जन आशीर्वाद यात्रेत मंत्र्यांसह नेत्यांना मास्कचा विसर...

कोरोना नियमांची पायमल्ली
जन आशीर्वाद यात्रेत मंत्र्यांसह नेत्यांना मास्कचा विसर...
जन आशीर्वाद यात्रेत मंत्र्यांसह नेत्यांना मास्कचा विसर...राजेश भोस्तेकर
Published On

राजेश भोस्तेकर

रायगड - भाजपची जन आशीर्वाद यात्रा आज दक्षिण रायगडात Raigad सुरू आहे. कोरोना Corona संकट अद्यापही असून तोंडाला मास्क Mask लावणे, सुरक्षित अंतर ठेवा, सॅनिटायझरचा वापरा या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केंद्र आणि राज्य शासनाकडून केले जात आहे. मात्र भाजपच्या BJP मंत्र्यांसह नेत्यांना त्रिसूत्री नियमांचे विसर पडले असल्याचे चित्र दिसून येत आहेत.

हे देखील पहा -

माणगाव येथे गांधी मेमोरियल सभागृहात झालेल्या सभेत केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार आणि पदाधिकारी हे विना मास्क स्टेजवर बसले होते. त्यामुळे कोरोना नियमाचे उल्लंघन झाले होते.

जन आशीर्वाद यात्रेत मंत्र्यांसह नेत्यांना मास्कचा विसर...
दोडका, गवार, लसणाला आला भाव

भाजपची जन आशीर्वाद यात्रा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली रायगडात सुरू आहे. नारायण राणे यांनी पाली बल्लाळेश्वरचे दर्शन घेतल्यानंतर जन आशीर्वाद यात्रेला प्रारंभ झाला. वाकण फाटा, कोलाड नाका, इंदापूर येथे जनतेशी संवाद साधला. त्यानंतर माणगाव येथे गांधी मेमोरियल सभागृहात नारायण राणे यांची सभा झाली.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com