Kolhapur: अंबाबाई मंदिरातील ई पास सक्ती रद्द, आता दर्शनासाठी ई पासची गरज नाही...(पहा Video)

आता राज्यभरात भाविकांसाठी एक खूशखबर आहे.
Kolhapur: अंबाबाई मंदिरातील ई पास सक्ती रद्द, आता दर्शनासाठी ई पासची गरज नाही...(पहा Video)
Kolhapur: अंबाबाई मंदिरातील ई पास सक्ती रद्द, आता दर्शनासाठी ई पासची गरज नाही...(पहा Video)saamtv
Published On

कोल्हापूर : आता राज्यभरात भाविकांसाठी एक खूशखबर आहे. कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे जवळपास सगळ्याच गोष्टी नॉर्मल मोडवर करण्यात येत आहेत. आता राज्यभरात प्रसिद्ध देवस्थानांनी देखील ई- पासची (E-pass) सक्ती रद्द करत भक्तांना थेट देवाचे दर्शन घेण्याची मुभा दिली आहे. कोल्हापूरची (Kolhapur) करवीर निवासिनी अंबाबाई आणि जोतिबाच्या दर्शनासाठी आता ई- पासची गरज लागणार नाही. त्यामुळे आता अंबाबाई मंदिराच्या (Ambabai Temple) ४ दरवाजातून भक्तांना प्रवेश मिळणार आहे.

पहा व्हिडिओ-

कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी आता ई- पासची आजिबात गरज लागणार नाही. देवस्थान समितीने ई- पासची सक्ती रद्द केली आहे. ४ ही दरवाजांतून आजपासून मंदिरात प्रवेश घेता येणार आहे. भाविकांच्या मागणीचा आदर करून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीक़डून हा निर्णय घेण्यात आला आहे. तिकडे जोतिबाच्या दर्शनासाठी देखील आता ईपासची गरज लागणार नाही. यामुळे आता सर्व भाविकांना दर्शन घेता येणार आहे. शिर्डीमध्ये साई परिक्रमेस भाविकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे.

Kolhapur: अंबाबाई मंदिरातील ई पास सक्ती रद्द, आता दर्शनासाठी ई पासची गरज नाही...(पहा Video)
LPG Cylinder: 643 रुपयामध्ये मिळणार गॅस सिलेंडर; जाणून घ्या कसे

देश- विदेशामधून हजारो भाविक या पायी परिक्रमेत ‌सहभागी झाले आहेत. महिला भाविकांची संख्या देखील लक्षणीय आहे. १४ किलोमीटर असलेली ही परिक्रमा लक्षवेधी ठरली आहे. शालेय विद्यार्थ्यांनी साकारलेले चित्ररथावरील देखावे, ढोल - ताशांचा गजर अशा थाटामध्ये खंडोबा मंदिरापासून सकाळी ६ वाजता परिक्रमेस सुरूवात झाली होती. साईबाबा हयातीत असताना शिर्डी गावच्या शिवेची परिक्रमा करत होते, असा उल्लेख साईबाबांच्या‌ जीवनावर आधारीत साईसतचरित्र ग्रंथात आढळतो.

या धर्तीवर ३ वर्षाअगोदर ग्रीन अँड क्लिन शिर्डीच्या वतीने साई परिक्रमा उत्सव सुरू करण्यात आला होता. मात्र, कोविड संकटात ‌या उत्सवामध्ये खंड पडला होता. सर्व नियम शिथील झाल्यावर आज निघालेल्या शिर्डी परिक्रमेत ५ हजारांहून जास्त भाविक सामिल झाले आहेत. ग्रामस्थच नव्हे तर शालेय विद्यार्थी, शिक्षक तसेच राज्य आणि विदेशातून आलेले भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com