Latur Heavy Rain: लातूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस

Latur Weather News: मागील काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा जाणवत होता. उकाडा देखील प्रचंड वाढलेला होता. यामुळे नागरिक हैराण झाले होते. दरम्यान मध्यंतरी अवकाळी पाऊस झाला होता.
Latur Heavy Rain: लातूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस
Latur Heavy RainSaam TV

संदीप भोसले 
लातूर
: केरळमध्ये दाखल झालेला मान्सूनचे लवकरच राज्यात आगमन होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान आज दुपारच्या सुमारास लातूर जिल्ह्यातील अनेक भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. साधारण दोन तास मान्सूनपूर्व पावसाने झोडपून काढले आहे. 

Latur Heavy Rain: लातूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस
Pune Airport : पुणे विमानतळावर सोने जप्त; सीमा शुल्क विभागाची कारवाई

मागील काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा जाणवत होता. उकाडा देखील प्रचंड वाढलेला होता. यामुळे नागरिक हैराण झाले होते. दरम्यान मध्यंतरी अवकाळी पाऊस झाला होता. मात्र आता मान्सूनचे वारे वाहू लागले असून मागील दोन- तीन दिवसांपासून राज्यातील अनेक भागात मान्सूनपूर्व पावसाचे आगमन होत आहे. यात आज लातूर जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. यामुळे हवेत देखील गारवा निर्माण झाला आहे. 

Latur Heavy Rain: लातूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस
Kalyan Crime : कल्याणमध्ये दोन गँगचा राडा; गाड्यांची तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न. दोघेजण पोलिसांच्या ताब्यात

वादळी वाऱ्यासह पाऊस 

लातूर जिल्ह्यात आज पहाटेपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान आज दुपारपासून जिल्ह्यातल्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस झाला आहे. तर गेल्या २ तासापासून जिल्ह्यातल्या अनेक भागात विजांच्या कडकडाटात तुफान पाऊस बरसला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना पावसाळ्याची चाहूल लागली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com