Budget Session: 'खोक्यांची पीडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे...' विधानभवनात विरोधकांची घोषणाबाजी; शेतकरी प्रश्नांवरुन आक्रमक पवित्रा

Maharashtra Politics: अधिवेशनाच्या आजच्या कामकाजात विरोधकांनी शेतकरी प्रश्नांवरुन आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले.
Maharashtra Assembly
Maharashtra AssemblySaamtv

Maharashtra Assembly Session: राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आजच्या दिवशी विरोधक शेतकऱ्यांच्या (Farmers) प्रश्नांवरुन आक्रमक झाल्याचे पाहयला मिळालं. कांदा, द्राक्षाचे टोपले घेऊन महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर ठिय्या आंदोलन करत जोरदार निदर्शनं केली. मंत्री शंभूराज देसाई ( Shambhuraj Desai) येताच विरोधकांनी 'खोक्यांची पीडा टळू दे बळीच राज्य येऊ दे', 'ईडी पीडा टळू दे बळीचे राज्य येऊ दे' अशी घोषणाबाजी केली.

Maharashtra Assembly
BJP News: माजी नगरसेवकाच्या खून प्रकरणी चाैघे अटकेत, भाजपचा माजी नगरसेवकच मुख्य सूत्रधार; एसपी बसवराज तेलींची माहिती

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजपासून शेवटचा आठवडा सुरु झाला आहे. आजच्या कामकाजात विरोधकांनी शेतकरी प्रश्नांवरुन आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असताना पंचनामे करायला कर्मचारी नसल्याने अजित पवार (Ajit Pawar) यांनी संताप व्यक्त केला.

ईडीची पिडा टळू दे बळीचे राज्य येऊ दे...

आंबा, काजूला भाव द्या, कांद्याला भाव द्या, कापसाला भाव मिळालाच पाहिजे. गारपीठग्रस्तांना नुकसान भरपाई द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा. ईडा पिडा टळू दे बळीचं राज्य येऊ दे, ईडीची पिडा टळू दे बळीचे राज्य येऊ दे, अशा गगनभेदी घोषणा दिल्या. महाविकास आघाडीच्या आमदारांनी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायर्‍यांवर उतरत जोरदार घोषणाबाजी केली.

Maharashtra Assembly
Bookie Anil Jaisinghani Arrested: मोठी बातमी! बुकी अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक; गुन्हे शाखेची मोठी कारवाई

विरोधकांनी केला सभात्याग...

दरम्यान, काही तालुक्यात शाळा पालक आणि लोकं चालवत आहेत. अतिशय गंभीर परिस्थिती राज्यात शेतकऱ्यांची निर्माण झाली आहे आणि सरकार दुर्लक्ष करतेय त्यामुळे सभात्याग करत असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट करत महाविकास आघाडीच्या आमदारांनी सभात्याग केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com