Lok Sabha Election 2024 : लोकसभेच्या रिंगणात मराठा उमेदवार? दुपारपर्यंत जरांगे पाटील भूमिका करणार जाहीर

Manoj Jarange Patil : जरांगे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उरणार की नाही याबाबत अहवाल तपासल्यानंतर निर्णय घेणार आहेत. आज दुपारी ४ ते ५ च्या दरम्यान पत्रकार परिषद घेऊन जरांगे पाटील
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSaam TV

Loksabha Election 2024 :

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष कामाला लागलेत. अशात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. जरांगे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार की नाही याबाबत अहवाल तपासल्यानंतर निर्णय घेणार आहेत. आज दुपारी ४ ते ५ च्या दरम्यान पत्रकार परिषद घेऊन जरांगे पाटील यावर आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.

Manoj Jarange Patil
Loksabha Election 2024: काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार? भाजप नेत्याच्या दाव्याने खळबळ

गावागावातून अंतरवाली सराटीत अहवाल यायला सुरुवात झालीय. मनोज जरांगे पटलांकडून या अहवालाची तपासणी करण्यात येतेय. अहवालाची तपासणी केल्यानंतर जरांगे पाटील त्यांची भूमिका जाहीर करणार आहेत.

लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाचा स्वतंत्र अपक्ष उमेदवार द्यायचा की नाही याबाबत गावागावात बैठका घेऊन जरांगे यांनी समाजाला अहवाल सादर करण्यास सांगितला होता. त्यानुसार आज अंतरवालीत गावागावातून अहवाल येण्यास सुरुवात झालीय.

जरांगे पाटील या अहवालाची तपासणी करत असून दुपारी 4ते 5 च्या दरम्यान लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाचे स्वतंत्र अपक्ष उमेदवार उभे करायचे की नाही याचा निर्णय जाहीर करणार आहेत. दरम्यान, जरांगे आज होणाऱ्या पत्रकार परिषदेत काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. याच पत्रकार परिषदेत आज जरांगे लोकसभा उमेदवारीरांच्या नावाची घोषणा करण्याची देखील शक्यता आहे.

दरम्यान केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव ही सकाळपासून आंतरवली सराटी गावात मराठा कार्यकर्त्यांसह सकाळपासून दाखल झाले आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्याप्रमाणे अंतरवाली सराटी गावातील आंदोलन स्थळावरील मंडपात ते बसलेले आहेत.

Manoj Jarange Patil
Nagpur Crime: नागपूर पोलिसांची मोठी कारवाई! चोरीच्या प्रकरणात चौघांना अटक; २ लाखांचा मुद्देमाल जप्त

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com