Latur: खळबळजनक! पोलीस ठाण्यातच पोलिसाची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

लातूर जिल्ह्यामधील किल्लारी पोलीस ठाण्यामध्ये एका पोलीस (Police) कर्मचाऱ्याने पोलीस ठाण्यातच स्वतःला बंदुकीने गोळ्या झाडून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला
Latur: खळबळजनक! पोलीस ठाण्यातच पोलिसाची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या
Latur: खळबळजनक! पोलीस ठाण्यातच पोलिसाची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्यादीपक क्षीरसागर
Published On

लातूर : लातूर जिल्ह्यामधील किल्लारी पोलीस ठाण्यामध्ये एका पोलीस (Police) कर्मचाऱ्याने पोलीस ठाण्यातच स्वतःला बंदुकीने गोळ्या झाडून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही घटना शनिवारी मध्यरात्री घडली आहे. या घटनेची माहिती समजताच पोलीस (Police) अधीक्षक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत. किल्लारी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस (Police) कर्मचारी साहेब सावंत (वय- ३८) यांनी मध्यरात्री स्वत: वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. काही दिवसांपासून ते पैशांच्या देवाण- घेवाणीच्या मानसिक त्रासातून जात होते. (Latur police station a policeman shot himself)

हे देखील पहा-

यातूनच ही आत्महत्या झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. साहेब सावंत हे कासार शिर्शी येथे असताना त्यांनी काही प्लॉट घेतले होते. यामधून काही आर्थिक व्यवहार झाले होते. या व्यवहारामधून आर्थिक वाद निर्माण झाले असल्याचे सांगितले जात होते. सध्या त्यांची नेमणूक किल्लारी पोलीस (Police) ठाण्यात करण्यात आली होती. मध्यरात्री त्यांनी ठाण्यात रायफलचा वापर करत आत्महत्या केली आहे. किल्लारी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. सध्या पोलीस त्याचा तपास करत आहेत.

Latur: खळबळजनक! पोलीस ठाण्यातच पोलिसाची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या
Kolhapur: अंबाबाई मंदिरातील ई पास सक्ती रद्द, आता दर्शनासाठी ई पासची गरज नाही...(पहा Video)

या घटनेची माहिती मिळताच लातूरचे पोलिस अधीक्षक निखिल पिंगले किल्लारी पोलीस (Police) ठाण्यात दाखल झाले आहे. मृतदेह पोस्टमार्टमकरिता लातूरच्या वैद्यकीय महाविद्यालयत पाठवण्यात आला आहे. या घटनेची माहिती सकाळच्या वेळी समजताच किल्लारी आणि परिसरात नागरिकांनी पोलीस ठाण्याच्या परिसरात गर्दी केली होती. आत्महत्येअगोदर काही चिठ्ठी लिहून ठेवण्यात आली होती. त्याची सत्यता पडताळणी सुरू असल्याचे माहिती सूत्रांनी दिली आहे. साहेब सावंत यांच्या नातेवाईकाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी काही लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com