अंधारात मोबाईलवर बोलणं आलं अंगलट, बिबट्याच्या हल्ल्यात तरुण जखमी

Leopard Attacks Rising in Pune: पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागात बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांनी जनजीवन विस्कळीत झालंय. आता तर घराबाहेर मोबाईल बोलणेही धोक्याचं झालंय. असं आम्ही का म्हणतोय ?
The spot near Narayangaon where a leopard attacked an 18-year-old boy while he was talking on his mobile at night.
The spot near Narayangaon where a leopard attacked an 18-year-old boy while he was talking on his mobile at night.Saam Tv
Published On

मोबाईलशिवाय आपलं पान हलत नाही. मग तुम्ही शहरात असा किंवा गावखेड्यात....मात्र हाच मोबाईल बेसावध क्षणी अडचणीत आणू शकतो. एका तरुणाला रात्री घराबाहेर मोबाईल बोलणे खूपच महागात पडलं. कारण बिबट्याने नेमका त्याचवेळी त्याच्यावर हल्ला केलाय. पुणे जिल्ह्यातील नारायणगाव-जुन्नर रस्त्यालगत ही घटना घडली आहे. साकार नगरी सोसायटीजवळ रात्री सव्वा आठच्या सुमारास 18 वर्षीय तनिष परदेशी हा तरुण रस्त्यानजीक मोबाईलवर बोलत होता. त्याचवेळी बिबट्याने त्याच्यावर झडप घातली.

त्यात तनीष जखमी झालाय. पोटरीवर बिबट्याची नखे लागली आहेत. नारायणगाव ग्रामीण रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. नशीब बलवत्तर म्हणून तनीश या हल्ल्यातून वाचलाय. दरम्यान बिबट्या अचानक समोर आल्यावर काय कराल? याबाबत तज्ञांनी मार्गदर्शन केलंय.

बिबट्या समोर आल्यावर काय कराल?

- समोरच्या प्राण्याची उंची बघून बिबट्या हल्ला करतो

- अंगात जॅकेट असेल तर ते लगेच उंच पकडा

- लहान मुलांवर बिबट्याच्या हल्ल्याची शक्यता जास्त

- खाली बसलेल्या मोठ्या माणसांवरही बिबटा हल्ला करु शकतो

- बिबट्यासमोर घाबरून धावत जाण्याची चूक करु नका

- बिबट्या प्रवण क्षेत्रात घरासमोर शेकोटी पेटवून ठेवा

- अंधारात बाहेर पडताना मोबाईलवर मोठ्याने गाणी वाजवा

- आडोश्याला, निर्जन ठिकाणी मोबाईलवर चॅटिंग करु नका

लहान मुलांवरील वाढत्या हल्ल्याने वन विभागानेही जनजागृतीसाठी एक व्हिडीओ जारी केला आहे. दरम्यान नारायणगावमधील तरुणावर हल्ला झाल्यानंतर वन विभागाच्या टीमने घटनास्थळी पाहणी केली. ड्रोनद्वारे वारुळवाडीतील मीनाक्षी कृपा वसतीगृह परिसरात २०० फूट अंतरावर तीन बिबटे आढळले आहेत. याच भागात बिबट्याने चार पाळीव जनावरांवर हल्ला केल्याची घटना ताजी आहे.

वनविभागाने परिसरात आठ पिंजरे लावले आहेत. पुणे जिल्ह्यातील उत्तर भागात बिबट्याने अक्षरशा कहर केलाय. लोकांचं घराबाहेर पडणं कठीण झालंय. त्यामुळे यावर तातडीनं उपाय योजणं गरजेचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com