Latur News : लातूरमध्ये १४ वर्षीय शाळकरी मुलाने संपवलं जीवन; इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून घेतली उडी

Latur School Boy Death : लातूर शहरातील उद्योगभवन परिसरात एक धक्कादायक घटना घडली. एका १४ वर्षीय शाळकरी मुलाने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेत आपली जीवनयात्रा संपवली.
लातूरमध्ये १४ वर्षीय शाळकरी मुलाने संपवलं जीवन; इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून घेतली उडी
Latur School Boy DeathSaam TV

संदीप भोसले, साम टीव्ही लातूर

लातूर शहरातील उद्योगभवन परिसरात एक धक्कादायक घटना घडली. एका १४ वर्षीय शाळकरी मुलाने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेत आपली जीवनयात्रा संपवली. सोमवारी (ता. २१) सकाळी घडलेल्या या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

लातूरमध्ये १४ वर्षीय शाळकरी मुलाने संपवलं जीवन; इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून घेतली उडी
Pune Porsche Car Accident: फरार बिल्डर विशाल अग्रवाल अखेर सापडला; पुणे पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर येथून पकडलं

शाळकरी मुलाने इतकं टोकाचं पाऊल का उचललं? याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलगा चाकूर तालुक्यातील गांजूर येथील रहिवासी आहे.

खासगी शिकवणीसाठी कुटुंबियांनी त्याला लातुरात घर भाड्याने घेऊन दिले होते. सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास शहरातील उद्योग भवन परिसरातील एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावर या मुलाने उडी घेतली.

यामध्ये त्याला गंभीर दुखापत झाली. स्थानिकांनी त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच मृत मुलाच्या पालकांनी रुग्णालयात धाव घेत आक्रोश केला.

दरम्यान, या घटनेबाबत लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिकचा तपास शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी करत आहेत. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

लातूरमध्ये १४ वर्षीय शाळकरी मुलाने संपवलं जीवन; इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून घेतली उडी
Nagpur Crime News: धक्कादायक! बनावट कागदपत्रे देत आरटीईमधून प्रवेश, नागपूरमध्ये १७ पालकांवर गुन्हा दाखल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com