(मनोज जयस्वाल, वाशिम)
Chief Minister Eknath Shinde Over Morning Oath :
अजित पवार यांच्या मागे कोण होतं शपथ घेण्यासाठी, कोणी पाठवलं होतं हे अजित पवार यांनीच खुलासा केला आहे. हे आता जग जाहीर झालं आहे, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पवारविरुद्ध पवार वादात उडी घेतलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वाशिमध्ये पत्रकारांशी संवाद साधत होते. त्यावेळी शिंदे यांनी अजित पवार यांना पाठिंबा देत शरद पवार यांच्यावर टीका केली. दरम्यान लोकसभा २०२४ च्या निवडणुकीच्या प्रचारात २०१९ मध्ये पहाटे झालेल्या शपथविधीवरुन रणकंदन माजले आहे.
पहाटेच्या शपथविधी हा शरद पवार यांच्या सांगण्यावरुन झाल्याचं अजित पवार म्हणाले होते. त्यानंतर शरद पवार यांनी अहमदनगरमधील पत्रकार परिषदेत अजित पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. या वादात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उडी घेतलीय. अजित पवार यांच्यामागे कोण होतं? शपथ घेण्यासाठी त्यांना कोणी पाठवलं होतं?, याचा खुलासा खुद्द अजित पवार यांनी केलाय. त्यांनीच वस्तुस्थिती लोकांसमोर त्यांनी आणली आहे.
त्याचमुळे अजित पवार आमच्यासोबत आहेत. आधी शिवसेना-भाजप युती होती आता अजित पवार सामील झालेत.राज्यात महायुतीचं काम राज्यामध्ये खूप चांगलं चालू आहे. राज्यामध्ये सर्वांगीण विकास होत आहे. गेल्या दोन वर्षात आम्ही सर्वांगीण विकास करतोय, सर्व घटकांना घेऊन विकास साधला जात आहे. त्याला केंद्राची मदत मिळत असल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणालेत.
उद्धव ठाकरेंवर टीका
पंतप्रधान मोदी यांनी १० वर्षांमध्ये केलेला विकास हा लोकांसमोर आहे. ५०-६० वर्षात काँग्रेसने जे केलं नाही. ते पुढच्या १०० वर्षदेखील असा विकास करू शकणार नाहीत, असं काम पंतप्रधान मोदींनी १० वर्षात केलं आहे. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लोकांसमोर जात आहोत. शासन आपल्या दारी कार्यक्रम सुरू केला आहे. आम्ही फेसबुक लाईव्ह करत नाही.लोकांसमोर जातो, बांधावर जातो,लोकांच्या अडचणी समजून घेतो. हे ऐकणारं सरकार आहे, ऐकून निर्णय घेणारे सरकार आहे. या निवडणुकीमध्ये लोक केलेल्या कामाची पावती देतील. घरी बसणाऱ्यांना नाही तर रस्त्यावर, फिल्डवर उतरून काम करणाऱ्यांना मतदान करतील, असा विश्वासही मु्ख्यमंत्री शिंदे म्हणालेत.
खोटं बोल पण रेटून बोल ठाकरेंची संस्कृती
उद्धव ठाकरे यांनी खूप मुलाखती दिलेल्या आहेत. बंद दरवाजा आड काय झालं हेही त्यांनी सांगितलं तेही खोटं होतं खोटं होतं. खोटं बोलण्याची एक सीमा असते खोटं बोला पण रेटून बोला, अशी उद्धव ठाकरेंची सवय आहे. त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं शिवसेना भाजपच्या गटबंधनमध्ये त्यांना मुख्यमंत्री होता आलं नसतं म्हणून त्यांनी खोटं सांगितलं.
आमची अमित शाहांसोबत चर्चा झाली मात्र अमित शाह यांनी स्पष्ट सांगितलं की, अशा गोष्टीला नकार दिलेला आहे. त्यामुळे खोटं बोल पण रेटून बोल ही त्यांची संस्कृती असल्याची टीका मुख्यमंत्री शिंदे म्हणालेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.