Mahadev Koli Samaj : बुलढाण्यात महादेव कोळी समाज युवक आक्रमक, न्याय मिळेपर्यंत ठिय्या आंदाेलन

आमच्या उपोषणाची प्रशासनाने अजूनही दखल घेतली नाही असा आराेप आंदाेलकांनी केला.
mahadev koli samaj fasting andolan at buldhana
mahadev koli samaj fasting andolan at buldhanasaam tv
Published On

Buldhana News :

आदिवासी कोळी महादेव समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठी आजही बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय समोर समाज बांधवांनी जाेरदार निदर्शने केली. युवकांनी, विद्यार्थ्यांनी हातात मागण्यांचे फलक घेत न्याय मिळेपर्यंत ठिय्या आंदाेलन सुरु ठेवणार असल्याचा इशारा जिल्हा प्रशासनास दिला. (Maharashtra News)

आदिवासी कोळी महादेव समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय समोर समाज बांधवांच्या वतीने गेल्या दोन जानेवारीपासून बेमुदत उपोषण सुरु आहे. या उपोषणाची प्रशासनाने अजूनही दखल घेतली नाही.

mahadev koli samaj fasting andolan at buldhana
Tuljapur Ramvardayini : आई राजा उदोऽऽ उदोऽऽ तुळजापूर सजलं; कुंकवाची उधळणीत जलयात्रेस प्रारंभ

यामुळे जिल्ह्यातील समाज बांधवांनी उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज (बुधवार) जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. तेथे आंदाेलनात सहभाग घेत जोरदार निदर्शने केली. यामध्ये महिला आणि विद्यार्थ्यांचाही मोठा सहभाग पाहायला मिळाला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्रमाणपत्र घेऊनच आंदाेलन थांबेल

विद्यार्थ्यांनी हातात फलक घेत मागण्यांची घाेषणाबाजी केली. अधिकारी जागेवर सापडत नसल्याची तक्रार विद्यार्थी यांची हाेती. शासन आंदोलनाची दखल घेऊन प्रमाणपत्र वितरित करीत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका आंदोलकांनी घेतली.

Edited By : Siddharth Latkar

mahadev koli samaj fasting andolan at buldhana
Congress चे फेब्रुवारीत लाेणावळामध्ये चिंतन शिबीर, राहूल गांधी करणार मार्गदर्शन

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com