Latur Accident: दुचाकीला कट मारल्याने झाला वाद, दारूड्या कारचालकाने एकाच कुटुंबातील चौघांना चिरडले

Latur PoliceL: दुचाकीला कट मारल्याने वाद झाला. त्यानंतर कार चालकाने दुचारीवरून प्रवास करणाऱ्या संपूर्ण कुटुंबाला धडक दिली. अपघातामध्ये दोघाता जागीच मृत्यू तर दोघे जखमी झालेत.
Latur Accident: दुचाकीला कट मारल्याने झाला वाद, दारूड्या कारचालकाने एकाच कुटुंबातील चौघांना चिरडले
Latur Accident News Saanm TV
Published On

लातूरमध्ये ड्रंक अँड ड्राईव्हची (Drunk And Drive) घटना समोर आली आहे. दारू पिऊन पाठलाग करत कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे जण गंभीर जखमी झालेत. लातूर- सोलापूर महामार्गावर हा भीषण अपघात झाला. या अपघात प्रकरणी ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून लातूर पोलिसांकडून तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लातूर - सोलापूर महामार्गावरच्या बुधोडा (पेठ) या ठिकाणी कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये एकाच कुटुंबीतील आई आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला. तर या महिलेचा पती आणि छोटा मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील कार चालक हा दारू पिऊन वाहन चालतवत होता.

Latur Accident: दुचाकीला कट मारल्याने झाला वाद, दारूड्या कारचालकाने एकाच कुटुंबातील चौघांना चिरडले
Accident News: साखरखेर्डा पोलीस स्टेशन हद्दीत भरधाव ट्रकची कारला जोरदार धडक; एक ठार, तीन गंभीर जखमी

अपघातातील दुचाकीला कारने कट मारला. यावेळी दुचाकीवरून जाणाऱ्या सादिक शेख यांनी विचारपूस केली असता कारमधील पाच जणांसोबत सुरूवातीला बाचाबाची झाली. दरम्यान दुचाकीस्वार त्या ठिकाणाहून लातूरच्यादिशेने निघाला. दुचाकी पुढे गेल्यानंतर पाठीमागून कारने पाठलाग करत दुचाकीवरून जाणाऱ्या या कुटुंबाला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, इकरा सादीक शेख आणि नादिया शेख या मायलेकींचा जागीच मृत्यू झाला.

तर सादीक आणि त्यांचा मुलगा आहाद शेख हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर लातूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर या प्रकरणी पोलिसांनी गंभीर दखल घेतली अशून लातूरच्या औसा पोलिस ठाण्यात ५ जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुल्क गोष्टीवरून झालेल्या वादातून हा अपघात झाला आणि दोघांना आपले प्राण गमवावे लागले. या अपघातामुळे खळबळ उडाली आहे.

Latur Accident: दुचाकीला कट मारल्याने झाला वाद, दारूड्या कारचालकाने एकाच कुटुंबातील चौघांना चिरडले
Accident News: पालकमंत्र्यांच्या गाडीची टेम्पोला धडक, अपघातानंतर वाहन उलटले; चालक गंभीर जखमी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com