एक कोटीच्या विम्यासाठी मृत्यूचा बनाव, कारमध्ये जाळलं जिवंत व्यक्तीला

Latur Insurance Fraud Live Burning Murder: कर्ज, मैत्रिणी आणि शानशौकीसाठी लातुरात माणुसकी आणि माणसाला जिंवत जाळण्यात आलंय. होय. हे ऐकून तुम्हाला अजिबात विश्वास बसणार नाही पण हे सत्य आहे.. पाहा काय झालं महाऱाष्ट्रातल्या लातूरमध्ये...
MAN BURNS INNOCENT STRANGER ALIVE FOR ₹1 CRORE INSURANCE
MAN BURNS INNOCENT STRANGER ALIVE FOR ₹1 CRORE INSURANCESaam Tv
Published On

पैशांच्या लोभापायी माणूस कधी काय करेल याचा काही नेम नाही. कर्ज, मैत्रिणी आणि शानशौकीपायी एका सुशिक्षित तरुणाने जे केलंय ते ऐकून तुमच्या पायाखालची जमीन हादरेल...कारण लातूरमध्ये पैशांच्या मोहापायी आणि कर्ज फेडण्याच्या नादात एका अनोळखी जिवंत माणसालाच जाळलंय. या घटनेनं माणूसकीच्या चिंधड्या उडाल्या आहेत. मुख्य म्हणजे हत्येची कहाणी पाहिल्यावर तुम्ही कधीच कोणा अनोळखी व्यक्तीकडे लिफ्ट मागणार नाही. कारण लिफ्ट मागणा-या व्यक्तीचा थंड डोक्यानं नियोजनपुर्वक कसा खुन केलाय ते पाहा..

हा आहे एका खासगी फायनान्स कंपनीत जिल्हा प्रमुख या पदावर कार्यरत असलेला गणेश चव्हाण. याचा चेहरा नीट निरखून पाहा....याच्या डोक्यावर 57 लाखांचं कर्ज होतं. हे कर्ज फेडण्यासाठी त्याच्या डोक्यात 1 कोटींच्या विम्याची रक्कम हडपण्याचा प्लॅन तयार झाला. त्यासाठी त्यानं स्वत:च्याच अपघाती मृत्यूचा बनाव रचला. लॅपटॉप देण्याच्या बहाण्यानं हा कार घेऊन घरातून बाहेर पडला यानं एका 50 वर्षांच्या गोविंद यादव नावाच्या व्यक्तीला लिफ्ट देण्यासाठी कार मध्ये बसवलं. विश्वास संपादन करुन गोविंदला दारू पाजली. त्यानंतर नशेत असलेल्या गोविंदला ड्राईव्हिंग सीटवर बसवत कार पेटवून दिली.

कारच्या नंबरहून पोलिसांनी आरोपीचं घर गाठलं आणि कारमध्ये सापडलेला हाडाचा सापळा आणि एक कडं कुटुंबियांना दाखवलं. चव्हाण कुटुंबियांनी ते कडं गणेशचं असल्याचं सांगितलं. यानंतर सुरु झाला तो पोलिसांचा सखोल तपास.

महाराष्ट्र पोलिसांचा शेरलॉक होम्स फंडा?

पोलिस तपासात आरोपीकडे 2 मोबाईल नंबर

कॉल रेकॉर्डनुसार आरोपीचा मैत्रिणीशी शेवटचा संवाद

मृत्यूचा बनाव रचूनही तिसऱ्या नंबरवरुन मैत्रिणीशी चॅटिंग

मैत्रिणीच्या चौकशीत आरोपी जिंवत असल्याच उघड

कोकणातून पोलिसांनी आरोपीच्या आवळल्या मुसक्या

गणेश शेवटी कोणाशी सर्वात जास्त बोलत होता याचा तपास केला असता त्याची एक मैत्रिण असल्याचं तपासात समोर आलं. तिसऱ्या सीमकार्डचा वापर करुन तो मैत्रिणीशी चँटिंग करत असल्याचं निदर्शनास आलं. लातूर-कोल्हापूरमार्गे सिंधुदुर्गातील विजयदुर्गात पलायन केलेल्या या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. पैशाचा मोह, कर्जाचा ताण आणि प्रतिष्ठेची हाव माणसाला किती खालच्या पातळीवर नेऊ शकते, याचं हे जिवंत उदाहरण आहे.

शेरलॉक होम्सच्या शैलीत पोलिसांनी केलेल्या सखोल आणि अचूक तपासातून या घटनेमागील कांडचा पर्दाफाश झालाय. निष्पापाला जीवे मारुन स्वताची सुटका करुन घेणाऱ्या या आरोपीला त्याचा मैत्रिणीमुळेच आयुष्यभर खडी फोडावी लागणारेय, एवढं मात्र निश्चित. पैशाचा मोह, कर्जाचा ताण आणि बनावट प्रतिष्ठेची हाव माणसाला किती खालच्या पातळीवर नेऊ शकते, याचं हे जिवंत उदाहरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com