Latur Water Crisis: लातूर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट! २५ गावात टँकरने पाणीपुरवठा; नागरिक बेहाल

Latur Water Crisis: लातूर जिल्ह्यामध्ये मात्र पाणी टंचाईची दाहकता दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. जिल्ह्यातील अनेक गावांना टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.
Latur Water Crisis:
Latur Water Crisis: Saamtv

संदिप भोसले, लातूर, ता. १७ मे २०२४

गेल्या काही दिवसांपासून वातावरण बदल्याचे दिसत आहे. राज्यातील अनेक भागात अवकाळी सरी कोसळून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. परंतु लातूर जिल्ह्यामध्ये मात्र पाणी टंचाईची दाहकता दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. जिल्ह्यातील अनेक गावांना टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, एकीकडे राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळीने धुमाकूळ घातल्याचे दिसत आहे. तर लातूर जिल्ह्यात मात्र दिवसेंदिवस पाणीटंचाई आणि दुष्काळाची छाया अधिक गडद होत असल्याचे चित्र दिसत आहे. लातुर जिल्ह्यातील तब्बल 25 गावांना टँकर तसेच खाजगी बोरवेल, व विहीर,अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

पाणी टंचाईमुळे नागरिकांची झोप उडाली असून चातकासारखी पाण्याच्या टँकरची वाट पाहावी लागत आहे. तसेच रात्री बे-रात्री उठून पाणी भरावे लागत आहे. हंडाभर पाण्यासाठी महिलांना वणवण करावी लागत असल्याची विदारक परिस्थिती जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे.

Latur Water Crisis:
SSC, HSC Result: दहावी-बारावीचा निकाल कधी जाहीर होणार? शिक्षण मंडळाने दिली अत्यंत महत्वाची माहिती

दरम्यान, अमरावतीमध्येही दुष्काळाजी दाहकता जाणवत आहे. जिल्ह्यातील मेळघाटातील कुपोषणानंतर खडीमल गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देशपातळीवर पोहोचला होता. पाणीपुरवठ्याच्या योजना निकामी ठरल्या असताना भर उन्हात आदिवासी महिलांना सर्व कामे सोडून हंडा भर पाण्यासाठी टँकरची चातकासारखी वाट पाहावी लागते आहे.

Latur Water Crisis:
Pune Breaking News: पोलिसांना गुंगारा, धावत्या ट्रेनमधून उडी टाकून आरोपी फरार; पुण्यात खळबळ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com