्ये अपघातामध्ये एकाचा मृत्यू झालाय. गुलमोहराचे झाड कोसळल्यानं दुचाकीस्वाराचा मृत्यू झालाय. नाशिकच्या सातपूर परिसरातील शिवाजीनगरमध्या रात्री ही घटना घडली. तुषार पवार असं मृत दुचाकीस्वाराचं नाव आहे.

 Delhi News: राष्ट्रपतींच्या अभिभाषणात पेपर फुटीचा उल्लेख

राष्ट्रपतींच्या अभिभाषणात पेपर फुटीचा उल्लेख. पेपर फुटीच्या प्रकरणांची स्वतंत्र चौकशी होणार आहे. पेपर फुटीच्या प्रकरणांवर ठोस उपायांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. पेपर फुटीच्या विरोधात सरकारने कायदा बनवला आहे.

Delhi News: देशाचा आणि राज्याचा जीडीपी सारखाच राहण्याची शक्यता

देशाचा आणि राज्याचा जीडीपीसारखाच राहण्याची शक्यता आहे. ७.६ टक्के दराने अर्थव्यवस्था राहण्याची शक्यता आहे. कृषी क्षेत्रात १.९ टक्क्यांनी वाढ अपेक्षित, राज्यातील पिकांच्या उत्पादनात १.५ टक्क्यांची घट अपेक्षित, उद्योग क्षेत्र ७.६ तर सेवा क्षेत्रात ८.८ टक्क्यांची वाढ अपेक्षित, राज्याच्या उत्पन्नात १०.९ टक्के वाढ अपेक्षित आहे. दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र राज्य ६ व्या क्रमांकावर आहे. दरडोई पहिल्या क्रमांकावर तेलंगणा राज्य आहे.

Pune News: पुणे महानगरपालिकेची अनधिकृत हॉटेल- पबवर कारवाईला सुरुवात

पुणे महानगरपालिकेच्या वतीने अनाधिकृत हॉटेलवर कारवाईला सुरुवात झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून पुण्यातील अनाधिकृत हॉटेलवर कारवाई करण्यात येत आहे. पुण्यातील कर्वेनगर परिसरातील डीपी रोडवरील हॉटेल आणि अनाधिकृत बांधकामांवर कारवाई केली जात आहे.

Thane News: ठाण्यात अनधिकृत बार- पबविरोधात पालिकेकडून धडक कारवाई

ठाण्यातील अनधिकृत बार अणि पबाच्या विरोधात पालिकेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार कारवाईला सुरुवात केली आहे. घोडबंदर रोडवरील ओवाळ या ठीकाणी ठाणे महानगर पालिकेकडून धडक कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे.

Maharashtra Assembly Monsoon Session: विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब 

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनला आजपासून सुरूवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभा कामकाज अवघ्या काही तासांत स्थगित करण्यात आले. उद्या ११ वाजता सभागृह सुरु होणार आहे.

Maharashtra Politics:  धनगर समाजाच्या मागण्यांसाठी विधीमंडळात आज बैठक

धनगर समाजाच्या मागण्यांसाठी विधीमंडळात आज बैठक होणार आहे. चौंडी येथील उपोषणकर्त्यांसोबत सरकार चर्चा करणार आहे. ओबीसी मंत्री अतुल सावे यांनी तातडीची बैठक बोलावली. आज दुपारी २ वाजता अतुल सावेंच्या दालनात बैठक होणार आहे. ओबीसी मंत्र्यांसह ग्रामविकास मंत्री व सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री बैठकिला उपस्थित राहणार आहे. धनगर आरक्षणासाठी लढणाऱ्या यशवंत सेनेच्या प्रतिनिधींना चर्चेचे निमंत्रण दिले आहे.

Solapur News: सोलापूरमध्ये पत्नीचा जबरदस्ती गर्भपात, डॉक्टर पतीविरोधात गुन्हा दाखल 

सोलापुरात पेशाने डॉक्टर असणाऱ्या पतीकडून पत्नीचा जबरदस्तीने गर्भपात करण्यात आला आहे. याप्रकरणी डॉक्टर पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जेलरोड पोलिस ठाण्यात डॉक्टर श्रीनिवास पिंडीपोल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Assembly Session: शेतकरी प्रश्नावरून विरोधक आक्रमक, विधानभवन परिसरात आंदोलन

विधीमंडळाच्याा पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात होत आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाले आहेत. शेतकरी प्रश्नावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. विधानसभा परिसरामध्ये विरोधक आंदोलन करत असून जोरदार घोषणाबाजी करत आहेत.

Sambhajinagar News: मराठा आरक्षणासाठी आणखी एकाची आत्महत्या, छत्रपती संभाजीनगरमधील घटना

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी आणखी एकाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. बाबासाहेब जनार्धन पडूळ (वय 41 वर्षे) असं या व्यक्तीचे नाव आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील लाडसावंगी येथील ही घटना आहे. त्यांच्या मुलाला बारावीच्या परीक्षेत 90 टक्के मार्क मिळाले. मात्र इंजिनिअरिंगला नंबर लागत नसल्याची खंत त्यांच्या मनामध्ये होती. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली.

Pune News: पुण्यात आज शिवसेना ठाकरे गटाचे धरणे आंदोलन

पुणे शहराची ड्रग्जच्या विळख्यातून सुटका व्हावी, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी राजीनामा द्यावा, अधीक्षक रजपूत यांनी राजीनामा द्यावा, झोपलेल्या सरकारने जागं व्हावं, पुणे शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी, अशा विविध मागण्यांसाठी शिवसेना पुणे शहराच्या वतीने शिवसेना उपनेते सुषमाताई अंधारे यांच्या उपस्थितीत धरणे आंदोलन केले जाणार आहे.

