तुळशी विवाह झाल्यानंतर राज्यभरात विवाहसोहळ्यांचा धूमधडाका उडतो. परंतू सध्या शिरुर भागात स्मशान शांतता आहे. अनेक स्थिरस्थावर झालेले नवरदेव सध्या बाशिंग बांधून नवरीच्या शोधात मजल दरमजल फिरतायेत. परंतू पदरी अपयशच येतय. आणि त्याला कारण ठरतंय. ते बिबट्या होय.. तुम्ही ऐकलंय ते अगदी खरंय बिबट्या.. याच बिबट्यानं अनेक लग्नाळूना वेटींगवर ठेवलंय.
शिरुरमध्ये बिबट्यांची संख्या 2 हजारांच्या पार गेली. त्यामुळे बिबट्याचा मानवी वस्तीतला वावर वाढला. आणि या संघर्षात काही दिवसात १० ते १२ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे या भागात विपुलता असूनही बिबट्याच्या वावरानं अनेक नवरदेव लग्नाच्या प्रतिक्षा वाढलीये.. आधी शेतकरी मुलगा नको म्हणणाऱ्या मुली आता बिबट्याप्रवण भागात लग्न नको असं म्हणू लागल्या. बिबट्याप्रवण क्षेत्रात गावकऱ्यांना धीर देण्यासाठी आलेल्या वनमंत्री गणेश नाईकांना गावकऱ्यांनी ही व्यथा सांगितल्यानंतर त्यांनी देखिल खंत व्यक्त केलीये.
शिरुर भागात बिबट्या भक्ष्याच्या शोधात तर नवरदेव नवरीच्या शोधात वणवण फिरतोय. असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. मानवी रक्ताला चटावलेल्या नरकभक्षक बिबट्याला ऑन द स्पॉट गोळ्या घालण्याचे आदेश वनमंत्र्यांनी दिले खरे. पण या मुळे हा शेकडो तरुणांचा रखडलेला लग्नाचा प्रश्न सुटेल का? वाडी वस्तीवर पुन्हा सनईचे सूर आणि मंगलाष्टका ऐकायला मिळतील का हे पाहणं महत्वाचं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.