Buldana Constituency : बुलढाण्यात भाजपमध्ये बंडखोरी; अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस, विजयराज शिंदे काय भूमिका घेणार?

Buldana News : निवासस्थानी बोलावून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आज विजयराज शिंदे हे आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून भूमिका स्पष्ट करणार आहेत.
Lok Sabha Election 2024
Buldana ConstituencySaam TV

संजय जाधव

Lok Sabha Election 2024 :

बुलढाणा लोकसभेसाठी भाजपाचे निवडणूक प्रभारी विजयराज शिंदे यांनी महायुतीमध्ये बंडखोरी करत आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विजयराज शिंदे हे बुलढाणा मतदारसंघाचे तीन वेळा आमदार राहिले आहेत. नाराज असलेल्या विजयराज शिंदे यांनी महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्यावर अनेक आरोप केले आहेत.

Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी नियुक्त २८५ कर्मचाऱ्यांची ट्रेनिंगला दांडी; गैरहजर कर्मचाऱ्यांना बजावणार नोटिस

विजयराज शिंदे यांची भाजपाकडून मनधरणी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर काल प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विजयराज शिंदे यांना नागपूर येथे निवासस्थानी बोलावून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आज विजयराज शिंदे हे आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून भूमिका स्पष्ट करणार आहेत.

विजयराज शिंदे यांनी भाजपमध्ये बंडखोरी करत आपली उमेदवारी कायम ठेवल्यास उपद्रव मूल्याच्या आधारे याचा महायुतीच्या उमेदवाराला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. कारण विजयराज शिंदे सलग तीन वेळा बुलढाणा विधानसभेचे आमदार राहिले आहेत. तसेच २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी दुसऱ्या क्रमांकावर राहत २०.२८ टक्के मतं घेतली आहेत. त्यामुळे आता शिंदे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यात सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. अशात महायुतीने प्रतापराव जाधवांना उमेदवारी घोषीत केलीये. तर महाविकास आघाडीने नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे बुलढाण्यात प्रतापराव जाधव विरुद्ध नरेंद्र खेडेकर अशी थेट लढत होणार आहे. यात विजयराज शिंदेंनी उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यास याने महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

Lok Sabha Election 2024
Amravati News: अमरावती लोकसभा निवडणुकीतून RPIच्या राजेंद्र गवई यांची माघार; सामान्य कार्यकर्त्याला दिली उमेदवारी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com