Latur News: ये झिपरे, आधी बापाला फोन लाव! नंतर..; ट्रिपल सीट जाणाऱ्या तरुणींना महिला कॉन्स्टेबलने भररस्त्यात बदडलं

Female Traffic Police Constables Slapped Three Girls: लातूर शहरातील एका मुख्य रस्त्यावरुन तीन तरुणी स्कुटीवरुन भरधाव वेगाने जात होत्या. त्यावेळी महिला कॉन्स्टेबलने त्यांना थांबवलं त्यानंतर त्यांच्या कानाखाली आवाज काढला.
Latur News
Female Traffic Police Constables Slapped Three Girlssaam tv
Published On

संदीप भोसले, साम प्रतिनिधी

ट्रिपल सीट जाणाऱ्या तीन तरुणींना एका महिला कॉन्स्टेबलने चांगलंच झापलं. आज तुमच्या कानाखाली आवाज काढला ना तो तुमच्या कायम लक्षात राहिल असं म्हणत महिला कॉन्स्टेबलने तीन तरुणींना चांगलीच अद्दल घडवली. पण तरुणींवर दंडात्मक कारवाई करवाई करताना महिला कॉन्स्टेबलनं अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केलीय. या सगळ्या प्रकरणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.(Female Traffic Police Constables Slapped Three Girls In Latur)

मुलींच्या बेदरकारपणे वाहन चालवण्यावरुन नेटीझन्स कमेंट करत आहेत. दरम्यान महिला कॉन्स्टेबल तरुणींना झापत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. जीव लई वर झाला का? रेस गाडी चालण्याचे लायसन्स मिळालं का? असा जाब महिला कॉन्स्टेबल विचारते. कॉन्स्टेबलने तिन्ही तरुणीची भर रस्त्यावर तुफान शाब्दिक धुलाई केली. पण तरुणींवर कारवाई करतांना महिला कर्मचारी शिवीगाळ करतेय, यावरून नेटीझन्सकडून महिला कर्मचारीवर टीका केली जातेय.

Latur News
Andhra pradesh Shocker : माजी मुख्यमंत्र्यांच्या कारने एकाला चिरडलं; स्वागताला आलेल्या कार्यकर्त्याचा जागीच मृत्यू ,भयानक VIDEO

लातूर शहरातील एका मुख्य रस्त्यावरुन तीन तरुणी स्कुटीवरुन भरधाव वेगाने जात होत्या. कर्तव्यावर असलेल्या वाहतूक शाखेच्या महिला कॉन्स्टेबलला ही बाब लक्षात आली. त्यानंतर, बराच वेळ त्यांचा पाठलाग त्यांनी केला. त्यांनी त्या तीन तरुणींना अडवलं. त्यानंतर वाहतूक शाखेतील महिला कर्मचाऱ्यांचा संताप अनावर झाला.

Latur News
₹५०० काढले, ११०० रूपये निघाले, ATM मधून पैशांचा पाऊस, लोकांची तुफान गर्दी | VIDEO

महिला कॉन्स्टेबलने तिन्ही तरुणींची भर रस्त्यावरच सपासप दोन तीन चापट लगावल्या. गाडी कशी चालवता... कसं बसता... घरी सांगून आलात का? अपघात झाला, जर तुम्ही मेलात तर घरच्यांनी कोणाकडे पाहायचं असं बोलत वाहतूक महिला कर्मचारीने त्यांना चांगलेच सुनावले. त्यावर मुली त्यांची माफी मागतात आणि गाडी परत मागतात. मात्र वाहतूक शाखेच्या महिला कर्मचाऱ्यांचा संताप कमी झाला नव्हता.

त्यावर महिला कर्मचारी त्यांना अजून परत एकदा रागवते. आधी तुझ्या बापाचा नंबर दे, फोन लाव तुझ्या आईला अस महिला कर्मचारी म्हणते. काही केल्या कमी होत नव्हता. हा सर्व घटनाक्रम मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

मुलींनी बेफाम गाडी चालवणं चुकीचे आहे तितकेच संतापलेल्या महिला कॉन्स्टेबल मुलींना भर रस्त्यावर मारहाण करणं चुकीचं असल्याचं नेटीझन्स म्हणत आहेत. या घटनेवर आता उलट सुलट प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. मुलींना रस्त्यावर असं मारत अपमान करणे योग्य नव्हे, महिला कॉन्स्टेबलची चूक झाली, असेही काहींचे म्हणणे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com