Latur News: दहावीचा विद्यार्थी परीक्षा झाल्यावर तलावात पोहोण्यासाठी गेला, पुन्हा परतलाच नाही; लातूरमधील दुर्दैवी घटना

Latur News : लातूर शहरातील दहावीच्या विद्यार्थ्याचा जलतरण तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
File photo
File photo Saam tv

Latur News : लातूरमधून दुर्दैवी घटना समोर आली आहे. लातूर शहरातील दहावीच्या विद्यार्थ्याचा जलतरण तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. लातूर शहरातील माताजी नगरमधील राहणारा हा विद्यार्थी होता. आदित्य कांबळे असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. (Latest Marathi News)

लातूर (Latur) शहरातील माताजी नगर मधील राहणाऱ्या एक विद्यार्थी हा दहावी बोर्डाची भूगोल विषयाची परीक्षा झाली. सुट्ट्या सुरू झाल्याने मित्रांसोबत आदित्य हा पंकज जलतरण तलावात पोहण्यासाठी गेला. मात्र, पोहोण्यासाठी गेलेल्या या आदित्यचा बुडून मृत्यू झाला. लातूर शहाराजवळील कातपूर रोडवरील पंकज जलतरण तलावात पोहोण्यासाठी गेला होता. मात्र,या तलावाच्या पाण्यात बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

File photo
Pune Crime News : भयंकर! हॉकी खेळण्याचा वादातून चौघांकडून मित्राच्या ३ बहिणींवर प्राणघातक हल्ला; पुण्यातील घटना

दरम्यान, जलतरण तलावात बुडून एका शालेय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. पंकज जलतरण तलावात अधिकृत आहे का? त्याठिकाणी ट्रेनर उपलब्ध का नव्हता? असे प्रश्न आदित्याच्या वडिलांनी उपस्थित केले आहेत.

माझ्या मुलासोबत जे घडलं आहे असं कोणाच्याही सोबत घडू नये. माझ्या मुलाला न्याय देण्यात यावा अशीही मागणी मृत आदित्य कांबळे वडिलांनी केली आहे. शवविच्छेदन नंतर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. याबाबत लातूर ग्रामीण पोलीस (Police) स्टेशन मध्ये आकास्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

File photo
Latur News: दुर्देवी..पिठाच्‍या गिरणीत ओढणी अडकली; महिलेचा जागीच मृत्यू

सांगलीत शेततळ्यात दोन सख्ख्या भावांचा बुडून दुर्दैुवी मृत्यू

सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातून शनिवारी धक्कादायक घटना घडली. मिरजमधील बेडगावमधील शेततळ्यात दोन सख्ख्या भावांचा बुडून दुर्दैुवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दुर्देवी घटनेत अयाज यूसन सनदी आणि आफान युनूस सनदी या दोन भावांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com