तालिबानी सरकारच्या स्थापनेमुळे; भारतीय बाजारपेठेतील 'या' वस्तूंच्या दरवाढीची शक्यता!

अफगाणिस्तानात तालिबाने सरकार हातात घेतल्यानंतर इकडे भारतातील काही भागात ड्राय फ्रूटचे दर कृत्रिम रित्या वाढवण्यास सुरवात झाली आहे.
तालिबानी सरकारच्या स्थापनेमुळे; भारतीय बाजारपेठेतील 'या' वस्तूंच्या दरवाढीची शक्यता!
तालिबानी सरकारच्या स्थापनेमुळे; भारतीय बाजारपेठेतील 'या' वस्तूंच्या दरवाढीची शक्यता!Saam TV
Published On

पुणे : अफगाणिस्तानात तालिबाने सरकार हातात घेतल्यानंतर इकडे भारतातील काही भागात ड्राय फ्रूटचे दर कृत्रिम रित्या वाढवण्यास सुरवात झाली आहे .भारतात पुढील 2 महिने पुरेल एवढा ड्राय फ्रूटचा साठा उपलब्ध असला तरी केंद्र सरकार आयती वर भाव वाढ अवलंबून आहे . तसेच पुढील दिवस सणांचे असल्याने भाव वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही .Likely to increase the price of dried fruit

हे देखील पहा-

अफगाणिस्तानAfganistan मधून मोठ्या प्रमाणावर ड्राय फ्रूटस् आयात होत असत सध्याच्या घडामोडी पाहता हि आयात बंद झाली आहे .पण सध्या देशात अफगाणिस्तानातून येणाऱ्या ड्राय फ्रूटचा पुरेसा साठा शिल्लक आहे. त्यामुळे दर सध्या तरी स्थिर आहेत. परंतु पुढील काही दिवस आयातबंदी ही अशीच कायम राहिली तर माञ, ड्रायफ्रूट्सचे दर १०ते १५ टक्क्यांनी वाढू शकतात पण सध्याच्या बदाम दर वाढीचा आणि अफगान अस्थिरतेचा काहीही संबंध नाही कारण बदाम हे कँलिफोर्नियातून आयात होतं असाही खुलासा व्यापाऱ्यांनी केलाय अफगाणिस्तान मधून भारतात शाही जिरा,काळा मनुका ,जर्दाळू आयात केलं जातं आता केंद्र सरकार आयतीवर काय भूमिका घेत त्यावर भाव ठरतील असा व्यापारी वर्गाचा अंदाज आहे.

तालिबानी सरकारच्या स्थापनेमुळे; भारतीय बाजारपेठेतील 'या' वस्तूंच्या दरवाढीची शक्यता!
...तर जत तालुक्यातील पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी मिटू शकतो!

घाऊक बाजारातील अफगाणिस्तानवरुन ड्रायफ्रुटच्या दर्जानुसार सध्याचे प्रतिकीलोचे दर पुढीलप्रमाणे आहेत.

काळा मनुका - २५०-३५० अंजीर - ६००- ८०० जरदाळू - ३४० - ३८० खजूर - १०० - १००० शहाजिरा - ४००-५०० खरजीरा - ४८० किशमिश - २८० -६००

मात्र सध्याची अफगाणिस्थानातील परिस्थिती बघता तेथून भारतात आयात होणारा माल बंद असल्याने नक्कीच ड्रायफुड्सचे दर वाढतील यात शंका नाही.

Edited By-Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com