Sambhajinagar News : चमत्कारयुक्त दावे करून समूहाला अंधश्रध्देच्या गर्तेत ढकलण्याचा आरोप करीत अध्यात्मिक गुरु धिरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा (bageshwar baba) विरुध्द जादूटोणा विरोधी कायदा व तत्सम इतर कायद्यान्वये कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र अंनिसच्या (Maharashtra Andhashraddha Nirmoolan Samiti) छत्रपती संभाजीनगर शाखेच्या वतीने सहाय्यक पोलीस आयुक्त (विशेष शाखा) यांच्याकडे करण्यात आली आहे. त्याबाबतचे निवदेन समितीने नुकतेच पाेलीस प्रशासनास दिले. (Maharashtra News)
पाेलीस प्रशासनास दिलेल्या निवेदनात धिरेंद्र कृष्ण शास्त्री, (बागेश्वर धाम, मध्य प्रदेश) हे अध्यात्माच्या नावाने करीत असलेले चमत्कारांचे दावे, फलज्योतिषाचा प्रचार, प्रसार, स्वत:कडे कोणतीही वैद्यक शास्त्राची पदवी नसताना लोकांच्या मानसिक आणि शारीरिक व्याधींवर उपाय सांगणे, छ्द्मविज्ञानाचा वापर हे सर्व भंपक प्रकार भारतीय संविधानात प्रत्येक भारतीय नागरिकांचे मुलभूत कर्तव्य म्हणून सांगितलेल्या वैज्ञानिक दृष्टीकोन या मूल्याशी पूर्णपणे विसंगत आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
शिवाय आतापर्यंत त्यांनी अध्यात्माच्या नावाने मोठमोठ्या जनसमुहासमोर जेही कार्यक्रम देशात ठिकठिकाणी केलेले आहेत ते प्रसारमाध्यमांत यु ट्यूबवर उपलब्ध आहेत. त्यांचही सखोल तपासणी करावी अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.