लातूर महामार्गावर मृत्यूचा चौफुला, रस्त्यावर धावतो मृत्यू; एकाच ठिकाणी मृत्यूचा सिलसिला

Latur Nanded Highway Accident : मृत्यूचा थरकाप उडवणारा हा व्हिडीओ पाहा. दुचाकीवर पती आणि पत्नी लातूरकडे निघाले होते. मात्र नांदगाव पाटी चौपुल्यावर रस्ता क्रॉस करताना कारने भीषण धडक दिली.
Latur Nanded highway One person dies in car bike accident
Latur Nanded highway One person dies in car bike accidentSaam Tv News
Published On

लातूर : नांदेड-लातूर महामार्गावर नांदगाव पाटी हा मृत्यूचा चौपुला बनलाय. तर हा चौपुला ब्लॅक स्पॉट बनतोय. मात्र या चौपुल्यावर किती अपघात झालेत आणि किती लोकांचा मृत्यू झालाय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. लातूर-नांदेड महामार्गावर नांदगाव पाटी हा मृत्यूचा चौफुला बनलाय. कारण याच चौफुल्यावर एकाच प्रकारे महिनाभरात ३ भीषण अपघात झालेत. तर प्रत्येक वेळी अपघाताला कारणीभूत ठरतोय दुचाकीवाला.

मृत्यूचा थरकाप उडवणारा हा व्हिडीओ पाहा. दुचाकीवर पती आणि पत्नी लातूरकडे निघाले होते. मात्र नांदगाव पाटी चौपुल्यावर रस्ता क्रॉस करताना कारने भीषण धडक दिली. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झालाय. तर त्याची पत्नी गंभीर जखमी झालीय. तर याआधीही याच स्पॉटवर दुचाकीला वाचवताना एसटी बसचा भीषण अपघात झाला. त्यात ३६ प्रवासी गंभीर जखमी झाल्याचं समोर आलं.

Latur Nanded highway One person dies in car bike accident
फोनवर बोलताना हॅलोऐवजी जय शिवराय म्हणा; राष्ट्रवादीच्या मेळाव्यातून सूचना, प्रांताध्यक्षांचा आदेश

मृत्यूचं तांडव माजवणाऱ्या याच चौपुल्यावर महिनाभरापूर्वी अशाच प्रकारे रस्ता क्रॉस करताना दुचाकीवरील पशू वैद्यकीय अधिकाऱ्याला इनोव्हा गाडीने उडवलं. महामार्गावर मृत्यूचा सिलसिला सुरु असल्यानं प्रशासनानं सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची मागणी माजी आमदार धीरज देशमुखांनी केलीय.

लातूरच्या नांदगाव पाटीचा चौपूला मृत्यूचं केंद्र बनलंय.. मात्र हे अपघात रस्ते बांधणीच्या चूकांमुळे आणि सिग्नल व्यवस्था नसल्याने होत असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलंय. सातत्याने धडकी भरवणारे अपघात होत असतील तर हे अपघात रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. मात्र महिनाभरात तीन भीषण आणि अनेक छोटे अपघात झाल्यानंतरही प्रशासनाला जाग का येत नाही? क्रिकेटच्या स्कोअर बोर्डाप्रमाणे अपघातातील मृत्यूचे आकडे वाढण्याची वाट प्रशासन बघत आहे का? असे अनेक प्रश्न निर्माण झालेत.

Latur Nanded highway One person dies in car bike accident
Weather Update : देशात कुठे उष्णतेची लाट, तर कुठे बरसणार सरी; पुढील ३ दिवस कसं असेल हवामान? जाणून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com