पंकजा मुंडेंना मंत्रीपद मिळू दे! भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी काढली पायी दिंडी

बीड ते मोहटादेवी पायी दिंडी काढण्यात आली आहे.
Beed Pankaja Munde News
Beed Pankaja Munde NewsSaam Tv

बीड : महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या नव्या सरकारने विधानसभेत बहुमत देखील सिद्ध केलं. नव्या सरकारमध्ये कोणाला किती खाती मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. अशातच भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना नवनिर्वाचित सरकारमधील मंत्रिमंडळात मंत्रीपद मिळावं. यासाठी आता बीडमधील भाजप महिला आघाडीच्या वतीने, बीड ते मोहटादेवी पायी दिंडी काढण्यात आली आहे. (Pankaja Munde Latest News)

Beed Pankaja Munde News
मोठी बातमी! शिंदे-फडणवीस सरकारचं खातेवाटप ठरलं; गृह, महसूल खातं कुणाकडे? वाचा सविस्तर...

आज सकाळी या दिंडीला सुरुवात झाली असून बीड- शिरूर कासार - मोहटादेवी अशी पायी दिंडी काढण्यात येत आहे. दरम्यान आम्हाला विश्वास आहे, या सरकारमध्ये नक्कीच पंकजा ताईंना मंत्रिपद मिळेल. आणि हीच भावना घेऊन साकड घालण्यासाठी, आम्ही बीडहून मोहटा देवीला पायी दिंडीच्या माध्यमातून जात आहोत. असे प्रतिक्रिया बीडच्या भाजप महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा संगीता धसे यांनी दिली आहे. (Beed Latest Marathi News)

Beed Pankaja Munde News
Shinde-Fadnavis Government : शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार दोन टप्प्यात

दरम्यान, भाजपकडून मुंडे भगिनींना जाणीवपूर्वक डावललं जात असल्याचं चित्र राज्यातील भाजपमध्ये निर्माण झालेलं आहे. प्रीतम मुंडे यांना न मिळालेलं मंत्री पद असो की पंकजा मुंडेंना न मिळालेली विधानपरिषदेवरची उमेदवारी असो, यामध्ये कुठेतरी मुंडे भगिनींना डावलण्यात आलं आहे.

त्यानंतर कार्यकर्त्यांनी देखील संतप्त भावना व्यक्त केल्या होत्या, त्यामुळे आता तरी भाजपची पक्षश्रेष्ठी कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेत, पंकजा मुंडे यांना मंत्रीपद देणार का ? हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com