OBC Reservation: ओबीसी- मराठा आरक्षणाबाबत २९ जूनला सर्वपक्षीय बैठक

ओबीसी आरक्षण प्रश्नी 29 तारखेला सर्वपक्षीय बैठक होणार आहे. बैठकीत ओबीसीमधून मराठा आरक्षण द्यायचं की नाही याबाबत चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको याबाबतचं लेखी देण्याची मागणी ओबीसी समाजाने केली आहे. सरकार मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या अनुषंगाने काय निर्णय घेणार याबाबत बैठकीत चर्चा होणार आहे.

Pune News: पुण्यात ठाकरे गटाचे आंदोलन!

पुणे शहराची ड्रग्जच्या विळख्यातून सुटका व्हावी.उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी राजीनामा द्यावा.अधीक्षक रजपूत यांनी राजीनामा द्यावा.झोपलेल्या सरकारने जागं व्हावं,पुणे शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी. अशा विविध मागण्यांसाठी शिवसेना पुणे शहराच्या वतीने शिवसेना उपनेते सुषमाताई अंधारे यांच्या उपस्थितीत केले जाणार धरणे आंदोलन.

ब्रेकिंग! CM शिंदेंकडील खात्यांची जबाबदारी इतर मंत्र्यांकडे

राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात होत आहे. अधिवेशन काळात मुख्यमंत्री शिंदेंकडे असलेल्या खात्यांची जबाबदारी इतर मंत्र्यांकडे देण्यात आली आहे.

हे मंत्री पाहतील कारभार!

१. सामान्य प्रशासन - शंभुराज देसाई २. नगर विकास खाते - उदय सामंत 3. परिवहन, रोजगार हमी योजना, फलोत्पादन - दादा भुसे ४.सामाजिक न्याय, दिव्यांग कल्याण - गुलाबराव पाटील ५.माहिती व जनसंपर्क - संजय राठोड 6.पर्यावरण व वातावरणीय बदल - दिपक केसरकर ७.खनिकर्म - अब्दुल सत्तार ८.माहिती तंत्रज्ञान - तानाजी सावंत

Maratha Reservation News: मराठा आरक्षणासाठी आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मुलाला इंग्रजी मध्ये 90% पडल्याने सुद्धा प्रवेश मिळत नसल्यामुळे एका वडिलांनी आत्महत्या केली. मराठा आरक्षण नसल्यामुळे ही आत्महत्या केली असल्याचे सांगितले जात आहे. असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

Ratnagiri Rain: रत्नागिरीमध्ये मुसळधार पाऊस,  ऑरेंज अलर्ट जारी

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. पुढील पाच दिवस कोकण किनारपट्टी भागात पावसाचा जोर राहणार आहे. हवामान खात्याने कोकणाला आँरेज अलर्ट जारी केला आहे. जूनपासून आजपर्यत चिपळूण तालुक्यात सर्वांधिक पाऊस झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसानं जूनपासून आजपर्यत ६०० मिलिमिटरची सरासरी ओलांडली. खेड तालुक्यातील जगबुडी नदी इशारा पातळीवर आहे.

Weather Update: उत्तर भारतातल्या अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

येत्या दोन दिवसांत राजधानी दिल्लीत मान्सून पाऊस पडणार आहे. त्यामुळे उकाड्यापासून दिल्लीकरांची सुटका होणार आहे. भारतीय हवामान खात्याने उत्तर भारतातल्या अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकसह आसाम, अरुणाचल प्रदेश आणि ईशान्य भारतात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Assembly Monsoon Session: विधानपरिषदेमधील ५ आमदारांचा आज निरोप समारंभ, शिवसेनेच्या २ आणि भाजपच्या ३ आमदारांचा समावेश

२१ जूनला विधानपरिषदेच्या ५ आमदारांच्या जागा रिक्त झाल्या आहेत. आज या विधानपरिषदेमधील ५ आमदारांचा निरोप समारंभ आहे. यात शिवसेनेच्या २ आणि भाजपच्या ३ आमदारांचा समावेश आहे. २७ जुलैला विधानपरिषदेमधील अजून ११ आमदारांचा कार्यकाळ संपुष्ठात येणार आहे. नरेंद्र दराडे - शिवसेना, रामदास आंबटकर- भाजप, बिपल्व बजोरिया- शिवसेना, प्रविण पोटे पाटील- भाजप आणि सुरेश धस- भाजप या आमदारांचा कार्यकाळ संपला आहे.

Maharashtra News: विधानपरिषद निवडणुकीनंतर राज्यपाल नियुक्त आमदारांच्या निवडीबाबत सरकारकडून हालचाली

विधानपरिषद निवडणूकीनंतर आता राज्यपाल नियुक्त आमदारांच्या निवडीबाबत सरकारच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. महायुतीत राज्यपाल नियुक्त आमदारांच्या निवडीबाबत चर्चा सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे. 4 जुलैला राज्यपाल नियुक्त आमदारांबाबत हायकोर्टात सुनावणी होणार आहे. 12 आमदारांमध्ये भाजप स्वतःसाठी जास्त वाटा घेण्याच्या तयारीत आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात घटक पक्षांच्या वाट्याला प्रत्येकी 4 जागा आल्या होत्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com