Leopard -Bear Viral Video: बिबट्या आणि अस्वल आले आमने-सामने, पुढं नेमकं काय झालं एकदा बघाच...

Latest News: या व्हिडिओला नेटिझन्सकडून खूप चांगली पसंती मिळत आहे.
leopard and bear video
leopard and bear videoSaam Tv
Published On

Chandrapur News: सोशल मीडियावर (Social Media) जंगलातील प्राण्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. हे व्हिडिओ पाहायला नेटिझन्सला देखील खूप आवडते. नुकताच सोशल मीडियावर चंद्रपूरातल्या ताडोबा अभयारण्यातला एक जबरदस्त व्हिडिओ व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ अस्वल आणि बिबट्याचा (leopard and bear video) आहे. या व्हिडिओला नेटिझन्सकडून खूप चांगली पसंती मिळत आहे. एका पर्यटकाद्वारे हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. सध्या हा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरत आहे.

leopard and bear video
Indian TV Content in Pakistan : 'कंगाल' झाला, पण सुधारणारच नाही!; भारतीय कार्यक्रम दाखवणाऱ्या टीव्ही चॅनेलवर पाकिस्ताननं केली कारवाई

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातल्या कोलारा बफर झोनमधील हा व्हिडिओ आहे. याठिकाणी बिबट्या आणि अस्वल हे अचानक आमने-सामने येतात. हे अप्रतिम दृश्य एका पर्यटकाने आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे. बिबट्या हा अतिशय चपळ प्राणी असला तरी देखील शरिराने भला मोठा आणि बलाढ्य असलेल्या अस्वलासमोर तो लहान असतो.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, अभयारण्यातील तलावावर पाणी पिऊन बिबट्या निघतो. तेवढ्यात भले मोठे अस्वल त्याठिकाणी पाणी पिण्यासाठी तलावाजवळ येते. दोघे समोरा-समोर येतात. एकमेकांना पाहून क्षणभर दोघेही विचारात पडतात.

बिबट्याला पाहून अस्वल आपल्या दोन्ही पायांवर एखाद्या स्टॅच्यूप्रमाणे उभा राहतो. बिबट्या त्या ठिकाणी तसाच उभा राहिलेला असतो. त्यानंतर अस्वल पुन्हा काही पाऊलं पुढं जाऊन परत पायांवर उभा राहतो. त्यानंतर बिबट्या घाबरुन त्या ठिकाणावरुन पळून जातो.

leopard and bear video
Jalna Crime News: एका वर्षापूर्वीच झालं होतं लग्न; विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल, परिसरात खळबळ

हे दृश्य आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करणारे पर्यटक रंजीत मंडल यांनी सांगितले की, '27 वर्षांपासून मी सफारी करत आहे. पण हे पहिल्यांदाच पाहिलंय. ते इतर पर्यटकांसह वाघ दिसण्याची वाट पाहत होते. त्यानंतर आम्ही बिबट्या आणि त्याची पिल्लू असलेल्या ठिकाणी गेलो. आम्हाला सुरुवातीला तलावाजवळ मादी बिबट्या दिसला आणि तेवढ्यात तिथे अस्वल आले. दोघेही एकमेकांना इजा न करता आपापल्या वाटेला गेले.'

दरम्यान, ताडोबा वन्यजीव अभयारण्यात दुर्मिळ प्राणी पाहायला मिळतात. याठिकाणी वाघ, अस्वल, बिबट्या, ब्लॅक पँथर हे प्राणी आहेत. या अभयारण्यातील प्राणी पाहण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक भेट देत असतात. महत्वाचे म्हणजे वाघाला पाहण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करत असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com