Leopard Death In Aarey Forest: आरे जंगलात बिबट्याचा मृत्यू! तस्करी टोळी पुन्हा सक्रिय?

Death Of Leopard : आरेच्या युनिट 4 मध्ये बिबट्याचे सहा महिन्याचे पिल्लू मृत अवस्थेत आढळून आले.
Leopard Death In Aarey Forest
Leopard Death In Aarey Forestsaam tv
Published On

>>संजय गडदे

Aarey Forest News : मुंबईच्या गोरेगाव पूर्वेकडील आरे कॉलनी जंगलात बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आरेच्या युनिट 4 मध्ये बिबट्याचे सहा महिन्याचे पिल्लू मृत अवस्थेत आढळून आले. स्थानिक नागरिकांना सकाळी आठ वाजता हा बिबट्या मृत अवस्थेत दिसला आणि त्यांनी याविषयी वन विभागाला कळवले.

घटनेची माहिती मिळताच बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वन खात्याची टीम घटनास्थळी दाखल झाली आणि मृत बिबट्याला शव विच्छेदनासाठी घेऊन गेली.

Leopard Death In Aarey Forest
Election Result Live Updates : कोकणची जागा आम्ही जिंकलो, बऱ्याच काळानंतर आम्ही विजय मिळवला - देवेंद्र फडणवीस

आरे कॉलनी जंगलात एकूण 12 बिबटे होते. वन विभागाने त्यातील 6 बिबटे पकडून बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सोडले आहेत. उर्वरित बिबट्यांपैकी काल मध्यरात्री एक सहा महिन्याच्या बिबट्याच्या पिल्लाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात आहे की बिबट्याची हत्या करण्यात आली हे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच कळेल.

Leopard Death In Aarey Forest
Viral News : मुलींमुळे विद्यार्थ्याला परीक्षेदरम्यान आली चक्कर, सोशल मीडियावर सुरुये चर्चा; नेमकं घडलं तरी काय?

दरम्यान, गेल्या साडेतीन वर्षापूर्वी बिबट्याचे दात, नखे आणि कातडीची तस्करी करण्यासाठी टोळी सक्रिय होती. या टोळीने बिबटे पकडण्यासाठी जंगलात विविध ठिकाणी सापळे लावले होते. या संबंधी वन विभागाला माहिती मिळाल्यानंतर 8 लोकांना अटक केली होती. आता पुन्हा रात्री बिबट्याचा मृत्यू झाल्यामुळे अशी टोळी पुन्हा सक्रिय झाली आहे का? या संदर्भात वनविभाग तपास करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com