Ambulance Drivers Strike: राज्यातील १०८ रुग्णवाहिका चालकांचा १ सप्टेंबरपासून संप; वेतन वाढीची मागणी, रुग्णांचे हाल

Maharashtra Ambulance Drivers Strike: रुग्णवाहिका चालवणाऱ्या वाहन चालकांमुळेच रुग्ण वेळेवर रुग्णालात पोहचतो.
Ambulance Drivers Strike
Ambulance Drivers StrikeSaam TV
Published On

Maharashtra Ambulance Drivers Strike:

रुग्णांना तातडीने रुग्णालयात पोहचवण्यासाठी रुग्णवाहिका फार महत्वाच्या असतात. रुग्णावर तातडीने उपचार व्हावेत यासाठी रुग्णवाहिका वेळेवर पोहचावी लागते. या रुग्णवाहिका चालवणाऱ्या वाहन चालकांमुळेच रुग्ण वेळेवर रुग्णालात पोहचवला जातो. मात्र आता रुग्णवाहिका चालकांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. (Latest Marathi News)

प्राप्त माहितीनुसार, १०८ रुग्णवाहिका चालक आज जिल्हा रुग्णालयात एकवटले आहेत. मानधन वाढीसाठी १ सप्टेंबरपासून राज्यातील रुग्णवाहिका चालक कामबंद आंदोलन करणार आहेत. बीव्हिजी कंपनीकडून या चालकांची नेमणूक करण्यात आली आहे.

Ambulance Drivers Strike
Mumbai Crime News: महिला कारमध्ये बसलेली, तो दबक्या पावलांनी आला अन्... धक्कादायक घटनेचा VIDEO

वेतन वाढीची समस्या अनेकदा सांगून देखील सुटत नसल्याने अखेर रुग्णवाहिका चालकांनी १ सप्टेंबर पासून काम बंद करण्याचा इशारा आज दिलाय. वेतन वाढीचा तोडगा काढण्यासाठी आज अमरावतीत जिल्ह्यातील रुग्णवाहिका चालकांनी निवेदन सादर केले. मागणी मान्य न झाल्यास काम बंद करून उपोषण करणार असल्याचा इशारा यावेळी रुग्णवाहिका चालकांनी दिलाय.

रुग्णवाहिका चालक संपावर गेल्यास रुग्णांची मोठी गैरसोय होऊ शकते. वेळेत रुग्णाला एका ठिकाणाहून दुसरीकडे न नेल्यास रुग्णाचा जीव जाण्याची भीती देखील व्यक्त होत आहे. त्यामुळे रुग्णवाहिका चालकांची मागणी पूर्ण होणार का? त्यांना पगारवाढ मिळणार का? शासन यावर कोणता सुवर्ण मध्य काढणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Ambulance Drivers Strike
Pune Crime: पुणे पोलिसांची मोठी कारवाई! शोरूमध्ये दरोडा टाकणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला अटक; तब्बल २१ गुन्हे उघडकीस

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com